लेखांक १६८
वेदमूर्ति राजश्री नरसींभट गोसावी यासि
दो। बो। रायाजी पाटील व कृस्णाजी पाटील मौजे वरखलवाडी साहेबास कतबा लेहोन दिधला ऐसा जे आत्मकार्या कारणे तुह्मापासून गालियाचा पैका घेतला
३ मोठे भात टके ६
१ बारीक टके २।०
एकूण टके ८। घेतले याचे भात रासमाथा देउन व जोंधले १ घेतले त्याचे दीड मण देऊन हा कतबा सही (नि. नांगर)
गोही
राघोपंत मजमदार खलोजी सालोखी
जु॥ बारगीर १
बहीरजी धुमाल १
तेरीख २९ माहे साबानु
साबान
कतबा वलखलवाडी