लेखाक १५१
श्रीविद्याशकर
श्रीविद्यानरसिव्हभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदमुर्ती राजश्री नारायणभट गिजरे यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इछित
श्री पासी असो तदनतर मोजे सैदापूरचे शेताचा कौल हि पुरवला आणि लावणी झाली असता मठास विशेष गल्ला पावत नाहीं करिता लिहिले असे तरी वाटेकरी यासी सागून जो जिन्नस जाहला असेल तो आपण भट मिरजकर याच्या घरास पावता करणे ह्मणजे मठास पावेल आपण काही मठीच्या कामास अतर करीत नाही परंतु सुचना लिहिली असे आउशा प्रमाणे जिन्नस पिकेल तो पावता करणे बहुत काय लिहिणे
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57