श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. दौलाची तबियत बेआराम होती. सांप्रत आराम होऊन आरोग्यस्नान केलें. नजरा व लोकांचे तसदुक सतेके जाले. छ. २१ जावल बुधवारी नवाब दोन घटिका रात्रीं दौलाचे मकानास आले. मीर अलम व असद अलीखां जवळ होते. त्यासुधां दौ (लां ) नीं नजर केली; तबियतीचें मान विच्यारून त्यानंतर दोन घटिका दौला व मीर आलम यांसीं खिलवत जाली. सात घटिकेस नवाब दौलाचे मकानाहून आपले जाग्यास गेले, रा। छ. २४ जमादिलावल हे विज्ञापना.
श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. जंगमाची येक पोर बारा वर्षांचें वयाची तिचे आईबाप पास हजार रुपये देऊन खरीद केली. तिसीं नवाबांनीं निका छ. १७ जमादिलावलीं लाविला ह्मणोन वर्तमान येकदोन मातबर योकिलें,त्यवरुन विनंती लिहिली असें खरें वर्तमान आहे. रा छ. २४ जमादिलोवल हे विज्ञापना.