लेखाक ३८
१६७२ श्रावण शुद्ध ४
श्री आई आदिपुरुष
पुरवणी तीर्थरूपाचे सेवेसी
विनती उपरि दरबारचे वर्तमान तरी श्रीमत मातुश्री आईसाहेब पुणियास आलियाचे वर्तमान आपणास कलले च आहे त्याआलीकडे वर्तमान आषाढ वद्य त्रयोदसीस राजश्री प्रधानपताच्या वाड्यात आली होती नव्या दिवाणखानिया मध्ये बैठक केली होती च्यार घटका रागरग जाहाला तदनतर गोशालेमध्ये बसोन घरातील अवघ्या बायका बोलाऊन आणून अवघ्यास वस्त्रे दिली प्रधानपती मातुश्रीस दोन पोषाख एक चादणी व एक कलसपाकी ऐसे दोन दिल्हे पोहोच्या जडित दोन व एक मोत्याची माल दिली येणे प्रमाणे सत्कार जाहाला राजश्रीचे वर्तमान तरी मातुश्री आजीतागायत हे कर्म खोटे आहे ऐसे ह्मणत आहेत परतु याचे विचारे जी गोष्ट घडली आहे हे विपर्यास जाहाल्याने राज्यात दुर्लौकीक आपण याचे पदरी मातबर पूर्वी याणी विच्यार न करिता हे गोष्टी कैसी केली हा लौकिक जनात हे च प्रतिपादावे तरी आज नऊ वर्षे मातुश्रीने नव्हे ह्मणऊन हटात्कार केला आहे होय ह्मणावे तरी मातुश्रीचा आग्रह नव्हे ह्मणावे तरी जनविरुद्ध गोष्ट याज करिता हे हि विचारात पडिले आहेत या गोष्टीचे रुजू मोझे बहुत मनास आणून मातुश्रीच्या तोडे हे च गोष्ट खरे ऐसे साक्षी मोझ्या निसी करून स्थापावे ऐसे आहे परतु ती आइकत नाही या करिता करवीरवासियास आणावे ऐसा मातुश्रीच्या विचारे निश्चय जाहाला त्याज वरून राजश्री पत या समागमे राजश्री विखाजी नारायण व राजश्री हरी राम घोरपडे या कडील समागमे देऊन आणावयास रवानगी केली ते आजी चतुर्थीस निघोन गेले येणे प्रमाणे याचे मुदे त्याणी मान्य १