लेखांक २५१ श्री १६३३ आषाढ वद्य ६
आज्ञापत्र समस्तसेनाधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री जयसिंग जाधवराऊ सेनापती ता। मोकदमानि मौजे मोरगाऊ ता। कर्हेपठार प्रा। पुणे सु॥ इसन्ने असर मया व अलपु मौजे मजकुरी रा। जनार्दन गोसावी याचा इनाम पूर्वीपासून चालत आहे त्यास कुलकानु व हकदार जो। वेठी माफ असता सांप्रत तुह्मी उपसर्ग लाविता ह्मणून विदित जाहाले तर पूर्वापार यास माफ असतां हाली नवी कानू करावयास कायी गरज हे रीती बरी नाही याजउपर पूर्वीपासून जनार्दन गोसांवी याचे चालत आले असेल तेणेप्रमाणे चालवणे वेठी जेठा व बाजे कानूकाननातीचा उपसर्ग न देणे छ १९ जनादिलावल मोर्तब सूद