लेखाक २७
श्रीआईआदिपुरुष १६४३
श्रिया सह चिरजीव राजमान्य राजश्री श्रीनिवासराऊ यास प्रति कृस्णाजी परशराम आसीर्वाद उपर येथील कुशल जाणून आपले कुशललेखन केले पाहिजे या नंतर राजश्री अतावानाईक सरदेसाई आपल्या दर्शनास आले आहेत पूर्वी पासून हे आपले पदरचे याची स्थापना सर्वप्रकारे आपले वतन ऐसे मानून तीर्थस्वरूप राजश्री बावाही केली आहे त्या प्रमाणे सर्वविसी याचा अभिमान धरून आपण स्थापना केली पाहिजे हे आह्मा पासी आहेत ते आपणा जवली च आहे ऐसे चितात धरून दया केली पाहिजे च्यार राजे जाहली आहेत यास आधार आपल्या विरहित दुसरियाचा नाही थोर वतनदार ब्राह्मण ह्मणऊन तीर्थस्वरूपी आपले पुत्र ह्मणऊन चालविले आहे त्याचे वादी तुह्मी आहा याचा अभिमान धरून चालणार आपण सर्वज्ञ आहेत याचे विसी चिरंजीव आपणास विनती करितील तदनरुप याचे कृपा केली पाहिजे बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद१ (१ हे सबध पत्र कृष्णाजी परशुरामाच्या हातचे आहे)