लेखांक ७७
१६१९ श्रावणवद्य ११ सोमवार
श्री
श्री सकल-गुण-मडित वेदशास्त्रसपन्न राजमान्ये
राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्र क-हाड स्वामीचे सेवेसी
विनती श्रेहपूर्वक राजा कर्ण भोसले देसमूख व सरदेसमूख पा। मजकूर दडवत सु॥ समान तिसैन आलफ तीर्थ-स्वरूप राजश्री छत्रपति स्वामी कृपाळू होऊन मौजे सैदापूर पा। क-हाड याचे नाव शिवापूर ठेऊन अग्राहर करून देणे ह्मणऊन राजेश्री रामचद्र पडित अमात्य यास - आज्ञा केली त्यावरून त्यानी सर्वमान्य आग्रहर करून दिल्हे ऐसे असता तुह्मी समस्त ब्राह्मण आह्मापासी येऊन विदित केले की स्वामीची देसमुखी व सरदेसमुखी मौजे मजकुरी हक आहे तो आपणास धर्मादाऊ दिल्हा पाहिजे ह्मणऊन विदित केले त्या वरून तुह्मास देसमुखी व सरदेसमुखी याचा जो हक आहे तो तुह्मास धर्मादाऊ करून दिल्हा असे ऐसीयास तुह्मी वौसपरपरेने पुत्रपौत्री भक्षून अह्यास व राजेश्री छत्रपति श्वामीस कल्याण चितून सुखरूप राहणे यासि अन्यथा करील त्यास धर्मशास्राची वचने आहेत
स्वदत्ता पर दत्ता वा योहरे स्वदत्ता द्विगुण पुण्य
च्च वसुंधरा । श्वधिष्ठा पर-दत्तानु-पालन।।
या कृमी भूत्वा पितृभि परदत्तापहरण स्वदत्त
सहमज्जति ॥१॥ निष्फल भवेत्॥
ऐसी पातके स्मरोन यासि कोणी कथला करणार नाही तुह्मी सुखरूप राहणे श्वस्ति श्री शके २४ ईश्वर नाम सवत्सरे श्रावण वदी एकादसी इदु वासरे तारिख २४ मोहरम बहुत काये लिहिणे