लेखाक ७६
१६१९ श्रावणवद्य ८ शुक्रवार
श्री
जाबीता राज्याभिषेकशके २४ ईश्वर नाम सवत्सरे श्रावणवदी आस्टमी भृगुवासरे पुरातन नाम मौजे सैदापूर हाली सीवापूर नाव ठेऊन श्रीक-हाड क्षेत्रवासी समस्त ब्राह्मणासी खेरीज पुरातन ईनामदार व हकदार करून पुरातन सीमा पुस्ता राजश्री पत अमात्य यानी कृष्णाककुद्मतीसगमी सहिरण्यकुशोदक अग्रहार करून दिले त्याचे नेमणुक नावनिसीवार करून दिल्हे त्या प्रा। पाववावे मौजे मजकूर अदलशाहाचे कारकीर्दीस चावरातीचे मोईन प्रा। अज् जमीन बा। धुरुंग झाडा चावर १९
माहाल मजकूर व बाजे खर्च
माहाल मजकूर होनु बाजे खर्च अग्रहारची खटपट करावी ३४ तुबार दर माहे देखील लिहिणार व कागद करून आणावे लागताती १ अफराद दर माहे यासी दससेरी सो । ४ खडी जो कार्येभागासी, जातील येतील त्यानी येकून च्यार होनु : - यथाविभागे वाटोन घ्यावे येकूण नेमणूक प्रा। मौजे मजकुरीचे उत्पन वाटून घ्यावे व मौजे मजकुरी वसातीमुले मोहतर्फा व नख्तबाब घरटका व पुसटका व नदीशकर व तरकारी व रोकडा व जकायत व वोरनवी व बाजे उत्पन होईल ते ब्राह्मणानी नेमुणूक प्रा । येथा विभागे वाटोन घ्यावे ब्राह्मणा वेगले कोणास घ्यावयास ग्रज नाही सु।। समान तिसैन अलफ छ २१ माहे मोहरम