पुणतांबे-जोसी
लेखांक २५४ * १५२८ पौष वद्य २
१ अज दीवाणे रख्तखाने खास बाजानिबू हुदेदारानी व खोतानी हाल व इस्तकबाल
२ व मोकदमानी कसबे पुणताबे पा। संगमनेर बावी बिदानद सु॥ सन सबा अलफ बा। हासी-
३ ल जकाती पैकी बा। ईनाम बा। माणीक जोसी बीनत रतनजोसी सा। कसबे मज-
४ कूर बंदगी हजरती मालूम केले जे आपणासी ईनाम आदा हासील जकाती कस-
५ बे मजकूर पैकी घोनस्केड ६ बा। फर्मान बसिका खास करकीर्दी बा। बु-
६ र्हान स्या व भोगवटे वजीरानी व मुकासाइयानी प्रमाणे भोगवटा व तसरुफा-
७ ती ता। सीत अलफ चालिले आहे व हुजती बसिका खास व भोगवटे वजीरानी
८ व मुकासाइयानी होते ते मोगलाचे फीतवेयामधे गु॥ जाले आहेती त्यापै-
९ की ममलकत मदारी मलीक अंबर भोगवटा आहे माहाली कारकून ताजा
१० फर्मानाचा उजूर करिताती तरी मोकरर फर्मान मर्हामती होये मालूम जाले बा।
११ इसरुफाती दीवाण आला माणीक जोसी बीन रतनजोसी सो। कसबे मजकूर या
१२ चा ईनाम सदरहू बा। हुजती सदरहू प्रमाणे मोकरर केले असे भोगवटा
१३ व तसरुफाती ता। सीत अलफ जैसे चालिले असेली तेणेप्रमाणे अज इ॥
१४ ---------------- पासून आदा करीत जाईजे हुजती बसिका खास
१५ व कितेक भोगवटे वजिरानी व मुकासाईयानी मोगलाचे फीरकेयामधे गु-
१६ मा। जाले आहेती त्याचा उजूर न कीजे औलाद व अफलाद चालवीत जाइजे
१७ दरहरसाल खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक घेऊनु असेली फिराऊन दीजे
मो-
१८ करर बा। पा।ळून एकंदर ईनाम बराये सबा अलफ तेरीख १५ माहे रमजा-
१९ नु दरान रुके सा। रा। मोर्तब सूद
(शिक्का फारसी आहे)
रुजूमुश्रीफ
रुजू सुरनवीस
तेरीख १७ माहे जीलकादी खमस असर अलफ
फा। मीर्जा अहेलील फते
सप्रसूद तालीकसूद सप्रसूद सप्रसूद सुप्रसूद
मुश्रीफ दफ्तरखास मोर्तब सुरनिवीस
बार सूद बार सूद बार सूद बार सूद बार सूद
तालीक सूद