लेखांक १९७ श्री १६४४ भाद्रपद शुध्द १३
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ४९ शुभकृतनाम संवत्सरे भाद्रपद शुद त्रयोदसी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभू छत्रपति स्वामी याणी देशमुख व देशपांडे ता। पाल यासि आज्ञा केली ऐसी जे राजश्री महादाजी कृष्ण व गोविंद कृष्ण उपनाम जोशी गोत्र शांडिल्य सूत्र आश्वलायन हे स्वामीचे पुरातन सेवक तीर्थरूप राजश्री थोरले कैलासवासी स्वामीपासून बहुत निष्ठेने सेवा केली व तीर्थस्वरूप राजश्री संभाजी राजे काका याची सेवा केली व त्याउपरी तीर्थरूप राजश्री कैलासवासी स्वामी चजीस असता ताम्राचे संकट प्राप्त जाहाले ते समयी माहादाजी कृष्ण हे संताजी घोरपडे व जाधवरायासमवेत फौजा घेउनु गेले ते समयी विशेषात्कारे सेवा केली याकरिता यावरी राजश्री कैलासवासी स्वामी कृपाळू होऊन चजीचे मुकामी यासी मौजे खवली ता। पाली प्रा। मजकूर हा गाव कुलबाब कुलकानू खेरीज हकदार व इनामदार करून जलतरुपाशाणनिधिनिक्षेपसहित हालीपटी व पेस्तरपटी देखील इनाम अजरामर्हामत देउनु सनदा दिल्ह्या त्यावरि मा।रनिलेनी व त्याचे पुत्र राजश्री बाळाजी महादेव यानी राजश्री शिवाजी राजे दाजी याची सेवा केली त्यावरून त्याणी हि मौजे मजकूर यासि इनाम चालवावयाची आज्ञा करून पत्रे दिल्ही त्या प्रमाणे गाव यास इनाम चालत च आहे ऐशास, महादाजी कृष्ण व गोविंद कृष्ण व बाळाजी महादेव व रामचंद्र महादेव व कृष्णाजी महादेव हे स्वामीचे एकनिष्ठ सेवक, यामधे बाळाजी महादेव याणी वडिलवडिलापासून स्वामीची सेवा एकनिष्ठेने केली व हाली करित आहेत याचे चालविणे स्वामीस अगत्य, याकरिता तीर्थरूप राजश्री कैलासवासी स्वामीनी मौजे खवली हा गाव चंदीचे मुकामी माहादाजी कृष्ण यास इनाम वंशपरंपरेने दिल्ह्याप्रमाणे स्वामीनीहि चालवावयाची आज्ञा केली असे तरि, यास मौजे मा।र पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने इनाम चालवणे या पत्राची प्रती लेहून घेउनु अस्सलपत्र भोगवटियास याजवळ परतोन देणे निदेशसमक्ष
रुजू
सुरु सुद बार