लेखाक ३६
श्री १६९० ज्येष्ट वद्य ५
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ९५ सर्वधारीनामसवत्सरे जेष्टबहुलपंचमी भानुवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शिवछत्रपति स्वामियाणी समस्त राजकार्यधुरधरविश्वासनिधि राजमान्य राजश्री आबाजीराव कृष्ण पंडित प्रतिनिधी यासि आज्ञा केली ऐसी जे तुह्मी साहेबाचे शेवेसी योग्य पाहोन तुह्मा वरी तीर्थरूप माहाराज मातुश्री आईसाहेब कृपालु होऊन राजश्री नरसिगराव सिदे व यसवतराव सिदे सुभेदार यासि पाठऊन हुजूर किले पनालियाचे मुकामी आणिले आणि प्रतिनिधीचा हुदा सागीतला वस्त्रे दिल्ही व प्रतिनिधीचा सरजाम सुधा व बाबती किले भुदरगड व समानगड व कलानिधिगड व पारगड व भिवगड व अजिरे येथील सरजामाच्या बाबती पूर्ववत् प्रमाणे करार करून दिल्या असेत तरी तुह्मी सदरहू किले मजकूर व बाबती पुरातन आहेत त्या प्रमाणे अनभवीत जाणे अणी स्वामीच्या पाया पासी एकनिष्टपणे वर्तोन स्वामीस सतोषी करून आपले सेवेचा मजुरा करून घेणे व तुह्मास जामीन राजश्री सुलतानराव सिदे यासि हुजूर घेतले असेत जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा
तेरीख १९
मोहरम सुll तिसा सी(तै)
न मया अलफ बार