लेखांक १५८ श्री १६०१ चैत्र वद्य ११
श्रीसकलगुणगणअलंकृत अखंडितलक्षुमी अलंकरण राजमान्ये राजश्री येसाजी मलाहार देशाधिकारी व देशलेखक वर्तमानी व भावी प्रा। पा। वाई गोसावी यास पोष्ये मोरेस्वर पंडीतराय कृतानेक नमस्कार शके ५ सिधार्थी नाम संवछरे चैत्र बहुल एकादसी भार्गव वासरे सु॥ तिसा सबैन अलफ धर्मा(र्थ) वेदमुहुर्ती नरसीभट रगनाथभ(ट) मूलपुरूस वा। क्षेत्र एशट यास पुरातन व्रती इनाम जमी(न) मौजे बेरलेखल जमीन चावर .॥.
मौजे पसर्णी जमीन .॥ एकून इनाम
जमीन चावर १ एक होता ऐसीयास वेदमुहूर्ती परम थोर योग्य अनुत्पन कुटुबवछाल पाहुनु यांस धर्मादाय दिल्हे बि॥
नरसींभट बिन रंगभट परमयोग्य कासीभट रंगभट चित्राव यास
अनुत्पन यास गला गला कौली धर्मादाये गला कैली कोठी मापे
कोठी मापे १ खंडी कैली खंडी १
चिंतामणीभट बिन नरसींभट गला लग ०
कैली कोठीमाप खंडी १
येकून गला कैली कोठी मापे खडी ३ तीन दिल्हे व प्रसूता गाई दरएकास एकीपासून च्यारी गाईचे करभार सोडिला जोवरी वेदमुहूर्ती क्षेम आहेत तोवरी देत जाणे नूतन पत्राचे अक्षेप न करणे मुख्या पत्राचे प्रती घेऊनु मुख्यपत्र वेदमुहूर्तीपासी देणे छ २५ माहे सफर हे१ विज्ञप्ति
बार सुद पौ छ २५ सफर