Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

याची चौकशी पाहता भिमाजी बल्लाळ याचे मुखे पुरवणी जाहली नाही आणि पुत्रधर्म आजपर्यंत पाहता किमपि घडला नाही व महजरात सखाराम भिमाजी स्पष्ट ऐसा उत्धार आहे आणि स्त्रीस पुत्र घ्यावयाचा अधिकार नाही त्याज वरून पुत्र घेतला नाही ऐसे जाहले या प्रमाणे चौकशी पाहून सखाराम भिमाजी ठरले येणे प्रमाणे दोन्ही दत्तकाची चौकशी भिमाजी बल्लाळ याच्या वस्तू पुरवणी जाहली नाही याज वरून दोन्ही दत्तक ठरली नाहीत सबब

१ भिमाजी बल्लाळ १ सखाराम भिमाजी

मातुश्रीचे मरणवार्ताश्रवणानतर क्षौरपूर्वक दशात अशौच धारण करून तदती सपिंडी करून श्राध करावे हा पुत्रधर्म घडला नाही

१ कृष्णाजी बल्लाळ याच्या करीण्यातील कलम आपले कनिष्ट बधू सदाशिव गोसावी याचा विभाग वाटणीस येईल त्या प्रमाणे आपण विभाग घेऊन समजोन राहू यास हि येणे प्रमाणे लेहून दिल्हे आहे जोती बल्लाळ याचे नकल भिमाजी रघुनाथ बाजी याचे नकल बापूजी बल्लाळ याचे सोने चोरानी नेहले ते रघुनाथ याची स्त्री आहे तीस मशारनिले वर पाच तोळ अन्नवस्त्र त्रिवर्गानी द्यावे १ घातले ते त्रिवर्गानी मशारनिलेचे गावगन्ना इनाम जमीनी व वर्षासने सोने द्यावे १ असतील ती त्रिवर्गानी यथाविकालातरी उगवल्यास यथाविभा- भाग भक्षावी १ - गे त्रिवर्गानी घ्यावे इमारती असतील ती सदरहू प्रमाणे

येणे प्रमाणे दोन्ही दत्तकाची पुरवणी जाहली नाही ह्मणून निवाडपत्र दिल्हे असे त्रिवर्गबधूनी यथाविभागे आपलाला विभाग घेऊन स्वस्तिक्षेम असावे

येणे प्रा। जबानी विठलभट पढरपुरे या प्रमाणे आपणास विदित आहे ज्याजती ठाऊक नाही कलम १

जबानी बाबू जगनाथ कुमठेकर भिवाजी गोसावी याचा मजकूर विचारला त्यास माहादेवबावा यानी मुज केली एैसी आपणास ठाऊक नाही दत्तविधान जाहले न जाहले ऐसे स्मरण नाही १ येणे प्रमाणे दत्तकाची चौकशी पाहतां साक्षी निशी व भुक्ती निशी व कागदपत्रा निशी पुरवणी जाहली नाही

मग साक्षीदार आणून विचारले की तुह्मी सत्यपूर्वक काय आसेल ते सागावे त्या वर साक्षीदारानी ब्रह्मसभेस येऊन सागितले की दत्तविधान जाहले नाही आणि माहादेवबावा बोलिले की आह्मी ब्रह्मचारी आह्मास कशास पुत्र पाहिजे ऐसे साक्षीदारानी सागितले आणि आजपर्यंत पुत्रधर्माचे आचरण पाहता किमपि घडले नाही त्याजवरून माहादेवबावा यानी भिवाजी गोसावी पुत्र काही घेतला नाही आणि पुरवणी लिहिल्या प्रमाणे जाहली नाही याज वरून पुत्र नव्हे ऐसे ठरले

महजरास जागा टाकिला आहे तो भिमाजी माहादेव किंवा भिमाजी बल्लाळ म्हणावे त्यास सागणे त्यास महजरात जागा टाकिला आहे त्याची पुरवणी आपणा कडून होत नाही ऐसे स्पष्ट लिहून दिल्हे आहे चौकशी पाहता ब्रह्मचारी यास पुत्र घ्यावयास अधिकार नाही ऐसे शास्त्रा समत व लौकिकात हि नाही त्याज वरून भिमाजी बल्लाळ असे ठरले

भिमाजी गोसावी याचा करीन्यातील कलमे
१ जोतीपत याचा पुत्र सखाराम हे औरस किंवा दत्तक किंवा मानसिक हे सागावे कलम १

जोतीपताचे मृत्यसमई आमची मातुश्री व बधू बाजीपत या उभयतानी त्यास सागितले की हा मूल तुला दिल्हा पुढे त्या मुलाच्या व्रतबधसमई जोतीपताचे स्त्रीचे माडी वर बैसऊन गुलपान वाटिले पाढरीचे विद्यमाने जाहले मुज्य जाहल्या वर ते च दिवशी या उपर आपणास काही च ठाऊक नाही कलम १

१ जोतीपताची स्त्री काशीयात्रेस गेली तिथे च तिचा काल जाहला तिचे उत्तरकार्य तेथे धर्मपुत्र घालून केले येथे कळल्या नतर तिजला पुत्र दिल्हा असता आणि श्राधपक्ष आजपर्यत जोतीपताचे व त्याचे स्त्रीचे केले नाही आणि बाजीपत करीत आले आणि तीर्थरूपाचे व बावाचे हि श्रात्धपक्ष आजपर्यत बाजीपत करीत आले

लेखाक २७७
१७०८-१७०९

श्री
करीण्यातील कलमे भिमाजी गोसावी याची पुरसीस केली
१ महादेव गोसावी यानी क्षेत्रकराड येथे भिमाजी गोसावी यास पुत्र करून माडी वर घेतला हे पत्रानिशी व साक्षीनिशी पुरऊन देऊ हे लि।। खरे दत्तविधान करून घेतला इतकी पुरवणी करून देऊ न देऊ तर वादास खोटे
याचे उत्तर
१ पत्रानिशी व भुक्तिनिसी पुरवणी जाहली नाही मग साक्षीनिसी पुरवणी करून देऊ ह्मणोन लि।। ते साक्षीदार कोण आहेत ते सागणे त्याज वरून साक्षीदार नावनिशीवार
१ गोपाल जोसी                  १ माणिकभट पढरपुरे
१ रघुनाथभट गिजरे            १ विटलभट पढरपुरे
१ भाऊ देशपाडे                १ बाबूराव जगनाथ
---                                ---
                                     ३
जबान्या साक्षीदाराच्या
जबानी गोपाल जोसी भिमाजी गोसावी याची मुज माहादेव गोसावी याच्या माडी वर केली या उपरातिक आह्मास काही ठावके नाही
कलम १

जबानी माणिक दीक्षित पढरपुरे भिमाजी गोसावी याची मुज्य कोणाचे माडी वर केली ठाऊक नाही त्या समई सईबाईने विचारले की या मुलास ब्रह्मचारी करिता किंवा ग्रहस्ताश्रमी करिता त्यास महादेव बावा बोलिला की ब्रह्मचारियास पुत्र कशास पाहिजे त्यास तो ग्रहस्ताश्रमी होईल या पेक्षा आह्मास काही ठाऊक नाही कलम १

जबानी रघुनाथभट गिजरे यास विचारिले त्यानी माणिकभट पढरपुरे याणी सागितल्या प्रमाणे त्यानी हि जबानी सागितले येणे प्रो। कलम १
जबानी भाऊ देशपाडे यानी उभयतानी सागितल्या प्रमाणे देशपाडे यानी संगितले ज्याजती काही टाऊक नाही कलम १

लेखाक २७६
१७०८-१७०९

श्री
करीन्यातील कलमे भिवाजी गोसावी यास विचारली जोतीपंताचा पुत्र सखाराम हे औरस किंवा दत्तक किंवा मानस हे सागावे कलम १
याचे उत्तर जोतीपत याचे मृत्य समई आमची मातोश्री व बधू बाजीपत या उभयतानी त्यास सागितले की हे मूल तुला दिल्हे पुढे त्या मुलाच्या

वृतबधसमईं जोतीपत याचे बायकोचे माडी वर बसऊन गुळपान वाटिले पाढरीचे विद्यमाने जाले मुज्य जालिया वरी ते च दिवसी
या उपर पाच जणानी मिळोन ति-हाईत हरीपत याचे वाडियात गेला की आपल्या आपल्यात समजावे त्यास हरीपत हे हाकीम किंवा ईतलागी ग्रहस्त किंवा वतनदार आपल्यात समजावे ऐसे असता तेथे कटकट होवयास कारण काय हे सागावे कलम १

याचे उत्तर हरीपत हे सुखवस्तु ग्रहस्त याच्या वाड्यात आह्मी बोलिलो की विभाग दोन करावे एक माहादेवबावा व एक बाजीपंत ऐसे दोन करावे याज वरून हरीपत बोलिले की तुह्मी दोन वाटे क्षेत्रकराड येथे जाऊन करून घेणे साप्रत आता भाडे व सोने व रुपे पाच ठिकाणी करून घेणे याज मुळे कटकट झाली पचाईत तुह्मी मेळविल्ले किंवा हरीपत यानी नेमून दिल्हे हे सागावे १ पचाईत मेळवणे ह्मणाल त्या वरून आपण पचाईत मिळविले उभयतानी पचाईताची नावे वेदमूर्ति चिटकभट आफळे व श्रीपतभट नि॥ घोरपड व वीठ्ठलपत कुलकर्णी व निबाजी पाटील व हरीपंत

कलमझाडी

भीमाजीबावा क्षेत्राहून गावास गेला की गावी समजावे तेथे गेल्या वर गावकरानी सदाशिव गोसावी यास सोन्याच्या वाटणी विषई कित्तेक प्रकारे सागितले की जैसी वाटणी बैसेल तैसी करावी ती वाटणी किती ठाई करावी कैसे सागत होते ते व चिमणगावास जाऊन फडशा करून घेणे ह्मणोन थळ घेतले ते कोणत्या कलमाचा फडशा ते सागावे कलम १

गावकरी याणी सागितले की सोने व रूपे याची बूड आहे ती पाच ठिकाणी घेणे व आहे तैसी त्यानी घ्यावी ये विषई येथे न समजता तर मौजे चिमणगावास जाऊन समजणे त्यास आह्मी थळास गेलो येक महिना राहिलो तेथून आलो

थळाहून गावास येऊन पचाईता पासि बोलिलो की हकीमापाशी आह्माकडून तुह्मी कर्ज वारविले ते कर्ज कितवा विभाग वारिला त्याची नावे काय कोणत्यास कर्ज दिल्हे ते व बाजीपत विद्यमानी असता सदाशिव बावा यासी व कजिया करावयाशि कारण काय हे सागावे याचे उत्तर कर्जाचा विभाग दोन हिसे रुपये १९०॥ व तीन हिसे राहिले ते त्रिवर्गानी कैसे समजते ठाऊक नाही आषाढमासी बाजीपत मृत्य पावले विद्यमानी नव्हत कर्जदाराची नावनिसी याद अलाहिदा पचाईता पाशी आहे माघून तकरीर लेहून दिल्ही त्यात लिहिले की मूळपुरुष दोघे वडील महादेव गोसावी व धाकटे बाळाजीपत त्यास माहादेवबावा यास पुत्र नाही याज करिता त्यानी पुत्र भीमाजीबावास घेऊन क-हाडी आपल्या माडी वरी मुजी केली त्यास पुरसीस करिता माहादेवबावा हे ब्रह्मचारी ऐसे असता त्यानी पुत्र घेऊन मुज केली ते वारणे समई बाळाजीपत विद्यमानी होते किंवा मृत्य पावले हे व मुज केल्यापासून आज पावे तो पुत्रधर्म अवघे चालत आले किंवा लोप होत आला ते व पुत्र घेतला तो दत्तविधान करून घेतला किंवा उगी च मुज केली ते सागावे कलम १

बाळाजीपत असताना माहादेव गोसावी व बाळाजीपत याचे विद्यमाने बाजीपत व जोतीपत या दोघाची मुजी केली मग बाळाजीपत मृत्य पावले मग भिमाजी बावा याची मुजी माहादेवबावानी केली व कृष्णाजीपत व सदाशिवबावा याची मुजी बाजीपत याणी केली माहादेवबावा ब्रह्मच्यारी यानी आपले सौस्तानास अधिकारी पाहिजे ह्मणून घेतला हा काळ पर्यंत कर्म करू दिल्हे नाही चौघे बधू याणी पुत्रत्वाचे धर्म चालले नाहीत दत्तविधान करून पुत्र घेऊन मुजी केली ।।

पचाईता जवळ जामीन भिमाजीबोवनि देऊन विभाग अवघेयाचे विद्यमाने केले ह्मणोन लिहिले त्यास घरातील जराबाजरा व देणे घेणे व इनाम व वृत्ति व सर्व अवघा भाऊपणा किती ठाई विभाग करून दिल्हा काही पदार्थ वाटावयाचा राहिला आहे किंवा नाही हे सागावे कलम १

भाडी मात्र वाटिली त्यात दिकत राहिली वरकट वाटा काही भरून पावलो नाही वाटे व्हावयाचे आहेत भाडी पाच ठिकाणी दिल्ही
ज्याचा विभाग त्यानी घेऊन आपले घरास गेले ह्मणोन लिहिले त्यास पुरसीस करिता तुह्मी बोलिला की कोणी घेतला कोणी घेतला नाही त्यास घेतला ते कोण न घेतला ते कोण न घ्यावयास कारण काय ते सागावे कलम १

त्याची नावे बाजीपत याणी चौघे जण याच्या घरात भाडी नेणे ह्मणोन सागितले त्यास कृष्णाजीपत हे घरात नव्हते व सदाशिवबोवा याचे घरात नेऊन ठेवणे ह्मणोन बाजीपतानी सागितले त्याज वरून ठेविली ते नतर बाहेर गेले ॥१

विठ्ठल रघुनाथ कुलकर्णी याच्या देण्याचा मजकूर व सोन्याचा मजकूर तकरीर यात लिहिला त्यास पुरसीस करिता तुह्मी बोलिला की वाटणी जाहली नाही व या प्रमाणे लिहून हि दिल्हे ऐसें असतां हा मजकूर ल्याहावयास कारण काय हे सांगावे कलम १

विठ्ठल रघुनाथ याचे देणे हाकीमाची जबरदस्ती करून आमचे मागे लावले सोनेयाची वाटणी आह्मा वर बूड घातली ह्मणून आह्मी वाटणी करवून दिल्ही नाही आपल्या आपल्यात कटकट होऊन क्षेत्रास आले ती कटकट कोण कोणात जाहली व बाजीपत क्षेत्राहून देवास गेले अस्ता तुह्मी वेकण जोशी यास विचारून माघारे गेला तें कारण काय हे सागावे आणि कटकट कोणत्या कारणाची हे सागावे कलम १
बाजीपत यासि व आह्माहसी कटकट व्हावयास कारण काय ह्मणऊन लिहिले त्यास बाजीपत यासी आपण बोलिलो की आमचा महादेव गोसावी याचा निमे वाटा देणे ऐसे बोलता त्यास ते वाटा नाही ऐसे ह्मणाले ह्मणौन आह्मी बोलिलो की श्रीस्वामीचे पादुका वरील तुळसी काढून देणे ते ह्मणाले की तुळशी देऊन आपला निर्वश करून घेणार नाही ऐसे बोलून क्षेत्रास चला त्यास ते व आह्मी उभयता क्षेत्रास आलो ते काही येथे राहिले नाहीत ते देवास गेले मग आह्मी येथे राहणे किमर्थ उभयता वादे येथे आलो ते गेले ह्मणऊन आपण व्यकण जोसी यास विचारून गेलो

बद ३ पुरवणी

श्री धुळु देवाची पूजा मी तुह्मास दिली त्यासंबंधाने वेद्य भक्त भाई येतील त्याचे नवसाचे सोने मोती व रूपे ताबे व जनावरे-बैल ह्मैस, घोडा, गाव वगैरे उत्पन्न येईल ते तुह्मी घ्यावे. बगडाचे जे उत्पन्न येईल तें तुह्मी घ्यावे व देवापाशी नक्त पैसे येतील ते तुह्मी घ्यावे, व बगडागळाचे सामान तुह्मी ठेऊन गळ टोचून बगडा तुह्मी धड करवावे, तेथील पान व मुलवटी भरून तुह्मी घ्यावे धडशाचे पावतका (पादुका) पाशीं उत्पन्न येईल तें घडशानी घ्यावे. पोषाश वगेरे सामान तुमचे स्वाधीन देव तुमचा आणि तुह्मी देवाचे पुजारी यात कोणाचा संबंध नाहीं देवास पांघरूणचिरगुट वगैरे पोषाख येईल तो तुमचा, शीवाय च्यार चाहूर जमीन देवानजीक जिराईत तुह्मास मिरास करून दिली आहे, व परगणे फलटण येथे दोन चाहून इनाम करून दिली आहे त्या प्रमाणें ते दोन चाहूर तुमचे दुमाला करतील; व श्रीभीबाई देवीची तुमचे मार्फत पुज्या अर्च्या तुह्मी करवावी, ब नवसाच्या परज्या तुह्मी आपले हाते सोडवाव्या त्या प्रकर्णी जे उत्पन्न येईल ते तुह्मी घ्यावें, याशिवाय आमचे तोफखान्याचे रुपये पारखण्याची पोतदारीचे वतन तुह्मास दिले आहे खांडवा, वाटी, पानवीडा लग्नाचा तुह्मास माफ व पोतदारकीबद्दल मुशाहीर्‍या ऐवजी गावगन्ना उत्पन्न नक्त गावमार्फत करून दिले आहे

दरसाल तुह्मास बिनहरकत देण्याची गावगन्ना ताकीद निराळी दिली आहे, त्याप्रमाणे तुह्मास पावत जाईल तो अकडा खाली नमुद केला आहे तो गाववार - → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा

येणेप्रमाणे गावगन्ना नक्त मुशाहीरा इतका करून दिला तो दरसाल मिळेल, व आमचे घरी कार्य प्रयोजन वगैरे होईल तर दोन असामीचा सिध्धा तुह्मास मिळेल बाबासाहेब व आबासाहेब याचे दोन उत्सवात एकाचे दोन नारळ तुह्मास मिळतील याप्रमाणे उत्पन्न तुह्मास करून दिले आहे ते तुह्मी आपले वंशपरंपरा लेकरानलेकरी अनभवुन सुखरूप रहाणे यास कोणी आमचे वशीक मना करतील तर त्यास श्री निमजाई देवीची शफथ आहे व तो आमचे वशाचा नाही यास कोणीही हरकत करील त्यास काशी वाराणशी हेर केल्याचे पातक होईल अगर कोणी मुसलमान हरकत करील त्यास पीराची शफथ आहे दरसाल पत्राची आशंका न घेता या पत्रावर दरसाल वहीवाट करावी असी दरदारी करून ठेविली आहे जाणिजे छ १ माहे रमजान मोर्तब सूद

 

लेखाक २७४
१७०८-१७०९

श्री भैरवप्रसन्न
श्रीकरहाटकक्षेत्रस्थविद्वज्जनसमूह यानी लेहून दिल्हे निर्णयपत्र ऐसे जे भीमाजी बल्लाळ व कृष्णाजी बल्लाळ व सदाशिव बल्लाळ वास्तव्य कुमटे समत कोरेगाव प्रात वाई या त्रिवर्गा मध्ये दत्तक विषई कलह होऊन क्षेत्रमजकुरास कृष्णाजी बल्लाळ यानी येऊन विनति केली त्याज वरून भिमाजी बल्लाळ यास व सदाशिव बल्लाळ या उभयतास बोलाऊन आणून कृष्णाजी बल्लाळ याचा कज्या बा। पुरसीस केली त्यास त्याणी पचाईतमुखे न्याय होईल त्याज प्रो। मान्य असो म्हणोन विनति केली त्याज वरून त्रिवर्ग राजी होऊन राजीनामे लेहून दिल्हे बि॥

भिमाजी बल्लाळ १                 कृष्णाजी बल्लाळ १
सदाशिव बल्लाळ १                लग ०
या प्रो। राजीनामे घेऊन त्रिवर्गास जामीन पचाईतमुखे न्याय होईल त्याज प्रो । वर्तावयास जामीन आणावयास आज्ञा केली त्याज वरून जामीनकतबे बि।।
१ भिमाजी बल्लाळ यास जामीन               १ कृष्णाजी बल्लाळ मौजे वाडे
मौजे सैदापूर
१ सदाशिव बल्लाळ मौजे उपलवे
या प्रमाणे राजीनामे व जामीनकतबे घेऊन त्रिवर्ग वादे यास तकरीरा करीणे लेहून द्यावयास आज्ञा केली त्याज वरून तकरीरा करीणे लेहून दिल्हे बिता।
                                           २ पुरवणी    कलमझाड

भराडी व गोंधळी डफा वर जेवढें गाणें म्हणतात तेवढा गाण्याचा जो पद्यमय भाग तो च फक्त पोवाडा, अशी समजूत शाळिग्रामाची झाली. पद्यभागाला जोडून प्रत्येक कडव्याच्या प्रारंभाला, मध्यें व शेवटीं भराडी व गोंधळी जो गद्य भाग म्हणत असतात तो भाग पोवाडा नव्हे, अशी समजूत शाळि. ग्रामाची झाली. त्या मुळें शाळिग्रामानें छापिलेला प्रत्येक पोवाडा अपूर्ण राहिला. प्रत्येक पोवाड्याच्या प्रत्येक कडव्याच्या आदीं, मध्यें व अंतीं शाहीर जो गद्य भाग स्पष्टीकरणार्थ म्हणतो तो संप्रदायशुद्ध पद्धतीनें म्हणणा-या जाणत्या पटाईत शाहिराच्या तोंडून जसा चा तसा उतरून घेऊन गद्यसंवलित पद्य शाळिग्रामानें छापिलें असतें म्हणजे त्यानें सबंद व संपूर्ण पोवाडा छापिला असें म्हणतां आलें असतें. पोवाडा हें केवळ श्राव्य काव्य नव्हे. हें दृश्य काव्य हि आहे. पोवाडा हें एकप्रकारचें नाटक आहे. त्यांत अनेक पात्रें असतात. मुख्य शाहीर व त्याचा साथीदार हे दोघे पोवाड्यांतील व्यक्तींच्या सोंगांची बतावणी करतात. कडव्यांत वर्णिलेल्या प्रसंगांतील मुख्य पात्राची बतावणी मुख्य शाहीर करतो व गौण किंवा प्रतिस्पर्धी पात्राची बतावणी साथीदार करतो. मुख्य पात्राची बतावणी मुख्य शाहीर किंवा गोंधळी तर करतो च. परंतु त्या हून हि आणीक एक काम शाहीर करीत असतो. नाटकांत ज्याला सूत्रधार म्हणतात व ज्याचें काम नाटकांतील संविधानाचें सूत्र अथ पासून इति पर्यंत सबंध ठेवावयाचें व उकलावयाचें असतें त्या सूत्रधाराचें ति-हाईतपणाचें हि काम शाहीर करीत असतो. बतावणीचें व कथानकाचा धागा शाबूत ठेवून कथेचें तात्पर्य ति-हाईतपणें सांगण्याचें काम शाहीर ऊर्फ सूत्रधार कांहीं गद्यांत करतो व वीरश्रीचा अतिरेक झाला असतां एकदम पद्याच्या वातावरणांत उड्डाण मारतो. वीरश्रीचा संचार होऊन जे वृत्तमय बोल शाहीराच्या मुखांतून प्रतिभेच्या विकसनानें अनिवारपणें प्रस्त्रवूं लागतात ते बोल पोवाडानामक चंपू काव्यांतील पद्य होत. वीरश्रीच्या आगीनें धगधगणारें व रसरसणारें तें पद्य सहजच तुटक असून, कथानकाचा बराच मोठा भाग अध्याहृत ठेवितें. तो अध्याहार शाहीर योग्य अभिनयानें गद्य भाषेनें पुरा करून दाखवितो. कोणी समजेल कीं हें गद्य भाषण कुचकामाचें असेल. तर तसा भाग नाहीं. शब्दांची ठेवण, म्हणण्याचा ठसका, विकारांचा हुंदका, वगैरे काव्याचे जे जे कांहीं ढंग पद्याच्या ऊर्मीत आविष्कृत करण्यास सवड सांपडत नाहीं ते ते सर्व नखरे शाहीराच्या जिव्हे वर नाचणारी सरस्वती वैशिष्यें करून गद्य भागांत च दाखविण्याची हौस बाळगिते. ह्या करितां, सबंद पोवाडा ज्यांस ऐकावयाचा व पहावयाचा असेल, त्यानें ह्या गद्य भागाला काट देण्यांत मतलब नाहीं. असले हे गद्यपद्यमय पोवाडे महिकावतीच्या केशवदेवाचे महिकावतीच्या आसपासच्या प्रांतांतील संस्थानिकांच्या ऐकण्यांत व पहाण्यांत येऊन, कित्येकांना राजपितामह या आढ्यतेच्या शब्दांची चीड आली. त्यांतील धारचंपावतीच्या भोजराजाला तर अतिशय क्रोध आला. हें कालचें पोर स्वतःला सर्व राजांचा पितामह म्हणवितें, असें उद्गार काढून, भोजानें आपल्या दळवय्याला पाचारण केलें व ठाणेंकोंकणा वर हल्ला करण्याचा हुकूम केला. भोजाचें सैन्य कळव्यास येऊन ठेपलें. " परदळ देखतां केशवदेवानें देसायांना हंकारा केला. देसाय देसाय देश मिळाला. सिंध्याचा जमाव थोर झाला. नगा-या घाव घातला. कर्णे, बांके, शिंगें, डफ, काहाळा, विराणीं वाजलीं. पाइकापाईक झाली. कळव्या युद्ध थोर जालें. देवनरचे विनायक म्हात-यानें राया भोजाच्या छत्रीची खीळ एक्या बाणें विंधोन पाडिली. दुस-या बाणें भोजाच्या शिरींचा गंगाळटोप पाडिला.

लेखाक २७३
१७०८-१७०९

श्री
जबानी सइ जगनाथ कुमटेकर भिमाजी गोसावी याचा मा।र विचारिला त्यास महादेवबावानी मुजी केली ये विशी आपणास ठाऊक आहे दत्तविधान जाहले न जाहले ऐसे काही स्मरण नाही.