श्री.
वैशाख वद्य १ शुक्रवार शके १७१६
अखबार.
ता. १६।५।१७९४ ।
विज्ञापना यैसीजे-येथील वर्तमान. येथील वर्तमान ताा छ ५ माहे प्रवाल सेमवर पावेतों अखबार पत्र लेखन करून सेवेसी पत्राची रवानगी केली त्यावरून ध्यानास आले असेल. तदनंतर येथील वर्तमान छ मारी च्यार घटिका दिवसा नबाब लालबागामध्ये येऊन जनान्याचा बंदोबस्त करविला. दिवसां दरबार जाला नाही. रात्री दलाची अज व धारणेचा निरखबंद गुजरला. छ ९ रोज मंगळवार तीन घटिका दिवसां लालबागामध्ये जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्रीं येक प्रहर येक घटिका दिवसां चांदणीचे फर्मावर नवाब बरामद जाले, सरबुलंदग व राथेराया व मुनषी यांचा सलाम जाला. कवालाचे गायन यैकुन येक प्रहर च्यार वटिकेस वरखास जाले. छ ७ रोजे बुधवारी दिवसा दरबार जाला नाही. रात्री साही घटिकेस चांदणीचे फर्मावर नबाब बरामद जाले सुरबुलदजंग व अजमखां व रायेराया व मुनशी व अर्जबेगी वगैरे मामुली लोकांचा सलाम जाला. कवालाचे गायन यैकिलें व रायराया यांच्या फर्दी पाहुन येक प्रहर पांच घटिकेस बरखास जाले. छ. ९ रोज गुरुवारी तीन घटिका दिवसां लालबागामधे नबाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला, दाही हाथी सवदागीर हजह जाले. साहा घटिका दिवसा खिडकी बाहेर नबाब आले. पागःवाले व अर्जबेगी व रायेरायां वगैरे इसमांचा सलाम जाला, हाथी पांच व हातन्या पांच पाहिल्या. सात वटिकेस वरखास जाले. घटिका दिवस शेष असतां जोरावरजंग तालुक्यांत जाण्याकरितां रुखसती विषई दौलाची अजी गुजरली. त्यावरुन पांच घटिका रात्री नबाबांनी रुखसतीचें पानदान दौलाकडे पाठविलें. जोरावरजंग रफादुलमुलुव यांस तालुक्यांत जाण्याची रुवसत जाली. छ ९ रोज शुक्रवारी येक घटिका दिवसां लालबागामधे नबाब येऊन जनान्याचा बंदोबस्त जाला, दिवसा दरबार नाही. रात्री दौलाची अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. छ १० रोज मंदारी तीन घटिका दिवसां लालबागामधे जनान्याचा बंदोबस्त जाला, दिवसां खैरसला. रात्री मामुली लोक हजर होते. त्यांस जबाब जाला. छ ११ रोज रविवारी प्रातःकाली दौलांची अर्जी गुजरली. त्यांस हुकुम जाला जे मालागरेचा सरंजाम दोन वटिका दिवसां राहतां घेऊन येणे. कबुतरखाना व चिनी ची बासने वगैरे सरंजाम हैदराबादेकडे रवाना करण्याचा हुकुम (द ) रोग यास ज.ला, तीन प्रहरास आसदअलीखान यांची अजी नवाबास. व दौलास पत्र बैगनपलीहून आलें तें दौलांनी अर्जीसहीत नबाबाकडे पाठविले. दोन घटका दिवसा शेष असतां दौला सालगिरेचा सरंजाम घेउन हजर जाले. दोन घटिका रात्री नवाब दिवाणखान्यामधे बरामद जाले. दौला व मीर आलम व पागावले व रायेराया वगैरे मामुली इसमांचा सलाम जाला, दौलांनी पोषाक व खरबुजें सोनेरी रुपेरी व मेवाखाने गुजराणिले, चंदा कंचनीचा नाच होता. दौलांस फुजाचा हार दिल्हा. साहा घटिकेस बरखास जाले. छ १२ रोज सोमवारी च्यार घटिका दिवसां नवाब कबुतरखान्यापास आले. सैदमुनवरखान वगैरेचे सलाम जाला, कबुतरे पाहून हैदराबादकडे रवाना करण्याचे सांगितले. सालगिरेचा बबखाना पाहिला. सांहा घाटस लालबागामधे येरुन जनान्याचा बंदोबस्त जाला चिमणाराजे औरंगाबादेहून बेदरास ये ऊन उतरले. याचा अर्ज जाला. रात्री दौलांची अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. छ १३ रोज मंगळवारी च्यार घटिका दिवसा नवाब लालवीगामधे येऊन जनान्याचा बंदोबस्त जाला. दौलाची अजी प्रहर दिवसा गुजरेली. दिवसा दरबार झाला नाहीं, रायचूराहून चकमकी बंदुखा माहवतजं. गकिडील नवाबांनी आणवल्या त्या कामाठ्या समागमें आया. चिमणाराजे यांस इस्तकबाल आषज्याउलमुलुक गफुरजंगाचे पुत्र यांस पाठविले. चिमणा राजे यांनी त्यास तीन पारचे पोषख व दुषाल किनखाब व येक घोडा याप्रा नियाकत केली, सिरपेंचही दिल्हा. रात्री दौलाची याद केली. ते हजर जाले, च्यार घटिकेस बंगल्यामधे नबाब बंगालमध्ये बरामद जाले. दौला व मारलम व पागावाले व रायेराया व मुनषी वगैरे मामुली लोकांचा सलाम नाला, चिम: णाराजे यांची मुलाजमत होऊन सात इसमांची नजर जाली. बसात अंगाचा चेला मरमतखां याची मुलाजमत नजर जाली. पंना भांडाचा नाच होता. असदअलीखानाचे पुत्रास तीन हजारी मनसबा आलमनगारा जाला. दौला व मीर आलम यांसा खिलवत होऊन प्रहर रात्री बरखास जाले. छ १४ रोज बुधवारी लालबागचा झाडा करऊन च्यार घटिका दिवसां नबाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला । छ १६ माहे षवाल हे विज्ञापना. वैशाख वद्य ८ शके १७१६ गुरुवार ता. २२॥५१७९४ छ २२ रोजी पा रवाना पुण्यास, मामुली हवाल्याचे पत्र रावसाहेब पेशवे यांस. छ २२ माहे शवाल मुकाम बेदर.