लेखाक १०७
१६४४ चैत्रशुद्ध ११
श्री
अज् स्वारी राजश्री चिमणाजी माणकेस्वर ता। मोकदमानी मौजे वडगाव १ मौजे कारवे १ मौजे सेरे १ पा। कराड सु।। सन इसने असरीन मया अलिफ मौजे मजकूरच्या जोतिसाचा कथला वेदमूर्ती रा । गोपालभट व केशवभट गिजरे याचा व शामभट व भिऊभट याचा आहे ऐसियासी कारवे मुकामी याचा कथला निवडावा ऐसा केला त्यास देशकाही अर्ज केला की वर्शप्रतिपदा जाले उपर निर्वाह करून देऊ त्यावरून वतन अमानत केले नहोते हाली वतने अमानत केली असत जे निवाडा होई तो पावेतो अमानत असो देणे कार्य प्रयोजन लग्नमूर्ती होईल त्याचे ते दिवाण रुजू न करणे छ ९ साबान
