Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव पो स्वामीचे सेवेसीं----

गोविंदराव कृष्ण सां नमस्कार, विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लि जावें. विशेष शंकरदास साहू यांजकडे राजश्री गोपाळरावं वानवळे यांचा कर्जाऊ ऐवजे मुदल सतरासें रु। येणें. याजकीरत मारनिलेंनीं शंकरदासाचा पुत्र मनुलाल यांस पैठण येथें कैदेंत ठेविलें. त्यांचे सुटकेविषीं तीन च्यार वेळां पेशजीं पत्रें पाठविलीं. त्यानंतर मनुलाल यांस येथें पाठवावें ह्मणजे सतरासें रु॥ याचा फडच्या होईल. त्याप्रों साहूकारी खातरजमा करून घेऊन मुजरद जासुदाबरोबर पत्र पों. त्यास सांप्रत गोपाळराव पुणियास मनुलाल याजला समागमें घेऊन गेले ह्मणून कळलें, त्यावरून लि।। असे. तरी वानवळे मारनिलेस ताकीद करून मनुलाल याजला येथें पाठवावयाचें करावें. मनुलाल येथें येऊन पोंचल्यानंतर सतराशाचा फडच्या साहुकाराकडून ज्यास देवितील त्याजकडे करून देवण्यांत येईल. येविषयीं रोशनराव व भावसिंग चौधरी यांचें सांगणें बहुत. यास्तव लि असे. रा छ १९ मोहरम. बहुत काये लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.
टपाल रवाना पुणें, छ २२ मोहरम.

श्रीनिवास प्रा. नकल.
राजश्री देशमुख व गबाजी व्यकंटेश देशपांडिये प॥ चाळीसगांव गोसावी यांसी,

श्नो बापूजी हरि आ॥ व नमस्कार विनंति, उपरि तुम्ही जागीरीकडून नवा अमल आहे त्यास खडकी वगैरे गांवास फर्मासीच्या चिठ्या करून देऊन मौजे मारीं उपद्रव आरंभिला आहे, म्हणोन कळलें. ऐसियास पेशजीं आमल होऊन गेले त्यांणी फर्मासीची वगैरेची चिठी कांहीं केली नाहीं, हें तुम्हास माहित असतां तुम्हीं हालिं त्यास मिळोन गांवावर चिठ्या करून दिल्या. त्यात जागीरदार यांचे चित्तांत कटकट करून बखेडा करावयाचा असल्यास तसेंच लिहिणें ह्मणजे त्यासारखे येथून स्वार प्यादे रवाना करावयास येतील. मग तुह्यांसीच गांठ ! तुमची व कसब्याची खर्चाकडोन खराबी होईल. हें समजोन तुह्मीं त्यास च्यार गोष्टी रीतीच्या सांगोन न ऐकेत तरी तैसेंच पत्राचें उत्तर पाठवणें म्हणजे करणें तें करावयास येईल. पत्राचें उत्तर लौकर पाठवणें. र॥ छ ६ माहे जिल्हेज, बहुत काये लिहिणें ? लोभ करणें हे आशिर्वाद.
भावसिंग चौधरी यांनीं सांगितलें सबब. छ १९ मोहरम.
( श्रावण वद्य ६ मंगळ शके १७१५ )

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.
राजश्रीया विराजित राजमान्यराजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी,

प॥ गोविंदराव कृष्ण सां नमस्कार, विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असिलें पाहिजे. विशेष, राजश्री राजे तेजवंत बाहादूर यांजकडोन नवाब बंदगान आली यांचें सरकारांतून फौजेचे व जातीचे सरंजामांत प॥ धारुरपैकीं कसबें आंतूर वगैरे देहात व प॥ चाळीसगांव पैकीं कसबे मजकूर वगैरे देहात जागीर जाले आहेत. राजे म।।र यांणीं सनदा महालीं आमीलासमागमें पाठविल्या. आमीलांनीं माहालचें वर्तमान लिहिलें कीं कसबें चाळीसगांव वगैरे पांच गांव आह्माकडे. पैकीं तीन गांव आबाद व दोन गांव हीन-कुल वैराण; व मौजे गणेशपुर, व मौजे गणपूर दोन गांव राणोजी पवार मोकासदार यांजकडे, व मौजे टाकळी व मौजे खडकी, व मौजे पिपरी सिवराम पंत सरदेशमुख यांजकडे, व मौजे पातोडे व मौजे तु-हडी व मौजे खरजाई व मौजे वाकडी हे च्यार गांव माधवराव रामचंद्र पागावाले यांजकडे. ये।। नव गांव परभारें वहवटतात. आह्मांस दखल देत नाहींत. आखर सालीं हात उचलोन काय देणें तें देतील. प्रस्तुत मोकासदार याजकडील गांवास फर्मास चिठी केली होती. त्यांचें उत्तर त्याणीं जमीदाराचे नांवें पाठविलें त्याची नकल पाठविली आहे, त्याजवरून कळेल, आह्मीं मोकासदार व सरदेशमुख व पागावाले यांस ह्मटलें कीं आमचे गांव सोडोन द्यावें. आह्मीं आपले देखरेख करून घेऊं. तुह्मीं आपला हिसा खा आकारा प्रो। घ्याव्या. त्यास ते ऐकत नाहींत. त्यास याचा बंदोबस्त जाला पाहिजे ह्मणोन आमीलाचे लिहिल्यावरून राजे मारनिले यांणीं आह्मांस सर्व मजकूर सांगितला, व बंदोबस्ताविसीं रा. नानांस, व तात्यांस, व गोविंदराव यांस पत्रें द्यावीं व तरफ ओतूर प॥ धारुर येथील मोकासा येशवंतराव बावने व पर्वतराव याजकडे. याचाही उपद्रववाचप्र॥ आहे. त्यास तरफ मारचा मख्ता सरकारांतून करार करून दिल्ह्यास आह्मी साहुकारी निषा देतों. त्याप्रों साल बसाल ऐवज पावता करून देत जाऊं. अथवा चाकरीस स्वार म्हटल्यास देऊं. निदान ह्या गोष्टी न घडल्यास मोकासदार यांस निक्षून ताकिदा याव्या कीं स्वराज्याचा अमल वाजवी मामुलप्रों घेत जावा. ज्यादा तलबी न करावी. याप्रों दोन्ही माहालचा बंदोबस्त करून देवावा तरीच आमची स्थित राहील. नाहीं तरी बखेडाच आहे. या प्रकारें फार बाजीद होऊन बोलिले. त्याजवरून राजश्री नानांस व तात्यांस पत्रें तुमचे पत्रावर हावाला घालून लिहिंलीं आहेत. त्यांस पत्रें प्रविष्ट करून पत्रान्वयें विनंति करून जावसाल ठराऊन परगणें चाळीसगांव व तरफ ओतुरें येथील मोकासदार, व सरदेशमुख, व पागावाले यांस निक्षून ताकीदपत्रें देवावीं कीं गांव याचे आमीलाचे हावालीं करतील व मामूलप्रमाणें आपला अमल कच्या आकाराप्रमाणें घेतील. कोणतेही गोष्टीची दिकत न राहे असें करवावें. राजे मा निले प्रहस्त थोर मनुष्य जाणून लिं आहे. येविसीं तुम्हास वारंवार स्मरण देण्याविसीं मारनिलेनीं रामकृष्णराव देवाजी यांस लिं आहे. ते स्मरण देत जातील. या प्रों सरकारांतून बंदोबस्त करून देवावा. र॥ छ १६ मोहरम बहुत काय लिहिणे ! लोभ कीजे हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.
रुजू असे. २५००
( मोहर पारसी )

राजश्री रंगराव रामचंद्र दिवाण गोसावी यांस,

अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्र्ने। रावरंभाजी जयवंत निंबाळकर दंडवत विनंति. उपरि तुह्मांकडोन तहरीरीचा ऐवज येणें त्या ऐवजीं येथें राजश्री गोविंदराव बापू यांजपासून रु।। २५०० आडीच हजार घेऊन हे चिठी केली आहे. त्यास राजश्री गोविंदराव भगवंत यांसीं रु॥ आडीच हजार देऊन, पावती बापूचे नांवें पाठवून देणें. ऐवज देण्यास दिवसगत लागलिया व्याज तुह्मांस देणें येईल. तर पत्र पावतांच रु॥ देऊन पावती पाठवावी. र॥ छ ४ माहे मोहरम ऊर्फ श्रावण मास हे विनंति.
राजे भारामल यांचे मागितल्यावरून पत्र छ १८ मोहरम.

सीमा जाली साहेबास सदगुरू करणे नाहीं अविद्येचे गुरु करून परिणाम लागत नाही वारणेपलीकडेस राजा शभु साहेबाचे अपायावरी जपत आहेत. वरकड दुष्ट लोक वेळास जपत आहेत साहेबाच्या चित्तात विवेक, विचार, शास्त्रे, पुराणें, राजनीति , वडिलाचा कदीम पाया, पद्धत येत नाहीं . यामुळे गड, किल्ले, मवास होऊन अन्नावस्त्रास महाग जालें रयत व वतनदार चाकरमासे सर्वस्वें बुडालें पाऊस गेला. कदीम चाकरलोकांस थारा नाहीं, ऐसे जालें परीक्षा दरबारी नाहीं. अपकीर्ति होत चालिली. याउपरि तरी देहावरी येऊन उत्तम विचार चित्तांत करावा मातापुत्रांनी बसोन कारभार एकश्चित्तें करावा चौघे भले सरकारकून व जातिवंत मराठे हातीं धरून ज्याचे त्याप्रमाणें चालवावें, बळ पाडावें, जुना वडिलाचा पाया धरून वर्तावें, ऐसी नीत आहे याप्रमाणें वर्तलिया अवघें कल्याण होईल देव, ब्राह्मण, रयत सतोषी होईल, आणि साहेबांचे कल्याण इच्छितील ईश्वर संतत सपत साहेबास देईल. आडमार्गे गेलिया ईश्वर बरें करीत नाहीं हे आज्ञा देवाची व ब्राह्मणाची आहे उत्तम विचार असेल तो करावा. स्वधर्म राखावा. सत्य जय, ऐसें आहे खरें नाणें, रुपया खरा असेल तोच साहेबीं हातीं धरावा. खोटाळ टिक्का हातीं धरलियानें उत्तम परिणाम नाहीं. यासी साक्ष शास्त्रें, पुराणें, वडिल परंपरागत पद्धति आहेत.

                            यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः l
                            स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ll १ ll
ऐसी नीति आहे. राजे लोकांस स्वभाव असावेः -
                           दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचिज्ञता l
                           अभ्यासेन न लभ्यते चत्वारि ( रः ? ) सहजा गुणाः ll
ऐसा विचार आहे. साहेबांस निष्ठुर वादें कोणी सांगणार नाहीं. आह्मांस वडिल ह्मणविता याजस्तव गुरुबोधाचे आज्ञेप्रमाणें हे विनंतिपत्र लिहिलें असे.
                           अप्रियस्य च पथ्यस्य श्रोता वक्ता च दुर्लभः ll

ऐसें आहे कैलासवासी माहाराज थोरले याचीं पत्रें व पद्धत व मातु श्रीची पद्धत व राजारामसाहेब यांची पद्धत वळवटा आह्माजवळ लिहिला आहे. शाहाणपणें अक्कल बुद्धीनें विचार करून चित्तीं धरिला तरी वाचून पाहावा राज्य ह्मणजे बुद्धिबळाचा डाव आहे बुद्धीकरून जिंकिला पाहिजे. थोर थोर राजे या मागें होऊन गेलें सरकारकून होऊन गेले, आह्मी जाणार, साहेबाची कीर्ति वंश राहिला पाहिजे यांत उत्तम दिसेल तें करावें. *

 

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.

विनंति, उपरि, राजश्री राव रंभाजी निंबाळकर यांचा ऐवज त्यांजकडील रंगराव दिवाण यांजकडे तहरीरबाबत येणें. त्यास मारनिलेवर तहरीरीचे ऐवजीं अडीच हजार रुपयांची वरात रावरंभा यांनीं दिल्ही. आणि येथें मारवाडी यांचे देण्याबाबद ताण मोठा ह्मणून आह्मांपासून आडीच हजार रु॥ यांनीं घेतले. रोखा सदरहूचा लिहून दिल्हा. करार केला आहे कीं रंगराव यांजकडून ऐवज पावले त्याची पावती ये तोंपर्यंत व्याज देत जावें. याप्र॥ करून यांनीं वरात आडीच हजाराची रंगराव याजवर दिल्ही ती पाठविली आहे. सदरहू वरातीप्र।। ऐवज म||रनिले पासून घेऊन इकडे लिहून पाठवावें. रा छ १६ मोहरम, हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ३ शंनिवार शके १७१५.

विनंति. उपरि. बाळाजी व्यंकटेश व येमा कामास रवाना केले होते त्यास बाळाजीपंत काल आले. सर्व मजकूर समजला. बंदोबस्त नीटच आहे. परंतु फार कान जाले. त्यावरून चित्तास प्रशस्त वाटत नाहीं. वर्कड़ सरकारात काहीं गुंता नाहीं. जर गोष्ट फायाषांत आली, ज्यास ज्यास समजेल तो फुटला तर पथ(त)च गेली. पुन्हा सबंध व समक्ष बोलावें हें राहिलें. सरकारास काये ? सर्व नीटच आहे ! धर्मच होये ! वर्कड मध्य वागणारास महत् संकट, दुरंदेशीनें पाहतां याचा विचार पडतो. मळमळित सारखें वाटतें, यास कसें करूं ? याचें समर्पक उत्तर यावें. वरकड सर्व नीटच आहे. क्रम चा(ल)ला आहे. करतों, दस्तकही घेतों. बाळाजी व्यंकटेश कोंकणचा ! निश्चयेंकरून आपलें उत्तर पावतेक्षणीं यावें ह्मणोन लिं. त्यास तुह्मीं लिहिला पर्याय इतकाही खरा. परंतु असीही गोष्ट येखादे वेळेस करणें प्राप्त होतें. तेव्हां छातिही केली पाहिजे. केवळ लोभावरच प्रकार नाहीं. फार कान जाले म्हणोन लिं. त्यास जे जरुरी या कामांत आहे त्यांस क(ळ)ल्या वेगळ कसें होतें ? दोघे, तिघे आपलेकडीलच आहेत. येक मुतसदी तेथून त्यांनी खाना तुम्हाकडे विश्वासूक केला. त्याची बाळाजी व्यंकटेश यांची गांठ वाटेंत पडली नाहीं. तो ग्रहस्थ तुम्हासीं येऊन भेट घेतली, तुह्मांस ताकीदपत्राच्या दस्तकाचा म।र पुसिला. तुह्मीं त्यास उत्तर केलें कीं हे आह्मास कांहीं वाकाफ नाहीं. हें वर्तमान मुख्याकडून आम्हांस कळलें. त्यास तुह्मीं आंगानिराळें टाकलें. बरें केलें ! त्यास कोणी यांतून फुटल्यास आमचा काय दस्तऐवज दाखविणार आहे ? दस्तऐवज दाखविल्यास बोलावयास जागा नाहीं ऐसें म्हणतील. ती गोष्ट तर नाहीं. मग काय चिंता आहे ? श्रीमंताचे प्रतापावरे यांत आम्हीं आहों. येक आपलेच सामर्थ्यावर नाहीं. ईश्वर पार पाडणार आहे ! सर्व सिधता जाली. हें सेवटास न्यावें. कोंकणांतील ठिकाणांत प्रवेश गुप्तरूपें जाला पाहिजे. याची तरतूद कसी केली ? ते लिहावी. उभयेतांसीं ऐवजाचा काये करार ? तुम्हीं काये केला ? हें लिहिलें नाहीं. तर जरूर कळवावें. यास घटिकेचा विलंब न करावा. हिशेब समजला पाहिजे म्हणोन लि आहे. याचे उत्तराकडे द्रिष्ट लागली आहे. तर लवकर उत्तर यावें, आळस न करणें, न करणें, र॥ छ १६ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.

विनंति. उपरि,
मानाजी गाईकवाड मृत्यू पावले. गोविंदराव याचा पुत्र रुसून गेला होता. त्यास दत्तक करावें असा तेथील बेत ठरलें नाहीं म्हणोन लिं तें कळलें. कलम १
राघोजी आंगरे यांचा काळ जाला, मूल लहान. गुलामानें प्रवेश केला आहे. ऐसी व्यवस्था जाली, सर्वांस हुजूर आणावयाची तरतूद होत आहे म्हणोन लिं तें कळलें. कलम १
ऐकूण कलमें दोन. पुण्यांत रोगग्रस्त असाम्या उलगडणें कठीणसिवाजी विठ्ठल, नारायणराव पारसनिसाचे चिरंजीव, रामचंद्रभट पोंगसे इतके लिं यांतून कोणते उलगडलें तें ल्याहवें. सिदगिरीबाबा गोसावी यांनीं दोन लाखोटे -आनंदराव नरसिंव्ह यांचे नांवें येक, व बाबाराव यांचें नांवे येक, व मोर जोसी यांचें पत्र आमचें नांवें-ऐसीं पाठविलीं तीं प।. दोन पत्रें आनंदराव नरसिंव्ह यांचे हवालीं केलीं. सांप्रत आनंदराव यांनीं लाखोटा दिल्हा तो प॥ आहे, प्रविष्ट करावा. र॥ छ १६ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.
विनंति, उपरि:----

१ तैमूरशा दुराणी याचा काळ जाला. पुत्र आहेत त्यांत कोणांत कोणी नाहीं ह्मणोन लिं, व बिजेसिंग मारवाडी यांस देवआज्ञा जाली. धाकटे पुत्रास मसनतीवर बसवावें असें त्यानें सांगितलें म्हणोन लि।, तें कळलें. त्यास बखेडा आहे! ज्याचे दैवीं असेल तो होईल. ........ .... कलम------
१ जुजयातीच्या फर्दा तयार करून श्रीमंतांनीं समक्ष भवति न भवति करून वाजबी निर्गळितार्थ ठराऊन रघोत्तमराव यांचे हवालीं आठफर्दा केल्या. याच्या नकला त्यांनीं करून घेऊन फर्दा माघा-या आल्या ह्मणजे परवांचे दिवसीं आपल्याकडे रवाना होतील, ह्मणोन छ ३ माहे मोहरमीं तुह्मीं लिं. त्यास आह्मी छ ९ मोहरमीं ऐकावयास मध्यस्तांनीं बोलाविल्या. वरून गेलों. ते वेळेस त्यांनीं मार केला कीं आठ फर्दा दफेच्या आपल्याकडे आल्यात कीं काय ? तेव्हां आह्मीं सांगितलें येणार, येका दोन दिवसां येतील. तेव्हां बो (ल) ले कीं रघोत्तमराव यांर्नी आठफर्दा पाठविल्या. त्यास मोहरमेचे दिवस गेल्यानंतर तुह्मीं फर्दा पाहव्या. ठराव करून सांगावे. तसें करावयास येईल. याप्रमाणें बो ( ल ) ले, तुह्मीं फर्दा परवां पाठवितों ऐसें लिहिलें. त्या अद्याप आल्या नाहींत, मध्यस्त मस्करीच्या स्वभावानें आह्मास ह्मणतात कीं तुह्मी सांगाल तसें करीन. त्यास तोडजोडीचा प्रकार जे समंई त्या वेळेस हें बोलणें नीट, आतां तो कांहीं प्रकार राहिला नाहीं. आतां जसें तेथून ठरून येईल तितकें बोलून हो अथवा नाहीं इतका समजावयाचा प्रकार असें दिसोन येतें. त्यास फर्दा खाना करावयास राजश्री नाना तुह्मांस सांगतील ते वेळेस तोडजोडीचाही कांहीं प्रकार सांगतात किंवा लि। याप्रमाणें व्हावे, तोडजोड नाहीं याचा निश्चये खुलासा कसा ? हे लिहून पाठवावें. या प्रकर्णी खोलून लिहिण्याविषंई आळस करूं नये. प्रसंगास तुह्मांकडून पत्रें येऊन आह्मांस केलें असें व्हावें. ही पुरवणी नानास दाखवावयाची नाहीं. तुह्मांस कळावें सबब लि॥ असे. उत्तर लौकर यावें. कलमः----
१ तुकोजी होळकर महेश्वरास आले. शरीर समाधान नहीं ह्मणोन लिहिल्यावरून कळलें. कलम----
१ पालखीचे दाल, सरंजाम पाठविले ते सरकारचे पालख्यांस लाऊन पाहिले, तो सरंजाम थोर होतो यास्तव परत केले; ते बाळाजीपंत सेंबेकरा. बरोबर पाठवितों ह्मणोन लिं तें कळलें. त्यास बाळाजीपंत पुण्यांत आले किंवा इकडे आले किंवा कांहीं कामगिरीस गेले हें कांहीं समजत नाहीं त्यांचें पत्रही आलीकडे येत नाहीं. प्रसंग कोणे प्रकारचे आणि त्यांची रवानगी तर होत नाहीं ! यास काय करावें ? ईश्वर इच्छा !
कलमें च्यार र॥ छ १६ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.

विनंति, उपरि. सेनासाहेब सुभा यांचीं पत्रें नागपुरीहून सरकारांत आलों कीं बाबुराव वैद्य व श्रीधरपंत व कुशाबा चिटणीस यांची रवानगी आपणाकडे करतों. बाबुराव यांस परवानगी पत्र यावें. ऐशीं पत्रें आलीं. त्यावरून बाबुराव यांस पत्र सरकारचें जावें असें ठरलें, त्रिवर्गही येणार. सत्वर येतील ह्मणोन लि।। तें कळलें. त्यास मध्यस्थानीं भोंसले प्रकर्णी मार केला कीं भवानी काळो, कुशाबा, श्रीधरपंत तिघांतून येकास आणवावें; आणि जाबसाल उलगडावे. याचा त। म॥र श्रीमंताचे पत्रीं लि।। आहे, त्यावरून तुम्हांस समजेल. बाबुराव आदिकरून त्रिवर्गाचें येणें या संधीस पुणियास घडतें हें ही योग्य आहे. र॥ छ १६ मोहरम हे विनंती.