Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १३२
श्री
माहाराज राजाधिराज राजमान्य राजश्री पत अमात्य स्वामीचे सेवेसी विनति सेवेसी सेवक रुद्राजी चदो देसकुलकर्णी पा। क-हाड कृतानेक साष्टाग नमस्कार विनति येथील क्षेम ता। ७ माहे जिलकाद पावेतो सेवकाचे वर्तमान माहाराजाचे कृपार्दिस्टीकरिता येथास्तीत असे माहाराजानी क-हाड क्षेत्रीच्या ब्राह्मणास मौजे सैदापूर त्याचे नाव सिवापूर ठेऊन अग्राहार करून दिल्हे ते क्षेत्रा समीप क्षेत्रीचे विदवान बाधताती ब्राह्मणास गावीची उपजीविका होऊन येईना ह्मणौउन ब्राह्मणानी सागितले त्यावरी स्वामी कृपाळ होउन मौजे अटके दिल्हे त्या पत्रानिमित्य माहाराजापासी वेदमूर्ति मोरेस्वरभट व समस्त ब्राह्मण आले आहेत मजकूरची भूमी चावर ३६।१८
बिता ।
आवलजमीन चावर दुमजमीन चावर सीमजमीन चावर
२०१० १३
१८ ३
२०
देखील प्राचीन इनामदार आहे तेथील पाटील पलाले आहेत त्यासी आणायाचे येत्न केला आहे तो गाउ दोनी तीन वरसे खराब पडिला आहे स्वामीस ब्राह्मणाचा अभिमान आहे पत्र करून द्यावयास स्वामी समर्थ आहेत बहुत काये लेहू सेवक असो हे विनति
महिकावती (माहीम)ची बखर
३ ह्या नकलेला १०५ वर्षे झालीं, तेव्हां मूळ ग्रंथ नकले हुन जुना असणार हें सांगावयाला नको च. किती जुना, एवढा च काय तो प्रश्न. अन्त:प्रमाणां वरून व बहिप्रमाणां वरून ग्रंथाचा काळ ठरविण्याचा जो सर्वमान्य संप्रदाय तो ह्या ग्रंथास लावूं पाहतां प्रथमदर्शनीं च एक बाब वाचकाच्या लक्ष्यांत येते. ती ही कीं, ही बखर एक ग्रंथ नाहीं, अनेक गद्यपद्य प्रकरणांचा समाहार आहे. आजपर्यंत ज्या पांचपन्नास बखरी प्रसिद्ध झाल्या आहेत त्यां पैकीं कांहींत श्लोकादि पद्य मजकूर असलेला सर्वांच्या माहितीचा आहे. तेव्हां ह्या हि बखरींत ओव्यादि पद्य मजकूर आढळल्यास अपूर्व असें कांहीं च नाहीं. आज पर्यंत प्रसिद्ध झालेल्या बखरींत निवाडे, महजर, राजकीय पत्रें इत्यादींचा सारांशरूपाने किंवा दस्तऐवजी दाखला दिलेला जसा आढळतो तसा ह्या हि बखरींत निवाडे, महजर, इत्यादींचे दाखले आढळल्यास त्यांत हि अदृष्टपूर्व असें कांहीं च नाहीं, ह्या बखरींत गद्य आहे, पद्य आहे, निवाडे आहेत, हकीकती आहेत, लढायांचीं वर्णनें आहेत, वंशावळी आहेत, इतकें च नव्हे तर तीं तीं प्रकरणें लिहिल्याचें निरनिराळे अनेक काळ हि आहेत. उघड च झालें कीं ह्या बखरींत दिलेलीं निरनिराळीं प्रकरणें निरानराळ्या काळीं स्वतंत्रपणें निरनिराळीं लिहिलीं गेलीं आणि नंतर निदान दोन वेळां तरी एकत्र गुंफिलीं जाऊन, शेवटीं सध्यां छापिलीं आहेत ह्या स्थितींत अगदीं अलीकडे म्हणजे दीड दोन शें वर्षां पूर्वीं एकवटलीं गेलीं. हा गुंफागुंफीचा खटाटोप कसकसा होत गेला तें स्पष्ट कळण्या करितां, प्रथम बखरींतील निरनिराळ्या प्रकरणांची यादी देतों व प्रत्येक प्रकरणाचा रचनाकाल दर्शवितों.
प्रकरण पहिलें
ह्या प्रकरणाचें नांव पूर्वपरंपरा-वंशउत्पत्ती-वर्णावर्ण-व्याख्या. हें सबंद ओवीपद्यांत लिहिलें आहे. ह्याचे दोन अध्याय असून पहिल्यांत ६९ ओव्या व दुस-यांत ३०० ओव्या आहेत. पहिल्या अध्यायांत भविष्योत्तरपुराणान्तर्गत ब्रह्मोत्तरखंडाच्या व सह्याद्रिखंडाच्या आधारें वंशोत्पत्तिवर्णन केलें आहे. दुस-या अध्यायांत त्या च आधारा वरून वंशावळ व वंशधर्मनिरूपण दिलें आहे. सह्याद्रिखंडनामक ग्रंथाचा आधार ज्या अर्थी त्या प्रकरणाला घेतला आहे त्या अर्थी हें प्रकरण शक १५०० च्या सुमारास केव्हां तरी रचिलें गेलें असलें पाहिजे हें उघड आहे. तसें च"मछा पासुनि चारि ते नरहरी पर्यंत जाले कृती '' इत्यादि श्लोक ज्या अर्थी या प्रकरणांत आला आहे त्या अर्थी ह्या प्रकरणांत शक १६०० नंतर केव्हां तरी हा श्लोक घुसडला गेला असला पाहिजे. ह्या प्रकरणानें प्रस्तुत छापील बखरीचीं १ पासून ३१ पृष्टें व्यापिली आहेत. प्रकरणाचा कर्ता भगवान् दत्त म्हणून प्रकरणसमाप्तीस सांगितलें आहे.
प्रकरण दुसरें
ह्या प्रकरणाचें नांव राजवंशावळी. ह्यानें प्रस्तुत छापील बखरीची ३२ पासून ६२ पर्यंतचीं पृष्टें भरलीं आहेत. हें येथूनतेथून गद्य आहे. ह्याचा कर्ता केशवाचार्य. हें प्रकरण शक १३७० च्या फाल्गुनांत लिहिल्याचें केशवाचार्य सांगतो.
प्रकरण तिसरें
ह्या प्रकरणाला निवाडे व हकीकती असें मी नांव देतों. ह्यांत एकंदर दहा लहानमोठे निवाडे व हकीकती आहेत. एक निवाडा संवत् १४५९ तला म्हणजे शक १३२४ तला आहे. तिस-या प्रकरणाला प्रस्तुत ग्रंथाची ६२ पासून ७२ पर्यंतचीं दहा पानें खर्ची पडली आहेत. प्रकरण सर्व गद्य आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १३१
श्री कृष्णाककुद्मतीप्रसन्
स्वस्तिश्रीमत्सकलगुणालंकरण गोब्राह्मणप्रतिपालक राजमान्य राजश्री दादोपत प्रभुवर्येषु आश्रित समस्त ब्राह्मण क्षेत्र कराड कृतानेकवेदोक्त अनेक आसीर्वाद विनती उपरी आह्मी येतेसमई राजश्री पाराजीपत याचे दर्शन घेऊन आलो तेव्हा ते बोलिले की श्रीमताकडे जाऊन ताकीदपत्रे घेणे त्यावरून पुण्यास आलो श्रीमताचे दर्शन घेऊन सविस्तर वर्तमान विदित केले त्यावरून आपणास पत्र घेऊन पाठविले आहे गाव बितपसील ईनाम
१ श्रीपावकेश्वर मौजे कालवडे १ मौजे टाळगाव बो। राजश्री
१ मौजे सैदापूर समस्त ब्राह्मण नारायेण दीक्षित गिजरे
क्षेत्र मजकूर १ मौजे पाचुंद समस्त ब्राह्मण क्षेत्र
१ मौजे वाराजी वेदमूर्ती राजश्री क्षेत्र मजकूर
बापाजी कासीकर यास १ मौजे पाचमोरी बाबा दीक्षित
१ मौजे नडसी हा गाव वेदमूर्ती गिजरे यास
वासुदेवभट क्षीरसागर १ मौजे जिती बालकृष्ण दिक्षीत
----
४ उबराणी
५ तेरीज १ मौजे सेणे नरसिभट लाटकर
----- ---
९ ५
येणे प्रमाणे देह नव पा। कराड याचे चौथाई आह्माकडे दिल्ही त्याप्रमाणे सदरहू गावचे चौथाईचा वसूल जाहाला त्याप्रमाणे मखतियात मजुरा देऊ ह्मणून राजश्री बाबूराव रघुनाथ यास हि पत्र दिल्हे आहे हे वर्तमान आपणास कळावे आणि गावगना उपद्रव जाहला असेल तो मना करावा ह्मणून आपणास पत्र पाठविले आहे आह्मास च्यार दिवस लग्नाकरिता राहून घेतले ह्मणून राहिलो तरी गावगना काही उपद्रव न होय तो अर्थ करावा येतेसमई आपले दर्शन घेऊन जाऊ देशमुखी व सरदेशमुखीचा आमलाचा बहूत उपसर्ग जाहला आहे ह्मणून ऐकिले त्यास पेसजी आमलदार घेत होते त्याची पत्रे आह्माकडे आहेत त्याप्रमाणे आह्मी आल्यावर निकाल होईल तूर्त दोहीअमलाचा उपसर्ग न होय ते करावे सर्वप्रकारे ब्राह्मणाचे अगत्य आपणास आहे तेथ विशेष काये लिहिणे आह्मी सत्वरीच येतो बहुत काय लिहिणे हे अशिर्वाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १३०
श्रीशकर
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकित शृगेरीसिव्हासनाधीस्वर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामीकृत नारायणस्मरणानि
श्रीमत्सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद
क्षेत्रकरहाटक परमभक्तोत्तम याप्रती विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित
करवीरक्षेत्री छत्रसभासमवेत श्रीसमीप राहिलो असो तदनतर आपण वर्षासन भिक्षा गोपूजाबदल मौजे सैदापूर भूमी देऊन दानपत्र दिल्हे त्यास विस्वावसुनाम सवत्सरीचा ऐवज मठास पावला पाहिजे हगामी ब्राह्मण पाठवाया अनकूल पडिले नाही याकरिता प्रस्तुत आसीर्वादपत्र लिहून रा। कृस्णाजीपत पाठविले आहेत तरी भूमीबा। गोपूजा याचे पदरी घातले पाहिजेत समयास बैल पाठवून आणऊ ते ब्राह्मणमुखी ++ होतील तेणेकरून आपणास श्रेयस्कर आहे आपण मठीचा ऐवज सिध करून ठेविला असेल परतु स्मरणास्तव लिहिले असे गोपूजा पाठऊन येशे कीर्ती सपादणे सुज्ञाप्रती बहुत लिहिणे नलगे
मोर्तब सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२९
१७२२ आश्विन वद्य ७
श्री
श्री धूतपापेश्वरी जयति
श्रीमत् राजश्री रामकृष्णपत सुभेदार विजयदुर्ग स्वामीप्रति
आश्रित साग्निचित् सोमयाजी महेश्वरोपाध्याय तथा धोडदीक्षित ज्योतिषी व धर्माधिकारी व देशोपाध्ये अष्टाधिकारी तर्फ राजापूर कृतानेक आशिर्वाद विनती विशेष आपण पत्र पाठविले त्यात लिहिले कि केशव मोडक वस्ती सोलगाव याचा बापास कुणबी याणी मारिले हे केशव मजकूर यास पूर्वी समजले अस्ता बापास कळविले नाही सबब सर्कारात अटकेस ठेविला होता त्याची मोकळिक करून तुह्माकडेस पाठविला आहे तरि शास्त्रमते पक्तिपावन होय तो शास्त्रार्थ निवडून उत्तर पाठवावे आपले पत्राप्रमाणे उपाध्ये ज्योतिषी व
धर्माधिकारी याशि पत्र द्यावयास होयील ह्मणोन लिहिले त्यास शास्त्रमते करून केशव यास व्यवहारज्ञता आलि नाही षोडश वर्षांनतर व्यवहारज्ञता शास्त्रमते करून होत्ये तत्पूर्वी त्याचा व्यवहार अज्ञानकृत जाणावा मुख्य ब्रह्महत्या दोष मारणाराकडेस आहे केशव याजकडेस अनुमति दोष आहे तोहि अज्ञानत्वेकरून जाणावा यास्तव केशव यास सकल्पपूर्वक कृष्णायात्रेस पाठवावा तदुत्तरकाळी स्वग्रामी येउन सार्ध चतुरब्द प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची शुत्धता होयील याप्रमाणे शास्त्रसमत आहे ग्रामस्छ सर्व ब्राह्मणाचे समते करून करवावे बहुत काय लिहावे हे विनती सदरहू असल पत्र रो। बालाजी विश्वनाथ आपटे याचे घरास केशव मोडक पत्र घेउन आला त्याची नकल लेहून घेतली शके १७२२ आश्वीन वा। ७ मु।। कराड
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२८
१७११ फाल्गुनवद्य १०
श्री
वेदशास्त्रसपन्न राजश्री समस्त ब्राह्मण व धर्माधिकारी उपाध्ये जोतिषी प्रा। क-हाड स्वामीगोसावी यास सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सु।। तिसैन मया व अलफ को। पेण पो। साकसे येथील समस्त ब्राह्मण याणी हुजूर येऊन निवेदन केले की श्रीमत कैलासवासी नारायणराव साहेब याचे कारकीर्दीत परभूचे कर्माचरणाविशई सरकारातून ठराव करून दिल्हा त्याप्रमाणे त्याणी वर्तावे ते न करिता आपला धर्म सोडून मनश्वी वर्तणूक करून चोरून ब्रह्मकर्मे करितात येविसी त्यास ताकीद होऊन बदोबस्त जाला पाहिजे ह्मणोन त्याजवरून मनास आणिता पेशजी कैलासवासी तीर्थरूप रावसाहेब याचे वेलेस चौकसी होऊन परभूचे वर्तणुकेविसी कलमाचा ठराव जाला त्याप्रो। त्याणी सरकारात कतबा लेहून दिल्हा त्यातील कलमे बितपसींल
१ वैदिकमत्रे करून काहीच कर्मे करणार नाही
१ वैदिकमत्र जे येत असतील त्याचा उचार करणार नाही
१ भाताचे पिंड करणार नाही
१ देवपूजादीक विहितकर्मे पुराणोक्तमत्रे करूनच करू व ब्राह्मणभोजन आपले घरी करणार नाही
१ शालग्रामपूजा करणार नाही
१ ज्या देवास शूद्र जातात त्या देवास आम्ही जाऊ
१ ब्राह्मणास दडवत मोठ्याने म्हणत जाऊ व आपले जातीत हि दडवतच म्हणत जाऊ
१ वैदिक ब्राह्मण व आचारी व पाणके व शागीर्द ब्राह्मण व ब्राह्मण बायको चाकरीस ठेवणार नाही व आपले घरी हि ठेवणार नाही
१ आमचे जातीमध्ये आपले सतोषे पाट लावितील त्यास आह्मी आडथला करणार नाही
----
येणेप्रमाणे नव कलमे लेहून दिल्ही असता परभू आपले घरी चोरून ब्रह्मकर्मे करितात यामुले पेणकर ब्राह्मणाचा व त्याचा कजिया वाढोन परभूचे घरची सर्व कर्मे बद जाली त्यास येविसीचा हालीहि विचार करिता परभूचे कर्माचरणाविशई पेशजी चौकसी होऊन कलमे ठराऊन दिल्ही आहेत त्याप्रमाणे त्याणी वर्तावे ते न करिता आपला धर्म सोडून चोरून मनश्वी वर्तणूक करितात हे आनुचित पेशजी कलमे ठराऊन दिल्ही आहेत तीच योग्य ऐसे शिष्टसमते ठरोन पुण्यात परभूची घरे आहेत त्यास हुजूर ताकीद करून हे पत्र तुह्मास सादर केले असे तरी प्रा। मा।र येथे परभूची घरे असतील त्यास निक्षूण ताकीद करून सदरहू कलमाप्रमाणे वर्तवीत जाणे जाणिजे छ २३ जमादिलाखर आज्ञाप्रमाण
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
३ गुराची माने फाडावे ते समई याची कलम तपसीलवार
१ म्हनाक याने कुमडी येक घ्यावी
१ दुसरी कुमडी माननाक याने घ्यावी
१ आतडी व कान काननाकाने घ्यावी कलम १
-------
३
१ मेहतरकीचा मान घास मुटका व रानातील पेडी काडी जी मिलती माननाक
व म्हसनाक यानी दोईसाही घ्यावी कलम १
१ लक्षुमीबाहेरची जत्रा व गायजत्रा होईल तिचा मान भुडी म्हसनाक याने आणावी आणी माननाकाचे घरी रहावी मग काननाकास जेवायास बोलावे आणी तिघानी जेवावे कलम १
१ फिरती तराळकी ती जागा वरसली प्रा। करावी कलम १
१ गाव मोट व महाराटी व माहारकी व बलुते ती जागा बरोबर येता विभाग वाटून घ्यावी आणीक हजरीस माहार तिघाजणांनी उभा करावा कलम १
१ गुढेचा पाडवेचा मान लिबाचा पाला पाटील लिब देतील तो माननाक याने पदरी घेऊन मग म्हसनाक याने बालगोपाल यास द्यावा कलम १
-----
८
येणेप्रमाणे निवाडा करून महार मजकूर याची समजूत पडली कलम लिहिले बरहुकूम ज्याचे त्याणी मान उचलावे याप्रमाणे या पत्रास घालमेल जो करील तो दिवाणचा गुणेगार व देवाचा अन्याई व वतनाचा खोटा हे लेहून दिल्हे निवाडपत्र सही तेरीख छ २७ मोहरम शके १७१० कीलकनाम संवत्सरे आश्वीन वा। १४ बि॥ बहिरो आनत कुलकर्णी माजे मा। पत्राप्रमाणे साक्षी ता। वार सैदापूरकर मोकदमानी
१ लक्षुमण बिन सभाजी पा ।
१ कुषजी बिन कोनाजी पा।
१ धोडजी बिन मलजी पा।
१ जोत्याजी बिन बापूजी पा।
१ जानोजी बिन माघारजी पा ।
१ गिरजी बिन माहामाजी पा ।
१ मयाजी बिन लिबाजी पा।
१ हाणगोजी बिन राणोजी पा। मौजे मा।
१ सताजी बिन रखमाजी
१ आपाजी बिन जिवाजी पा ।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२७
१७१० आश्विन वद्य १४
श्री नकल
निवाडापत्र स्थल मोकदमानी मौजे नडसी प्रा। क-हाड व पाढर मौजे सैदापूर मोकदम महार मजकूर सैदापूरकर याचा निवाडा पाढरीचे पत्र व सरकारचे पत्र स्थलास आले त्यावरून महार मजकूर उभयतापासी राजीनामा व जामीन कतबा व करीणा व इमानपत्र घेऊन निवाडपत्र केली सु।। तिसा समानीन मया अलफ महाराची नावे बितपसीलवार ह्यसनाक वलद धोलनाक व काणनाक वलद देवनाक व माणनाक वलद कुसनाक महार कलमे तपसीलवार
२ होळीचे मानाचे कलम
१ पोली अगदी ह्यसनाक याचे घरची आणावी मग माननाक याचे घरची पोली ऐशा दोन पोल्या आणून माननाक याने होलीस बाधाव्या कलम १
१ दुसरे कलम होलीस विस्तू काननाक याने आपले घरचा आणावा आणी पानाचा विडा व खोबरेची वाटी गावचे होलीपुडे उचलावा कलम १
-----
२
१ दसरेचा आपठा पुढला विडा माननाक व ह्यसनाक याने
उचलावा कलम १
१ दिवालीचे दिवसी मागुळीचा काननाक याने उचलावा कलम १
४ गावजत्रा लक्षुमीचा रेडा मारावा त्याचा मान तपसील
१ ह्यसनाक याने रेडास खरग घालून उजवे बाजूस बसावे कलम त
१ दुसरे कलम माननाक याणे आपले घरची स्थलभरीत आस्ती आणूनं
रेडाचे सीर उचलून डावे बाजूस बसावे कलम १
१ तिसरे कलम जातेसमई लक्षुमी हासनाकाने पो घ्यावी माननाक याने
सीर व दिवा घ्यावा आणी सिववर न्यावी कलम
१ काननाकाने दुरडी घुगरेची पेडेची घागर हा मान याने उचलावा
----
४ कलम १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
आपण पाठविली गगाधराने अमान्य केली त्याजवरून आमचे शरीर स्वस्थ नसता आमची स्त्री व आह्मी वारणेत जाऊन गगाधरास भेटलो गगाधरास बोलिलो जे आमच्या शरीराचा भरवसा नाही तू क्षेत्रास चाल तुझे स्वाधीन अवघे करू ह्यणून बोलिलो गगाधराने आमच्या पाया वरि हात ठेविला आठा दिवसी येतो त्यास च्यार महिने गगाधर आला नाही पुढे बेलवडी गणेश भटानी कोटिहोम केला तेथे गगाधर आला ह्मणून अैकून गेलो गगाधरास बोलिलो जे क्षेत्रास चाल गगाधर बोलिला आपण पुढे चालावे मी उदैक येतो या रात्रौ क-हाडी कुभाराचे घरी राहिला आमच्या घरास आला नाही परस्परे इसलापुरास जाऊन वारेणेत गेला आह्मास वर्तमान कळले आणिख आह्मी मुजरत माणूस व पत्र पाठविले गगाधरास अवघे तुझे आहे स्वाधीन करतो गगाधर आला नाही अैसी तीन वर्षे पत्रे आण घालून पाठविली परंतु नाही आला सेवटी आह्मास फार बरे वाटेनासे जाले त्यास भगवत कुभार पाठविला पत्रात लिहिले की तुझ्या स्वाधीन सर्व करितो सर्व तुझे आहे अनमान करिसील माझी शफत असे गुरे ढोरे मठ कोणाचे स्वाधीन करून देखत पत्र अगत्य येणे त्याजवरून भगवता बरोबर क-हाडास आला आह्मास नमस्कार घातला सहस्त्र अन्याय क्षमा करणे त्यास गगाधराची खासगत महीष होती त्यास आह्मी पुसिले ह्मैस कोठे आहे गगाधर बोलिला महीष वारणेत चारणीस घालविली आणि महीष भगवत कुभाराचे पदरी घातली त्याचे साक्षी बाळू चितामणी नेरलीकर भगवत कुभार व खडोबा आमचे मेहुणे आमचा ह्मणून आह्मासी हि कृत्रिम केले हे हि असो गगाधरास आह्मी बोलिलो जे आह्मी वृद्ध जालो तुजला हि स्त्री नाही तु हि अशक्त जालास पुढे देवतार्चन व ससार करावयास कोणी नाही त्यास सातारियात तुझे चुलते धोडोबा नाईक याचे पुत्र नातू आहेत त्यास तुह्मी आह्मी मिळोन जाऊन घेऊन येऊन त्याची स्थापना क्षेत्रात करू तुझे हि आमचे हि सरक्षण करील त्यास गगाधर बोलिला की त्याचा आमचा द्वेष आहे बरे वाईट जाले तरि त्याचे निमित्य आह्मावरि येथील तो कामाचा नव्हे मग आह्मी गगाधरास बोलिलो की आमची कन्या चिरजीविनी सौभाग्यवती तुकाबाई व आमचे जामात रामभट्ट तुमचे व आमचे पुरोहित त्याचे स्वाधीन सर्व करू त्यास गगाधर बोलिला की फार सरस आहे मग गगाधर व आह्मी वेदमूर्ति राजेश्री भगवत गोसावी याच्या घरास गेलो भगवत कुभार व खडोबा व बाळभट्ट नेरलीकर व सदाशिवभट्ट येळगावकर बिन रामचद्र पाठक अैसे मिळुन भगवत बावास वर्त्तमान निवेदन केले गगाधराच्या अनुमत्ते पत्र लिहिले की रामभट्ट व सौभाग्यवती तुकायी याचे स्वाधीन देवार्चन व ईनाम व सर्वार्थ रामभट्टास दिल्हा, गगाधराने वडीलपणाने याचे सरक्षण करावे गगाधराचे रामभट्टानी सरक्षण करावे माये ममतेने असावे याज प्रमाणे भगवतबावा पासि पत्र लेहून दिल्हे सदरहू गगाधरास वारणेत आह्मी पत्रे दाहा पाठविली परतु त्याणे अमान्य करून आमचा द्वेष करू लागला त्याज पासी आमची पत्रे आहेत ती रद असेत पुढे गगाधरा वारणेत भिक्षेस रवाना केला त्यास शरीरास समाधान नाही सें जाले वारणेत राहिला मागुती श्रावणमासी गगाधराने भगवत कुभारास पत्र पाठविले की त्वा माझा घात केला महीषीचे वर्तमान बावास सागीतले तरि तुझे पारपत्य करीन अैसे पाठविले हा हि अन्याय सर्वस्वे आमचे भक्षून आह्मावरि फिरोन पडिला आमचा विभागी नसता साप्रदायी नसता आमचा घात इछू लागला हे वर्तमान समस्त ब्राह्मणास आह्मी निवेदन केले तेव्हा समस्त क्षेत्रस्थ भगवत बावा याच्या विचारे करून रामभट्टास आह्मी क्षेत्रा बलाऊन आपले दानपत्र व समस्त ब्राह्मणाचे पत्र श्रीमत प्रतिनिधीचे पत्र देशमुख देशपाडियाचे पत्रे देऊन रामभट्टाची स्थापना केली आह्मी तुळसीचे झाड लाविले आहे तरि सर्वत्रानी सरक्षण करावे हे सत्य सत्य सत्य
महिकावती (माहीम)ची बखर
प्रस्तावना
१ कल्याणचे सदाशिव महादेव दिवेकर यांनीं वसईचे हिरा हरि भंडारी शेषवंशी यांज कडून मिळवून ही बखर प्रकाशनार्थ माझ्या हवालीं केली. सुटी किंवा पोथीवजा नसून, बखर बांधीव पुस्तकवजा आहे. एकंदर पत्रें किंवा पानें ६९ वे पृष्टें १३८. पानाची लांबी १२ इंच व रुंदी ८ इंच. पृष्टास ओळी २५ पासून २७. अक्षर बाळबोध, टपोरें, लहान चिंचोक्या एवढें. ओळीस अक्षरें २५ पासून ३०. कागद फुलस्केप असून, त्याच्या गर्भात MAGNANI ही रोमन अक्षरें स्पष्ट दिसतात. पानें, पृष्ठें, ओळी व अक्षरें सर्व येथून तेथून शाबूत आहेत. अक्षराचा संदिग्धपणा प्रायः कोठे हि नाहीं. बखर लिहून झाल्या वर, ती पुस्तकबांध्या कडे बांधण्यास गेली. पुस्तकबांध्याने समास कांपतांना मथळ्या वरील पानाचें आंकडे कोठेंकोठें छाटले आहेत, त्या वरून दिसतें कीं मूळ पानाची लांबी १२ इंचा हून व रुंदी ८ इंचा हून अर्धा पाव इंच जास्त असावी. मूळ नकलकारानें चोहो बाजूंनीं समासाची माया सडकून ठेविल्या मुळें, पुस्तकबांध्याच्या अडाणी हाता करवीं बखरीला इजा बहुतेक बिलकुल पोहोंचली नाहीं.
२ बखरीची समाप्ति अशी:- "शके १७४१ प्रमाथिनामसंवत्सरे माहे वैशाखशुद्धप्रतिपदा रविवासरे ते दिवसी वंषावळिलेख समाप्तः ॥ हस्ताक्षर वालजी पाटिल सिंधे शेषवंशि वस्ती वसइं बाहादरपुरा हे वंषावळिची पोथी राजश्री हीराजी रामजी राउत सिंधे शेषवंशी वस्ती वसइ बहादरपुरा यांची असे ॥ पत्रे सुमार ॥ ६९ ॥ ” शक १७४१ च्या वैशाखशुद्धप्रतिपदेस रविवार येतो. मित्ती बराबर आहे. अर्थात्, शक १८४६ च्या वैशाखशुद्धप्रतिपदेस ही बखर नक्कल करून बरोबर १०५ वर्षे झाली. वसईचे हीराजी रामजी राउत सिंधे शेषवंशी यांच्या करितां वालजी पाटिल शिंदे शेषवंशी यानें ही नक्कल केली. वालजी पाटिलाचें अक्षर इतकें सुवाच्य व वळणदार आहे कीं नकलकार ब्राह्मणेतर असेल असा संशय सुद्धां, त्यानें आपले नांव, गांव व आडनांव नमूद केलें नसतें तर, आला नसता. शक १७४१ त महाराष्ट्रांतील पाटिल लोकांना अक्षरओळख सुद्धां फारशी असण्याचा संभव नव्हता. असें असतां, वसईच्या ह्या वालजी पाटलानें इतकें सुवाच्य व वळणदार अक्षर लिहावें हें सकृद्दर्शनीं आश्चर्य वाटण्यासारखें आहे. परंतु, मुंबईच्या इंग्रजांच्या अमला खालीं वसई प्रांत येऊन शक १७४१ त सुमार पन्नास वर्षे झाली होतीं ही बाब लक्ष्यांत घेतली असतां, वालजी पाटील इतका अक्षरचंचू कसा झाला ह्या बाबीचा उलगडा होतो. शक १७४१ च्या पूर्वी मुंबई बेटांत इंग्रज सरकारानें व मिशन-यांनीं कांहीं मराठीं व इंग्रजी शाळा काढल्या होत्या आणि त्या शाळांतून ब्राह्मण, प्रभू व इतर वरिष्ठ जातीचीं कांही मुलें शिकून सरकारी व व्यापारी नोक-या मिळवीत. ह्या मुलांत वसईच्या पाटलांचीं व राउतांचीं कांहीं मुलें असण्याचा संभव आहे. अगदीं प्रथम मुंबईच्या ज्या घराण्यांस अक्षरविद्येची ओळख झाली ह्या घराण्यांत राउतांचें घराणें प्रसिद्ध आहे.