Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक १८७                                                              श्रीमाहालक्ष्मैनमः                                                     १५९१ चैत्र वद्य ३                                   
                                                                                                                                                                                     
स्वस्ति श्री शके १५९१ वर्षे सौम्य नाम संवत्सर चैत्रवदि तृतीया तदिनी करवीरक्षेत्री राजश्री गोविंदराव दत्तात्रयानी प्रतिगृहा प्रताप येक प्रमाणे वाटणी केली असे स्वस्ताक्षर धर्माधिकारी महिपतिभट्ट →पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति, उपरि. जुजयातच्या फर्दा आठ पाठविल्या. या प्रथम मध्यस्तास दाखवाव्या. नंतर दुसरे दिवसीं राजश्री बाबाराव यांस बोलाऊं पाठऊन आणवावें, आणि फर्दा दाखवाव्या. बोलावें की तुमची गांठ मध्यस्ताचे घरीं पडावी तेथें आह्मीं बोलतों. तुह्मींही बोलून सरकारलिहिल्याप्र॥ बोलून ठराव करावा, ऐसें त्यास घेऊन बोलणें व्हावें. ऐसी राजश्री नानाची आज्ञा, त्याजवरून लिहिलें असें. आपण ह्मणतील बाबाराव येथें असतां त्यांचें बोलणें कीं :- काये जाबसाल असतील ते मला समजाऊन दिल्यास मी मध्यस्तासीं बोलून सर्व उगरून देतों. यास्तव त्यांस घेऊन करावें ह्मणोन श्रीमंतांनीं आज्ञा केली कीं बोलण्याचा उपर कशास ठेवावा ? यास्तव घेऊन बोलावें, हा यांतील खुलासा ह्मणोन लि।।. त्यास फर्दा पावल्यानंतर ध्यमस्ताकडे गेलों. फर्दाही दाखविल्या. याच फर्दाच्या नकला रघोतमराव यांजकडून आल्या, त्या अक्षरशा पाहिल्या. त्यावरून पुर्त्या नेहननिषीन जाहल्या आहेत. याचे जवाबाचे पर्याय दो ती दिवसांनंतर तुह्मासीं सर्व बोलण्यांत येईल. बाबाराव यांजकडे सांगून पाठविलें होतें त्याचा मार आलाहिदा पुरवणी पत्रीं लिहिला आहे त्याजवरून कळेल. र॥ छ २९ मोहरम. हे विनंति.

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १८१५.

राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी विनंति, उपरि. तुमचीं पत्रें छ १५ मोहरमचीं छ २१ माहे म।।रीं पावलीं. लिहिल्याप्र।। म॥र सर्व समजला. त्याचीं उत्तरें सांप्रत लिहिलीं आहेत. त्यावरून कळेल. इकडील सविस्तर मजकूर श्रीमंताचे पत्रावरून समजण्यांत येईल. राजश्री नाना यांसही सरासरी पत्र लि।। आहे. चनापटणाहून अखबार आली ते व नानाचे पत्राचा लाखोटा पाठविला आहे. सर्व पत्रें श्रीमंतासहित नाना यांस दाखऊन त्यांचे आज्ञेप्रमाणें श्रीमंताचे सेवेसीं प्रविष्ट करावीं, उत्तरें घेऊन वरचेवर रवाना करावीं. र॥ छ २९ मोहरम, हे विनंति.

[ १८५ ]                                        श्री.                                         १७७४.                                                                                                                                            

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री आपाजीपत स्वामीचे सेवेसीः-
पो। रामचंद्र महादेव सा । नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। माघ शु।। २ पावेतो मु।। लष्कर नजीक बल्हारी येथें क्षेमरूप जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असावे विशेष श्रीमंत राजश्री पंत अमात्य याजकडील तालुक्यांत तुह्मांकडून उपसर्ग होऊं नये एविसीं पुण्याचे मुक्कामीं बोलणें झालेंच आहे. तुह्मीही करणार नाहीं हे खातरजमाच आहे. परंतु एक दोन बोभाट बोडकीहाळ, यळगुड वगैरे येथें आइकिले यामुळें पत्र ल्याहावें लागलें श्रीमंत राजश्री अमात्य पंताचे ठायीं श्रीमंताचा व बापूचा व सर्व मुत्सद्दी यांचा लोभ कोणें रीतीचा हेंहि सर्व पाहिलेलेच आहे. तुह्मासही अगत्य असावें ऐसाच योग आहे. परंतु न कळे. अवाईस मिळोन हरएकविसी त्याजकडील प्रांतास घासदाणा किंवा रोखेपत्र ऐसे उपसर्ग लागतील तर फार सांभाळून दरोबस्त त्याजकडील प्रांतास काडीमात्र उपसर्ग न लागे तें करावें. यावेळीं निमित्यधारी तुह्मींच आहे. शिमगा जाई आरि कवित्व राहे ऐसें न व्हावें यांत सर्व आहे त्यांस तो ईश्वरेंच थोर केलेलें आहे. तुमच्या आमच्या उपसर्गानें उणें पडते ऐसें नाहीं. परंतु करणारांनीं मात्र बहुत दूर आंदेशा पाहून चालत असावें ऐसेंच घर तें आहे हें समजोन लि।। आहे याप्रमाणेंच निदर्शनांत यावें. विस्तारें लिहावें तरी सुज्ञ असा. कृपा लोभ कीजे हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ९ शुक्रवार शके १७१५.

विनंति. उपरि, कुशलपुरी यानें राजश्री रघोतमराव व रामचंद्र दादो यांचे नांवें दोन लाखोटे पाठविले. त्यांस पावते करून जाब घेऊन पाठवावें. र॥ छ २१ मोहरम हे बिनंति.
छ २९ मोहरम टपा रवाना पुण्यास.

श्री.
श्रावण वद्य ९ शुक्रवार शके १७१५.

विनंति. उपरि. व्यंकट रामदीक याजकडून चिनापटणची अखबार व राजश्री नानाचे नांवें पत्र आलें तें पाठविलें आहे, प्रविष्ट करावें. अखबारेंत श्रीमंत पंतप्रधान यांजकडील तिसरी किस्त पावती जाली नाहीं असें असावें. तेथें सेना साहेब सुभा यांचें नांव हस्तदोषें करून पडलें असें वाटतें. पाहिल्यावर समजण्यांत येईल. व्यंकट रामदीक उमेदवार आहे. याज करितां त्याची नेमणूक सरकारांतून व्हावी. ह्मणजे स्वरूपवृद्धीचा संतोष होऊन सरकार कामाचे उपयोगीं पडेल. याविषंई विनंति करावी. सर्फराज करणें खावंदाकडे आहे र॥ छ २२ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावणव. ९ शुक्रवार शके १७१५.

विनंति. उपरि जुजयातच्या आठ फर्दा ठरल्या, त्याच्या नकला राजश्री रघोत्तमराव यांनीं मध्यस्ताकडे पाठविल्या; त्याचे पारसी तरजुमे करून पाहिलें. नंतर बाबाराव यांस बोलाविलें. बाबाराव यांस समाधान वाटत नाहीं परंतु तसेंच यावें म्हणोन हुकूम गेला, तेव्हां गेले. तिघे जण साहा घटिका बसून खलबत केलें. आठ फर्दाच्या नकला करून पाटिल बावाकडे पाठऊन याचा जबाब लवकर आणवावा ऐसें सांगितलें. त्या फर्दानकला तयार करून रवाना जाल्या. कलम.---------१
इंग्रजांकडून साता कलमाची याद तहनाम्याची आली. त्याजवर विचार होऊन येक फर्द पुणियाहून ठरून आली. त्याची भवति न भवति करून श्रीमंतास उत्तर लिहावयासी आम्हांस सांगितलें या पुरवणीवर नवाबाचे दसखत करून घेतले. नंतर श्रीमंतांस पुरवणी लिहिली. त्याची नकल मध्यस्ता जवळ होती ती नकल करून पाटीलचबावाकडे पाठवावयासी बाबाराव यांस सांगितलें. कलम.---------१
पटणास टिपूसीं तहनामा जाला. त्याची नकल करून पाटीलबावाकडे पाठवावयाकरितां बाबाराव यांस दिल्ही. कलम.-------१
तीन कलमें
बाबाराव लाखोटा देतील तो टप्यावर पांच दिवसांत पावता व्हावा, आणि पांचा दिवसांत उत्तर लवकर यावें, ऐसी रवानगी जलद व्हावी म्हणोन आनंदराव सभापत यांस मध्यस्तानीं ताकीद केली. याप्रों बातमी कळली ती लिहिली असे. सारांश सर्व इतला गुह्य मार्गे पाटीलबावाकडे होतो हें ध्यानांत असावें. र॥ छ २२ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण व. ९ शुक्रवार शके १७१५.

विनंति, उपरि. अत्मीकांनीं सांगितले कीं मध्यस्त आपले घरीं कोणा येकासीं बोलत होते कीं हजरतीचा निरोप दो महिन्यांचा घेऊन पुण्यास जावयाचें: त्या ग्रहस्तानें पुसिलें कीं मग हजरतीपासीं कोण आहे ? आणि जावयाचें प्रयोजन कोणतें ? याचें उत्तर मध्यस्तांनीं केलें कीं पटणचे मोहिमेस गेलों ते वेळेस हजरतीपासीं आपले नियावतीवर गफुरजंग याचे पुत्रास ठेविलें, त्यास ठेऊन पुणियास जावें. मदारुलमहाम याचे मनांत संशये आले ते काढून दोन्हीं सरकारची ऐक्यता करून लवकर यावें असें मनांत आहे. याप्रमाणें बोलण्याचा उद्गार निघाला. पुढें पहावें काय ठरतें? जाहीरदारींत तर ऐसें आहे. मनांतील बेत काय असेल तो असो ! त्यास असाच विचार ठरविल्यास मध्यस्ताचे बोलण्यांत येईल. ही गोष्ट झांकून रहावयाची नाहीं. काय ठरतें हें समजेल. र॥ छ २२ मोहरम, हे विनंति.

श्री.
श्रावण व. ४ शुक्रवार शके १७१५.

विनंति, उपरि. राजश्री बाबाराव यांस इतके दिवस पाटिल बाबाजवळ ठेविलें यांतील प्रधान हेतू हा कीं येक आपला पुत्र हिंदुस्थानांत घेऊन जावा, त्यास वजारतीवर कायम करावें, त्यानें पाटील बावाचे ऐक्यतेंत असावें. म्हणजे गोडीचे पोटांत पातषाहींत आपला पाय कायम जाहला. दक्षणची सुभेदारी आहेच. यास च्यार रु। खर्च जाले तरी चिंता नाहीं. आपण नवाबाचे कारपरदाज जाहलों यांत खाविंदाचे दौलतीची तरकी करुन पाया मजबूत केला. असें कोणे कारपरदाजानें केलें नाहीं. तें आपण करून दाखविलें ऐसें होतें. आणि राव पंतप्रधान, आदिकरून सर्व रइसांवर दाब ! ऐसी मसलहत बांधून नवाबाचे मनांत ही गोष्ट बिंबऊन, परवानगी घेऊन मध्यस्तांनीं राजकराण षुरु केलें. पाटीलबावा यासीं करारमदार ठरला कीं या प्रकर्णी पातषाहाची नजर येक करोड ठरली. त्यांतील करार असा आहे कीं पुणियास गेलियावर तेथील बंदोबस्त खातरखा करून हिंदुस्थानांत गेलियावर हें कार्य सिद्ध करावें. येथें फौजेचें खर्चास ऐवज लागेल तो पुरवावा. आणि अनकूळ असावें. नवाबाचे पुत्रास वजिरीवर कायम करावें. त्याची नियाबत पाटील बाबानीं करावी, याप्रमाणें करार, त्यास पुणियास आले. पैक्याविसीं आणि मसलहतीविषई आम्हीं अनुकूळ असतां आज परियेंत आपला बंदोबस्त काय केला ? कीं ज्या बंदोबस्ताचे भरवसियावर हिंदुस्थानांतील कामें सातरखा करावीं हें अद्याप कांहीच द्रिष्टीस पडत नाहीं. करोड रुपये देण्याचा करार पैकीं चाळीस लाखपरियेंत आजपरियेंत पोंचून चुकलें. बाकी साठ लाख रु।। राहिले. अद्याप कोणतेही उपयोगाचें लक्षण दिसत नाहीं. केवळ सुस्त होऊन बसलां ! यांस काय म्हणावे ? याप्रमाणें बाबाराव यांस छेडणी फार आहे. बाबाराव यांचे सांतवन करतात कीं सुस्ती धरून बसले आहेत यांतच काम आहे. लौकिकांत आवका उठल्या, त्याजवर कितेकांचे अंत:कर्णांत संशय. यांत कांहीं विपरीत दिसल्यानें अधिक सावधगिरि जाली म्हणजे गोष्ट बहकण्यांत येऊन आफ्तरी होईल, याज करितां पड़ घेऊन नरम चालीनें संशयनिवृति करून सुस्तीखालें टाकल्यावर कारस्थान चालेल. नाहींतर सर्व आफ्तरी होईल. याजकरितां च्यार दिवस दम धरून नंतर काय होतें तें पहावें, याप्रमाणें विप्र खातरजमा करित आहेत. त्यास ही बातमी आत्मिका कडून कळली नाहीं. विप्राचे घरांतील बारीक बातमी ऐकिली ती लिहिली आहे. या गोष्टीस खरें खोटें दोन्ही म्हणतां येत नाहीं. राजकारणाचा ग्रंथ जसा सिध केला तसा होतो. याजकरितां जें ऐकलें तें लिं आहे. मननांत असल्यानें बहुत उपयोग, हुषयारी तर राहिल ? यास्तव ही पुरवणी राजश्री नानास दाखवावी. यांचे उत्तर विशेष लिहूं नये. आमके तारखेचीं पत्रें पा तीं पावलीं, श्रीमंतांस दाखविलीं; इतकीच सूचना पुरे. र॥ छ २२ मोहरम. हे विनंति.

श्री.
श्रावण व. ९ शुक्रवार शके १७१५.
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं.

विनंति. उपरि. तुम्ही छ १५ मोहरमचीं पत्रें जुजवियातचे आठ फदी समेत पाठविलीं तीं छ २१ माहे मिनहूस पावलीं. मजकूर समजला. त्याचीं उत्तरें मागाहून लिहिण्यांत येतील, सांप्रत कांहीं वर्तमान समजलें तें आलाहिदा लिहिलें आहे. त्याजवरून कळेल. रा छ २२ मोहरम, हे विनंति.