लेखाक ३४
१६५४ आषाढ वद्य ९
हु
सुज्याअतशार सिदी साद सुभेदार सुभा मामले दाभोल व प्रात राजापूर मालूम बाशद सुहूरसन सलास सलासीन मिया व अलफ आके दादोवानायक बिन रगोवानायक सरदेशाई सुबैन मजकूर येही मौजे धामापूर तर्फ सगमेश्वर सुभा राजापूर हा आपला कदीम गाव मराठे तर्फेन आपणास इनाम आहे सरकार तर्फ + + णी मौजे माlरा वर आहे ते मेहेरवान होऊन आपणास माफ केली पाहिजे म्हणोन अर्ज केला त्या वरून मेहरवान होऊन मौजे मजकूरची खडणी सरदेशाई माlरइलेस माफ केली असे तर जे साली जे खडणी मौजे माlरा वर मुकरर होत जाईल त्याचा सालमजकुरा पासोन सालाचे सालात माफी खर्च लिहीत जाणे ताजे सनदेचा उजूर न करणे नकल घेऊन असल सरदेशाई या नजीक देणे पाl हुजूर रोl श माl जबानी रघुजी भिकाजी नाईक बोरकर अफराद राl छ २२ माहे मोहरम सन *१४ जुलूस (* हा जुलूस 'महमदशहा'चा) मोर्तब सूद
बार सूद