लेखाक ११४
१६४५ भाद्रपद वद्य २
श्री
आज्ञापत्र राजश्री कृष्णाजी विठल ता। मोकदम मौजे कारवे मौजे वडगाव पा। कराड सु।। सलास अशरीन मया अलफ मौजे मजकूरचे जोतिषीपणाचे कजिया गोपालभट गिजरे व शामभट करमरीकर यामध्ये लागला याकरिता तुम्हास हुजूर आणून उभयेता जोसी तुमचे स्वाधीन केले की याचा कजिया निवडून देणे खरे खोटे करणे म्हणून आज्ञा केली त्यास तुह्मी आठा रोजाची मुदत मागितली होती त्यास आठ रोज होउनु अधिक जाले याकरिता याकडील हरकी गुन्हेगारीचे भटानी कतबे (दिले) आहेत त्याकडे दोनीसे रु।। येणे ते हुजूर रसदेस आणविले असे पाठवणे या कामास आबोजी माला पाठविला आहे यास उभयताकडून १ येक रुपया देवणे छ १५ जिल्हेज उभयता तुह्मी हाती घेतले आहेत श्रीकृष्णातीरी आपले बेतालीस पूर्वज स्मरोन श्रीकृष्णेमध्ये घालून ओढून काढणे कोण्हाचे भीड न धरणे छ १५ जिल्हेज भीवभट व समुद्रखाणी याचा कजिया मौजे सेरे याकडे आहे त्यास तुह्मी हाती घेतला त्याकडे शभर रु॥ येणे त्याचे शभर रु॥ देणे त्याकडील मसाला नीम रु| आबोजीस देणे