लेखाक ३५ श्री
सकलगुणालकरण अखडितलक्ष्मीआलकृत राजमान्य
राजश्री कृष्णराव स्वामी गोसावियासि
पोl बालाजी बाजीराव कृतानेक नमस्कार विनती उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असिले पाहिजे विशेष करवीरच्या बदोबस्तास राजश्री सदासीव राम व विसाजी नारायण पाठविले असेत तरी तुह्मी आपले जमावा नसी यासि सामील होऊन हे सागतील त्या प्रोl बदोबस्त करावा किले कोट याचे आज्ञेत वर्तत ते करावे हे जमाव आणवितील ते वेलेस पाठवावा + छ २४ जमादिलावल बहुत काय लिहिणे लोभ असा दीजे हे विनति