लेखाक १५२
श्रीशंकर
श्रीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदमूर्ती राजश्री नारायणभट व बाबदेभट गिजरे भक्तोत्तम या प्रती विशेष तुमचे कल्याण इछीत श्री पासी असो तदनतर मौजे सैदापुरी मठाचे इनाम आहे त्यास यदाचा गला काय जाहला हे कळावेया करिता लिहिले असे तरी काय गला जाहाला तो लिहून पाठविणे ह्यणजे बैल पाठवून आणवू काय ते उत्तरी पाठविणे रा। कृष्णाजी बाबजी पाठविला आहे मुग्ता सागतील त्या वरून कळेल बहुत काय लिहिणे राजेश्री आपाजीपत, देशपाडे कडील गला ४२ पावता करणे पा।
