लेखांक १५७ श्रीशंकर १५९८ मार्गशीर्ष वद्य ८
अज दिवाण ठाणे सा। हवेली पा। वाई ता मोकदमानी मौजे पसर्णी सा। मा। सु॥ सबा सबैन अलफ वेदमूर्ती नरसींभट बिन रंगभट जुनारदार सा। का। मजकूर हुजूर येऊन ठाणा राजश्री एसाजी मल्हारी सुभेदार पा। मा। यांची सनद छ १४ सौवाल पौ। छ २१ मि॥ तेथे आज्ञा की नरसींभट बिन रंगभट इनामदार याचा इनाम सालाबाद कारकीर्दी (दर कारकीर्दी साल) गुदस्ता जैसे चालत आले असेल तैस तेणेप्रमाणे भोगवटा मनास आणून दुमाले करणे ह्मणौनु आज्ञापत्र तेणेप्रमाणे मौजे मा। वेदमूर्ती नरसींभट बिन रंगभट जुनारदार याचा इनाम चावर .॥. नीम जैसा सालाबाद चालत आले असेल तेणेप्रमाणे भो(ग)वटा रुजू पाहोन इनाम दुमाले करणे तालीक लेहून घेऊन असली परतून इनामदार मजकुरापासी देणे छ २१ सौवाल