लेखाक ३९
१७१२
श्री
आन्यासाहेब
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ११७ साधारणनामसवत्सरे भोमवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शिवछत्रपती स्वामी याणी समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री माधवराव पडित प्रधान यासि आज्ञा केली ऐसी जे कसबा सगमेस्वर येथे कैलासवासी तीर्थस्वरूप माहाराज साहेब याचा वाडा आहे त्या जागे वरी हाली राजश्री सदाशीव दादाजी माहूलगकर सरदेसाई वाड्याच्या जुन्या जोत्या वरी याणी घर बाधिले ह्मणोन जोसी याजकडून हुजूर गैरवाका समजाऊन देऊन पेशजी आपणास आज्ञापत्र सादर जाहले आहे ऐ सरदेसाईयाणी घर बाधिले आहे व बाग त्या नादणूक कसबे मजकुरी कैलासवासी माहाराज गडाहून येऊन राहिले होते तेव्हा व त्यापूर्वी सी जाहली आहे त्याची चौकसी वाजवी न्याय. . . ह्मणोन दाखले निसी वैवाट चालत आली आहे... .. सरदेसाई याज कडे चालू द्यावी जाणिजे बहुत लिहिणे तरी सुज्ञ आसा
बार बार