भोर-सांगवी-निंबकर
लेखांक २६४ श्री १६३९ कार्तिक शुध्द १
श्री हरिभक्तपरायण राजश्री नरहरी गोसावी निंबकर वास्तव्य किले विचित्रगड गो। यांसि
सेवक मुदगल भट पंडितराय नमस्कार सुहूर सन समान अशर मया अलफ तुह्मी राजश्री स्वामीस व राज्यास कल्याण इछून ईश्वरभजन करीत आहा याकरिता तुमचा योगक्षेम चालवणे राजश्री स्वामीस अगत्य यास्तव तुह्मास नूतन इनाम तर्फ उतरोली ता। रोहिडखोरे सुभा प्रा। मावळ येथे पडजमीन बिघे २० मौजे कानवडी बिघे
१० व मौजे पळसोसी बिघे
१० एकूण वीस बिघे पडजमीन खालिसा दिल्ही असे एविशी माहालास आलाहिदा पत्रे सादर असे पुत्रपौत्र वंशपरंपरेने चालेल तुह्मी स्नानसंध्या करून कल्याण इछून सुखरूप राहाणे छ २९ जिलकाद हे विनंती