लेखाक २९
श्री १६४८ भाद्रपद वद्य ८
राजमान्य राजश्री रामभाऊ बावाजी मुतालीक अमात्य यासि श्रीमत् मातुश्री राजसबाई साहेब उपरी सुहूर सन सबा अश्रीन मया अलफ राजश्री अतोवा नाईक सरदेसाई मामले प्रभावली या कडील सगमेस्वर माहाली देशमुखीचे कोड आसुरडे मौजे कुभारखणी हे दोन्ही कोड इनाम याज कडे चालत आहेत हे वतनदार प्रमाणीक याचे चालवणे साहेबास आवस्यक याज करिता तुह्मी याचे सदरहू इनामास व वरचील हक इनामतीस तिजाईचे तगादा न करणे याज कडील तिजाई हुजरून माफ केली असे छ २१ माहे मोहरम बहुत लिहिणे तरी तुझी सुज्ञ अस