श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंति विज्ञापना, मिस्तर किनवी दिलावरजंग यांस रुखसत देण्याची याविषई दौलांनी नवाबास अर्जी लिहिल्यावरून दौलांस हुकुम जाला जे तुह्मीं किनवीस घेऊन च्यार घटिकां रात्रीं यावें. त्याप्रमाणें छ २२ रोज गुरुवारीं च्यार घटिकेस रात्रीं नवाब खाजगामध्यें बरामद जाले. मीर आलम व पागावाले व अर्जबेगी व रायेरायां वगैरे इसमांचा सलाम जाला. दौला आंतील वाटेनें आले. हातीं कांठी धरली होती. किनवींची याद केल्या प्रों हाजर जाले. हैदराबादहून मुजफरखान आला. त्याची हुलाजमत नजर जाली. सिदी इलेमास यांस जगत्यालची किलेदारी होऊन खिलत दिल्हा. यानंतर दौला व मीरअलम व किनवी यांसी तीन घटिका पावेतों खिलवत जाली. किनवीस सिरपेंच, जिगा व कंठी तीन दागिने जवाहीर व रुखसतीचें पानदान देऊन रुखसत केलें. त्याजवर येक घटिका दौला व मीर आलम यांसीं बोलणें जालें. प्रहराचें अमलांत बरखास्त जाली. याउपरी किनवी कुच करून जाणार. रा छ. २४ जावल हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)