Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५.

विनंति ऐसी जे–मेलगीरराव देशमुख चींच....गोलकुंडा येथें होता. त्याचें बोलणें विमलराव व्यंकटेश सुरापुरकर यांचे विद्यमानें मध्यस्तांसीं होऊन तूर्त मेलगीरराव यांचे सुटकेची परवानगी जाली. मेलगीरराव यांचे भावाच्या दोन मुली उपवर-लग्नाच्या त्यांचे लग्नास्तव सुटकेविषई अर्ज केल्यावरून मेलगीरराव बायकोसहित किल्यांतून सोडून चिंचोलीस रवाना करण्याचें ठरलें. लग्न होतांच त्यास हजर करावें, हा जिमा विमलराव यांनी करून सोडविलें. पुढें लग्न होऊन हजर करण्याचें समंई काय ठरेल त्याप्र।। विनंति लिहिण्यांत येईलः र॥ छ० ६ जिलकाद हे विनंति

श्री.
ज्येष्ठ शु. ७ बुधवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-सेना साहेब सुभा यांजकडून सांवतखान लग्नसमंधी जवाहीर वस्त्रें नबाब व मध्यस्तास घेऊन आले. मुलाजमत होऊन पोषाग. जवाहीर पत्रें गुजराणिलीं. नवाबाची रूखसत घेतली. सरपेंच दिल्हा. मध्यस्तांनीं पानदान देऊन निरोप दिल्हा. आह्माकडें आले. घराऊ बोलणें बोलून निरोप देऊन नागपुरासे रवाना जाले. यांचे समागमें राजनी भवानी काळो यांजकडोन लाला ब्रजमल होता. त्याजकडें जोरावरजंगाकडील लडा सबब त्यास च्यार दिवस अटकाव जाला होता. याचा त।। पेशजी लि।' आहे. सांप्रत लालाविषंई सांवतखान यांनीं रदबदल केली कीं “माझेबराबर आला.........जाली. तेव्हां माझें जाणें कसें होतें.” यावरून.... सुटका होऊन खानाचे समागमें लालाचीही रवानगी जाली. र॥ छ. ६ जिलकाद विनंति.

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५.

विनंति ऐसी जे--लाड कारनवालीस यांजकडून नवाब व मध्यस्तास पत्रें आलीं, तीं हैदराबादेहून किनवीनें आपले अर्जासमवेत मवलवीकडे येथें पाठविलीं. त्यानें गुजराणिलीं. पत्रा........ही तयार करविले. पत्रांतील मजकूर काय याचा ........समजण्यांत आला नाहीं. याहूम तहकीक........विनंति लिहिण्यांत येईल. र॥ छ. ६ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार. शके १७१५.

विनंति ऐसी जे–--टिपुसुलतान यांजकडून.......जोडी समागमें नबाव व मध्यस्तास पत्रें आलीं.....मध्यस्ताचे बोलण्यांत कीं “दुसरे हप्त्याबाबत.... टगिरीकडें पहिल्यानें पाठविला. पेशजीचा करार कीं कडपे प्रांतीं ऐवज पोंहचवावा. ऐसें असतां व्यंकटगिरीकडे पाठविला. तेथून आणावयाची सोय नाहीं. सबब इकडून लाड साहेबास लि। होते. सांप्रत कडपे तालुकियांत करारबमोजीब दुसरे हत्त्याचा ऐवज पाठविला आहे. तेथून आणवून घ्यावा. “याप्रा पत्रांत मजकूर ह्मणोन बोलले. त्याचे पत्राचे जबाबही यांनी मुनषीकडून तयार करविलें आहेत. शुतरसवारास एक दोन दिवसांत रवाना करणार. र।। छ. ६ जिलकाद हे विनंति ।

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५.


विनंति ऐसी जे -निर्मळ वगैरे माहलबाबत तनख्याचे वसुलाकरितां सरकारांतून कारकून सखो जिवाजी अवरंगाबादेस गेल्यानंतर फकरूदौला व अजीमुदौलासी ऐवजाचें बोलणें म।।रनिलेचें जालें, याचा तपसील बजिनस त्यांचें पत्र आलें व मध्यस्ता- ........ दौलास ताकीद निक्षुण पाठवण्याचा राजश्री...... व यांनीं आज्ञेप्रमाणें लिहिल्यावरून मध्यस्ता....शवालीं सविस्तर बोलण्यांत आलें. व पत्राची नकल....दाखविली. त्यावरून मध्यस्त बोललें कीं, “ तनख्याचे ऐवजाचा फैसला मागेंच जाला असतां सुभेदारीचे बंदोबस्ताकारतां आरसा जाला. याउपरी ऐवजास गुंता नाहीं. नगदीच ऐवज पदरीं पड़े याप्र॥ जगधन साहुकाराचा दुकान तेथें आहे त्याजवर कांहीं ऐवजाची चिठी व कांहीं अजीमुदौवलाकडून फैसला करवितों. परंतु माजी अमलदाराकडून तनखापैकीं वसूल काय पावला व बाकी काय राहिली हें खचित समजलें पाहिजे. लेहून आणवावें, त्याप्र।। फैसला करून देवितों. '' त्यावरून विनंति कीं, एकंदर तनखा बाबत सरकाराचा ऐवज सुभ्याकडून येणें त्यापैकीं वसूल पोंहचला तो वजा होऊन बाकी ऐवज येणें किती याचे तपासलाची याद दप्तरांतील शोधोन इकडे रवाना करावयास आज्ञा व्हावी. र। छ. ६ जिलकाद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५.

विनंति ऐसी जे, इंग्रजी दोन पलटणें यांचे सरकारांत नौकर---तनखा असदअलीखान यांजवर चनूर कडपे ता(लुकिया) ऐवजीं तीस हजार व चिटवेल तालुकिया ऐवजीं बत्तीस हजार एकूण बासष्ट हजारांच्या तनखा दान केल्या होत्या. तो ऐवज पोंचला नाहीं ह्मणून बोभाट आल्यावरून मिस्तर किनवी दिलावरजंग यांनीं, येथें त्यांजकडून मवलवी आहे त्यांस व मीर आलम यांस, पत्र लि। कीं, “पलटणास ऐवज करार बमोजीब पावत नाहीं. तनखा ज्यांजवर होतात त्यांजकडून ऐवज पोंहचण्याची हरकत होती. यास्तव असदअलीखानही हजूर आले आहेत. त्यांसी तनखाचे ऐवजाची रूबरू करून मागील फैसला व पुढील पलटणीचे दरमाहाचा बंदोबस्त असा कीं बोभाट न पडे याप्र।। करणें " ह्मणोन पत्रें आल्यावरून मीर आलम व मवलवी यांनीं या मजमुनाचे रुके छ. २५ शवालीं मध्यस्तांस पाठविलें. आह्मी मध्य. स्तांपासीं असतां असदअलीखानास मध्यस्तांनीं हा मजकूर छडिला....जबाब केला कीं “सदरहू ऐवजाच्या तनखाची....कियांतील साहुकारावर दिल्या होत्या. हबी....यांचे मारफत रसीद घेऊन तीस हजार देव....वले नसल्यास येथें फडच्या करितों. बाकी ऐवज तेथें....लफलमाची फलम देविले. त्यांत नुकसान. सबब ऐवज न घेतला असेल. याची जसी ईर्षाद त्याप्र। फैसला होईल. " याप्र।। खानाचे बोलण्याअन्वयें मवलवीस जबाब मध्यस्तानीं पाठविला. जालें वर्तमान समजावयाकरितां विनंति. र॥ छः ६ जिलकाद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५.

विनंति ऐसी जे, हैदराबादेहून नवाबांनी बेदरास तोफा आणविल्या होत्या, त्या येथें छ, २९ शवालीं दाखल जाल्या, तीन थोर, मध्यम सात, लहान पांच एकूण पंधरा तोफा ; निवडक येऊन पोंहचल्या. लालबागेनजीक आणवृन ठेविल्या. बाकी तोफा हैदराबादेहून येत आहेत. र॥ छ. ६ जिल्काद हे विनंति.

श्री.
वैशाख व. ११ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐमी जे -अमद अलीखान मुजफरूलमृलुक कडप्याहून येथें आले. मध्यस्ताची भेट हजर (त) ची मुलाजमत जाल्याचा तपशील पेशजी विनंति लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल, खान म।। र यांनीं मध्यस्नास सांगितलें कीं “खमम तालुकियांत सागवानी लांकडें बहुत आहेत. एक एक लाट बारा गजी, दहा गाजी, आट गजी याप्र।। लांबी, लपेटही त्याच अन्वयें याप्र।। लांकडे सागवानी व सिशाचींही आहेत ' हें सांगितल्यावरून मध्यस्तांनीं छ. २२ शवालीं नवाबास लांकडाचा अर्ज केला, खान म।। र ही जवळच होते. “खममहून लांकडें बेदरास नवे शहराकरितां आणावीं.” हा अर्ज मध्यस्तांनी केल्यावर नवाबांनीं उत्तर केलें कीं ' बारा गज लांबी लाट आणवयाच्या त्या छकड्यावर कांहीं येणार नाहींत”. मध्यस्त बोलले. “ दुरुस्त आहे. तख्ते करावे लागतील, तेव्हां असा मातबर चोबीना येईल. शिशाचीं लांकडेंही अशींच मातबर आहेत. तें ( तीं ) ही आणवावी. " इजरत बोलले. " सिशाचे लांकडाची इमारत दुरुस्त नाहीं " मध्यस्तांनीं अर्ज केला ‘बादषाही माहलास सिशाचे लाकडाचें काम शाहाज्याना ........( पुढे बंद गहाळ )

श्री.
वैशाख व. ११ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-मध्यस्तांनीं नवाबास सालगिरेचे संमारभांत आपले तरफेनें जवाहीर गुजराणावयाकरितां खरीद केलें. छ २२ सवालीं आह्मीं मध्यस्ताकडें सांवतखान यांस घेऊन गेलों. तेसमयीं मध्यस्तांनीं बोलण्यांत आणिणें की “हजरतीस सालगिरेकरितां द्यावयास जवाहिर तीन तन्हेचें घेतलें तें तुह्मीं पाहावें. पसंद होईल कीं नाहीं हें सांगावें." या प्रा बोलून तीन जोड जवाहीर दर जोडांत कंठी, सरपेंच, जिगा, भुजबंद, दस्तवंद, तुरावलज्या याप्रा हि-याचा जोड एक व जमरुप पांचेचा जोड एक व तिसरा माणकाचा ऐकूण तीन जोड जवाहिर दाखविलें. जवाहीर उमदे ! किमतही भारी. आह्मी पाहिल्यानंतर तसेच नवाबाकडें गेलों. जवाहिराचे खोन मध्यम्तांनीं समागमें घेऊन नवाबास दाखविले. त्यांनीं एक एक रकम पाहून मजकडें पाहावयास देत गेले. पाहून ज्या रकमेची जसी तारीफ करणें तसी केली नबाबास पसंद जालें सालगिरेच्या दिवशीं मध्यस्न गुजराणार. ध्यानांत यावयाकरितां विनंति, रा। छ. २४ शवाल हे विनंति.

लेखांक १७४                                                                    श्रीशंकर    

                                                                                                                                                                                 नकल

हक व ळाजिमे कारकीर्दी निजामशाई व काजी शरा शरीफ व हाकीम व धर्माधकारणी का। पैठण दि॥ पा। वाई नीब बकाजी अजम-काजी कमाल सु॥सन इसने अलफ हिजरी माहारानी कासे किरतकेर नाईक वगैरे का। पैठण देह प्रमाणे खातरती तपसील शके १५३८ राक्षस नाम सवछरे शकर नाईक पाडेवार → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा

                                                                                                  

सदरहू खरे धर्मादा आसे जे वाचील त्याने धर्मता वाचावे पदरीचे जोडील त्यास गाळ आसे हे लिहिले सही