लेखाक ११५
१६४६ आश्विनशुद्ध ६
श्री
आज्ञापत्र राजश्री कृष्णाजी विठल ता। मोकदमानी देहाय मौजे कारवे १ मौजे वडगाऊ १ मौजे सेरे १ पा। कराड सु।। सन खमस अशरीन मया व अलफ गोपालभट याचा व शामभट व भीवभट या मध्ये जोसीपणाचा कजिया लागला होता त्यावरून हरदूजण हुजूर आले त्याउपरी तुह्मा त्रिवर्गास आज्ञा केली की या उभयेतामध्ये खरा कोण आणी खोटा कोण हे श्री कृष्णेमध्ये घालऊन निवडून देणे ह्यणून सागितले त्यास आध्यापी निवडून पाठविले नाही यावरून काय ह्यणावे. याउपरी हे आज्ञापत्र तुह्या त्रिवर्गास सादर केले आसे तरी ती गावीचे बारा बलुते व भवरगावीचे पाटील मेलऊन या हरदूजणास श्रीकृष्णेमध्ये घालऊन खरा कोण आणी खोटा कोण हे सत्य स्मरोन वोडून काढणे येकाची रयात करून मुरवतीने काढाल, ह्मणजे तुमचे बेतालीस नरकात जातील बरे समजून सिताबीने निवडून पाठऊन देणे जाणिजे छ ४ मोहरम