लेखाक १६५
बाळबोध
श्रीविद्याशंकर
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिहासनाधीश्वर श्रीमत्छकराचार्यान्वयसजातअभिनवश्रीविद्यानृसिहभारती
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायण
स्मरणानि
स्वस्ति श्रीमत्यजनादिषट्कर्मानिरत वेदमूर्ति राजश्री समस्त ब्रह्मवृद व दिक्षित व नारायणभट्ट दिक्षित वास्तव्य क्षेत्रकराटक या प्रति विशेषस्तु तुमचे निरोप घेउन मठास आलो निरतर स्वकिय कुशळपत्र पाठउन मानस तोषवित असावे तदुपरि मसुरकरानि पुजाद्रव्याचे सकल्प तुमच्या विदमाने केले आहे तरि त्यास तुह्मि लेहुन पुजाद्रव्य आणउन अताजि शिवदेव या समवेत पाठवणे या विशई आलष्य न करणे वरकड अर्थ याचे वाग्विलासे कळल बहुत लिहिणे नलगे तुमचे क्षेत्रि काय उरवरित असेल ते हि या पासि देउन पाठवणे
