लेखांक १९५ श्री १६४३ माघ वद्य १२
आज्ञापत्र समस्त राजकार्यधुरंधर वीस्वासनीची राजमान्य राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान ता। मोकदम मौजे तोरणे ता। वाडे प्रात जुनर सु॥ ईसने अशरीन मया अलफ मौजे मजकूर पूर्वीपासुन वेदमूर्ती राजश्री रामजोसी बिन बालजोसी वास्तव्य मौजे बोरगाव ता। हवेलि प्रात दाभोळ यासि इनाम आहे तेणेप्रमाणे हालि करार केला आहे तरी वेदमूर्तीसी रुजु होऊन मौजे मजकूरचा वसूल याजकडे देत जाणे प्रतीवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे मौजे मजकूर यासि व याचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने चालवीत जाणे या पत्राची प्रती लेहोन घेऊन मुख्य पत्र याजवलि भोगवटेयास परतोन देणे छ २५ रबीलाखर आज्ञा प्रमाण