लेखाक १६४
श्रीशंकर
श्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
राजमान्य राजेश्री सिताराम वेकाजी चिपडे वो। क्षेत्रक-हाड भक्तोत्तम या प्रती विशेषस्तु अत्रत्य कुशल जाणून स्वकीय लिहित असले पाहिजे या नतर तुह्मी विनतिपत्र पाठविले ते आले क्षेत्रमजकूरकर समस्त ब्रह्मवृदासी पूजाद्रव्य रुपये पावणाशे हे घेऊन तुह्या कडे आले आहेत यास काये आज्ञा ह्मणून पत्री लिहिले अशास सस्थानचे आगमन क्षेत्रमजकुरास होऊन आजी येकोणीस दिवस जाहले परतु क्षेत्रस्तास येणेस गाठ न पडली आणि मनस्वी वर्तणूक करून सस्थानासी अमर्यादा करावी असे त्यानी आरभिले आहे तरी या गोष्टीचा विचार करून पुजाद्रव्य घेता येईल प्रस्तुत तुह्या कडे आणिले आहेत न घेणे त्यास सस्थानसबधी कसाले प्रतीवर्षी पडू लागले तेव्हा त्याणी कोठवर सोसावे काही स्वास्ता आथवा कार्यप्रयोजन क्षेत्रात होत असावी तो हि प्रकार नाही दिवसेदिवस ब्राह्मणास काल कठीण चालला आहे याज करिता त्यास हरयेक विसी अनुकूलता न पडली ईश्वरइछानुरूप काल सानकूल होईल त्या समई ते घर प्रती मठास आणून देतील सदरहू प्रो। येवज न घेणे बहुत काय लिहिणे रा। छ २१ माहे शाबान आज्ञेयमुल्लसति