लेखांक १९४ श्री १६४३ माघ शुध्द १
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ४८ प्लव संवत्सरे माघ शुध प्रतीपदा रवीवासरे क्षेत्रीयकुलावतंस श्री राजा शाहु छत्रपती स्वामी याणी वेदमूर्ती रा। रामजोसी बिन बाल जोसी वास्तव्य मौजे बोरगाव ता। इवेली प्रा। दाभोल यास दिल्हे इनामपत्र ऐसे जे तुह्मी किले सातार्याचे मुकामी स्वामीसनीध येऊन विनंती केलि की मौजे तोरणे ता। वाडे प्रा। जुनर हा गाव पूर्वीपासून आपणास इनाम आहे आपण उपभोग करीत आलो मध्ये अवतारामुळे व आपण माहायात्रेस गेलो यामुळे इनामगावचा भोगवटा राहिला आहे तर स्वामीनी कृपाळु होऊन मौजे मजकूर पूर्ववत इनाम चालवावयाची आज्ञा केलि पाहिजे ह्मणोन विदित केले व पूर्वील पत्रे दाखविली त्यावरून मनास आणिता तुह्मी बहुत थोर जोतिशी सत्पात्र विद्यावत याज निमित्य स्वामी तुह्मावरी कृपाळु होऊन मौजे मजकूर कुलबाब कुलकानु देखील हालिपटी व पेस्तरपटी इनाम करार करून दिल्हा आहे तर तुह्मी मौजे मजकूरचा उपभोग पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने करून स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण चितुन सुखरूप राहणे लेखनालंकार
ॠजुसुरनवीस सा। मंत्री
बारमुद सुरुसुद बार