लेखाक ११६
१६४७ मार्गशीर्ष वद्य १०
श्री
ता सौजेन्ये- मोकदमानी मौजे सैदापूर ता। हवेली पा। कराड यासी माहादाजी कृष्ण आ। देसमुख पा। मजकूर सु।। सीत असरीन मया अलफ वेदशास्त्र सपन्ये राजेश्री वीरेश्वरभट गिजरे हे राजेश्रीस्वामीचे तीर्थपुरोहित या करिता मौजे मजकुरी अग्राहारपैकी ईनाम इदलशाही जमीन बिघे । तीस बिघे जमीन ईनाम कुलबाब कुलकानू दिल्हा असे त्या जमिनीची देसमुखीची हकदारी भटगोसावी यास माफ केली असे तरी सदरहू जमीनीचे हकदारी होईल त्याचा तगादा वेदमूर्तीस न करणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर न करणे जाणिजे छ २३ रबिलाखर
मोर्तबसुद