लेखाक ४२
१७४२ कार्तीक शुद्ध १२
श्री
राजश्री गणोवानाईक बिन प्रल्हादनाईक व राघोबानाईक बिन दादोवानाईक सरदेसाई मामले प्रभावली व सुभा दाभोल यासि आज्ञा केली ऐसी जे सु॥ इहिदे अशरीन मया तैन व अलफ स्वामीचे शेवेसी तुह्मी हुजूर करवीरचे मुकामी येऊन विनती केली की कसबा सगमेस्वर येथे पूर्वी आमचा वाडा होता त्या वाड्यात कैलासवासी माहाराज
कारणा मुले राहिले पुढे वाडा धग्ध जाहाला त्या वाड्या वर दादोवानाईक सरदेसाई याणी घर बाधिले त्याज वरून जोसीयाणी गैरवाखा समजाऊन माधवराव पडित प्रधान यासी आज्ञापत्र देऊन वाडा मोडविला त्याज वर त्या च वर्षी दादोवा-नाईक सरदेसाई याणी आपला मजकूर समजाऊन पडित-प्रधान यासि वाडा बाधू देणे ह्मणोन आज्ञापत्र न्हेले परतु जोसीयाचे भिडे मुले वाडा जाहाला नाही त्यासि हाली कृपा करून आमचा वाडा आह्मी बाधितो त्याज विसी आज्ञा जाहली पाहिजे ह्यणोन विदित केले त्याज वरून मनासी आणिता तुमचे वाड्यात कैलासवासी माहाराज राहिले व तुह्मा जवलील कागदपत्र व भोगवटा पाहून पेशजी प्रधानपत यासि आज्ञापत्र दिल्हे आहे हे जाणून व हाली चवकसी करून वाड्याची जागा तुमची खरी हे जाणोन तुह्मास आज्ञापत्र सादर जाहाले असे तरी तुह्मी कसबे माlरी जुन्या वाड्यावरील जागे वर घर बाधून सुखरूप राहाणे जाणिजे रा। छ १० माहे मोहरम लेखन १ खासा
बार