वैशाख शुद्ध ८ बुधवार शके १७१६
ता. १५।१७९४
विनंती विज्ञापना, दौलाचे बोलण्यात आले की 'चेनापट्टण येथील गैरनर इंग्रजांकडुन होता तो तगीर जाला. दुसरा गौरनर विलायतेहुन लाट आंबट ह्मणोन रवाना जाला तो येत आहे. अद्याप चेनापटणास दाखल जाला नाहा, लौकरच येईल., ह्मगन बोलण्यात आले. भिस्तर इष्टवारट जवळ बसले त्यांनी आपले मुखें हैं सागितलें. र॥ छ ७ पाहेषवाल हे विज्ञापना.