लेखांक २६१ श्री १६२२ वैशाख शुध्द १३
सही
१ शके १६२२ विक्रमनाम संवछरे वैशाख
२ शुध १३ सुक्रवार तदिवसी वेदमूर्ति
३ कृष्णभट धर्माधिकारी कसबे पुन्यस्तंभ
४ गंगातीर क्षेत्र यासि राजश्री आर्जोजी
५ राजे भोसले लेहोनु दिधले ऐसेजे क्षेत्री
६ चे तीर्थपुरोहितपण आपण तुह्मासि
७ दिधले असे आपली परंपरा जे क्षेत्रासि
८ येतील ते तुह्मासि मान्य करितील पहिले
९ आपल्या वडिलाचे तेथे कोनापासी तीर्थ-
१० पुरोहितपणाचे लिहिले आसैल तरी
११ तेच मान्य करून हे लिहिल सही तुह्मा-
१२ स वर्षासन रुपये १० दाहा रास केले
१३ आसेती प्रविष्ट होतील हे सही१
तेरीख १० जिलकाद
सन हजार ११०९ फसली