Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २८५
श्री
१ ले व चिमणाजीपत यास बोलावून आणिले आणि ब्राह्मणानी विचारिले की पुत्र कोणता घ्यायाचा बाजीभटाचा कनिष्ट घ्यावा असे बापूभट व चिमणाजीपत बोलले तेव्हा ब्राह्मणानी पुसले की भीमदीक्षिताची आज्ञा स्त्रीस आहे की काय तेव्हा आहे असे सागितले नतर ब्राह्मणातील येक दोन असामी बोलो लागले की लग्न जाले आहे तो मूल घ्यावा धाकटा न घेणेविषईं दूषणे त्याज वरून उभयता बोलिले की बाईचा मनोदय घनश्यामभटाचा घ्यावा तुमचा सर्वाचा मनोदय बाजीभटाचा मूल लग्न जाले नाही तो घ्यावा असे बोलोन आपले बिराडास उभयता गेले नतर दोन च्यार असामी ब्राह्मण बाजीभट याचे घरास पुत्र मागावयास गेले तेव्हा बाजीभट याचे जेष्ठ पुत्र बाबदेवभट बोलिले की आमच्या घरचा कारभार तुह्मी कोण करणार आमचे तीर्थरूप घरी नाहीत आह्मी देत नाही ते भाशण ऐकोन ब्राह्मण उठोन आपलाले घरास आले नतर दादभट गिजरे श्रीभैरवास आले ते समई तात्या दीक्षित गिजरे व बापूभट उभयता आपले दरवाज्यात बसले होते त्यानी दादभटास विचारिले तुह्मी गेला होता ते काम करून आला की काय त्यानी उत्तर केले की ती गोष्ट राहिली ऐसे बोलोन आपले घरास गेले तेव्हा बापूभट यानी तात्यास विचारिले की पुढे कसे करावे तेव्हा तात्यानी उत्तर केले की तुह्मी स्वस्थ असावे नतर दुसरे दिवशी तात्या गिजरे बाजीभटाचे घरास जाऊन त्याचे मातुश्रीस चार गोष्टी पुत्र द्यावया विसी सागितल्या व तिणे उत्तर केले की बरे आहे मी उदेक येसूबाई कडे जाऊन दोन गोष्टी बोलून येईन मग सागेन त्याज वरी ती जाऊन बोलून येऊन मूल देते ह्मणोन सागितले त्याज वरून समस्त ब्राह्मण भईमदीक्षित याचे घरी मिळाले आणि बाजीभट याचे जेष्ठ पुत्र बाबदेवभट यास बोलाऊन आणिले आणि समस्तानी येसूबाईस पुसावयास सागितले की पुत्र कोणता घ्यावयाचा तेव्हा दादभट गिजरे व तात्या गिजरे हे घरात जाऊन बाईस विचारिले तेथे भीमदीक्षित याची मावशी होती तिचा आग्रह बाजीभटाचा मूल न घ्यावा घनळामभटाचा घ्यावा न पुसता उठोन दोन घटका या च विचारास
लागल्या नतर बाजीभटाचा कनिष्ट पुत्र मजला द्या असे सागितले तो बाबदेव गिजरे आपले घरास गेले दोन घटका त्याची वाट समस्तानी पाहिली सध्येचा समय जाहला याज मुळे ब्राह्मण आपलाले घरास जाऊ लागले तेव्हा तात्या गिजरे याणी समस्तास सांगितले की तुह्मी उठोन जाऊ नका मी जाऊन बाबदेवभटास घेऊन येतो ऐसे सागोन जाऊन बाबदेवभटास घेऊन आले नतर बाजीभट याचे मातुश्रीकडे येक दोघे ब्राह्मण पाठविले की बाजीभटाचा पुत्र भीमदीक्षितास द्यावयाचा विचार कसा तेव्हा तिणे उत्तर केले की तुह्मी ह्मणता त्या पक्षी देतो उत्तर ब्राह्मण सागत आले नतर माहादेव जोसी व आणखी दोनच्यार ब्राह्मण आले त्यास हि हे वर्तमान सागितले त्यानी उत्तर केले की शास्त्रा समते करीत असला तर आह्मासी दोन गोष्टी शास्त्रार्थाच्या बोलून करा नाही तर आमचे समत नाही इतके बोलून च्यार गोष्टी सागितल्या की सपिंडी जाल्यावाचून करू नये व दाता हि सनिध नाही पुण्यात आहेत त्यानी उत्तर केले जरी आमचा पुत्र तुह्मी देणार कोण मग त्यासी कोण बोलत याज करिता त्यास पत्र पाठवून उत्तर आणवून जे करणे ते करावे आणि रात्रौ हि करू नये तेव्हा समस्तानी उत्तर केले की आमचे सर्वाचे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २८४ बाळबोध
श्री
यादि येसूबाई कोम भीमदीक्षीत गिजरे इने सतती
करिता पुत्र घेतला त्याच वर्तमान सक्षिप्त समजण्या करिता
राजेश्री चिमणाजीपत नि।। येसूबाई याच्या भावाने पत्र पाठविले कि भिमदीक्षीत याचा मनोदय पुत्र घ्यावा त्याचा मजकूर काय केला याज वरून चिमणाजीपत व वो। बापुभट नि।। येसूबाई या उभयतानि वो। दादभट गिजरे व तात्यादीक्षीत गिजरे या उभयतास सागितले कि येसूबाईस पुत्र द्यावयाचा मजकूर करावा आणि कोटात हि जाऊन राजेश्री अताजीपत फडनीस व भगवतराव ढवळे नि।। सुभा यास हि मजकूर समजाविला मग तात्यादीक्षित गिजरे यास बोलाउन नेउन अवघ वर्तमान बोलून घनशाभटाचा मुल घ्यावा हा मनोदय बाईचा अहे याज वरून तात्यादीक्षीत गिजरे यानि वो। बाजीभटाच्या मुला विषई रुकार मागून सागीतले कि वरकड काय करणे ते दादभट व अमचे बाजीदीक्षीत याच्या विचारे जे करणे ते करावे दादभटास हि बोलाउन अणिल्या नतर तात्यादीक्षीत घरास गेले नतर दादभटाच व त्याच बोलणे होउन घन शागटाच्या मुला विषई दादभटाचा रुकार पडला नाहि बाजीभटाच्या मुला विषई पडला पुढे दादभटानी अपल्या घरि पाच सात ब्राह्मण मेळवून बापूभट व चिमणाजीपतास अणोन ह्या उभयताच व ब्राह्मणाच बोलणे होउन ब्राह्मणातील दोन च्यार असामी रदबदली करू लागले कि लग्न जाहले अहे तो मूल घ्यावा या विषई सर्वप्रकारे साहित्य व धाकटा न घेण्या विषई दूषणे याज वरून चिमणाजीपत व बापूभट यानि उत्तर केले कि बाईचा मनोदय घन शाभटाचा घ्यावा तुमचा सर्वाचा मनोदय बाजीभटाचा घ्यावा लग्न जाहले नाहि तो घ्यावा ऐस बोलोन अपल्या घरास गेले नतर दोनचार असामी ब्राह्मणचि बाजीभटाचे घरास गेले कि हि गोष्ट ठिक करावि ह्यणोन त्यास बाजीभटाच्या घरच्या माणसानि काहि ठिक उत्तर केल नाहि ब्राह्मण अपले घरास गेले त्या ब्राह्मणा मधील दादभट गिजरे श्रीभैरवास अले ते समई तात्यादीक्षीत गिजरे अपल्या दारा पुढे बैसले होते व बापुभट हि होते ते समई तात्यादीक्षीतानि दादभटास विचारले कि तुम्ही गेला होता ते काय करून अला त्यानि सागीतले कि प्रस्तुत ती गोष्ट राहिलि पुढे सावकाश का होईना ऐस बोलून घरास गेले तेव्हा बापूभट घाबरे जाहले पुढे काय करावे ते समई तात्या दीक्षीतानि सागीतले कि मी ठिक करून येईन तुह्मी स्वस्थ असा नतर दुसरे दिवसी तात्यादीक्षीत बाजीभटाच्या घरास जाउन त्याच्या मातोश्रीसि बोलोन ठिक करून अपल्या घरास अले येणे प्रमाणे समस्तानि वर्तमान ऐकिल अहे इतके हि समक्ष अहेत अकरावे दिवसी समस्त ब्राह्मण मेळविल्ले ब्राह्मणानि येसूबाईस विचारावे कि मुल कोणता घेता म्हणोन बापूभटास सागीतले ते व दादभट गिजरे घरात गेले तेथे येसूबाईचि मावसी होती तिचा अग्रह कि बाजीभटाचा मुल न घ्यावा घन शाभटाचा घ्यावा ब्राह्मणाच्या विचारे बाजीभटाचा घ्यावा म्हणोन करार करून अले इतके वर्तमान समस्तानि ऐकिले अहे कलम १
मुल पाहावा म्हणोन बाजीभट त्याच्या घरास रा। भगवतराव ढवळे व चिमणाजीपत व बापूभट गेले तो मुल सोप्यात होता तो रोगी पाहिला मुलाचि मातोश्री घरातून बाहेर अल्लि तीस यानि विचारिले मूल असा का दिसतो तीने सागीतले कि मडूर तोळा दोन तोळा घेतला अहे अद्यापि पथ्य करीत आहे यानि सागीतले कि अणखी तोळा दोन तोळे द्यावा ईतके सागोन अपल्या घरास गेले मग रात्रौ अस्तमानी +++
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २८३
१७४१ चैत्रशुद्ध १
नकल
श्रीजबानी सिवराम डोगरो कुलकर्णी मौजे चितळी का। निंबसोड सु।। अशरीन मया तैन व अलफ लेहून दिल्ही जबानी ऐसी जे वडील हरीपत व दुसरे कृष्णाजीपत तिसरे आह्मी ऐसे त्रिवर्ग भाऊ त्यास कृष्णाजीपत याचे पोटी पुत्रसतान नाही त्यास आह्मी आपला मुलगा जाहला ते समई आह्मी व आमचे बायकूने कृष्णाजीपतास व त्याचे बायकूस वचने करून दिल्हा आहे हाली त्या मुलाचा वृतबध गुलपान व्हावयाचे आहे हे विसी साहेबा कडे आलो त्यास गुलपान वृतबध करावयाची आज्ञा साहेबाची व्हावी ही जबानी लेहून दिल्ही सही तेरीख छ २९ जमादिलाखर ऊर्फ चैत्रशुध १
हस्तअक्षर खुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २८२
१७४१ चैत्रशुद्ध १
नकल
श्री
अज सुभा राजश्री पाडुरग वासुदेव मामलेदार पेटा खानापूर ता। मोकदमानि मौजे चितळी का। निंबसोड सु॥ अशरीन मया तैन अलफ मौजे मजकूर येथील डोगरोपत कुलकर्णी यानी येऊन समजाविले की आपणास पुत्र तिघेजण हरीपत कृष्णाजीपत सिवरामपत त्यास कृष्णाजीपत याच्या वोट्यात घालावा असा हेत आहे या करिता गावकरी यास ताकीद व्हावी ह्मणोन त्या वरून ताकिद सादर केली असे डोगरोपत याचा हेत आहे त्या पेक्षा मूल कृष्णाजीपत याच्या वोट्यात सिवरामपत याचा घालणे जाणिजे छ २९ माहे जमादिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८१
१७४१ चैत्र शु॥
नकल
श्री
जबानी डोगरो कासी कुलकर्णी मौजे चितळी का। निबसोड सु।। अशरीन मया तैन व अलफ लेहून दिल्ही जबानी ऐसी जे हरिपत व कृष्णाजीपत व सिवरामपत ऐसे आह्मास त्रिवर्ग पुत्र त्यास कृष्णाजीपत याचे पोटी पुत्रसतान नाही त्यास सिवरामपत यानी व त्याचे बायकूने मूल उपजले ते वेळेस वचने करून दिल्हे कृष्णाजीपत व त्याचे बायकूस दिल्हे आहे हाली त्या मुलाचा वृतबध गुलपान व्हावयाचे आहे त्यास माझे माहातारपण वृधापकाळ जाहला आहे आणि माझी आस्ता राहती ये विसी साहेबास विनति करून आज्ञा घ्यावयास आलो त्या वरून साहेबी समजून घेऊन मुलाचे गुलपान वृतबध करावयाची आज्ञा करावी हे लेहून दिल्ही जबानी सही तेरीख छ २९ जमादिलाखर चैत्रशुध १
हस्त अक्षर खुद १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २८०
१७२१ ज्येष्ठशु॥ १
श्री
वेदमूर्ति राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड स्वामी गोसावियासि
सेवक परशराम श्रीनिवास प्रतिनिधि नमस्कार विनति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे विशेष मैनाबाई कोम राघो कृष्ण पराडकर यास पुत्रसतान नाही या करिता श्रीकृष्णातीरी जाऊन दत्तपुत्रविधान करून घेया विसी मशारनिले या स्त्रीस सागितले होते त्याज वरून बाई याणी वो। राजश्री भास्करभट पराडकर याचा पुत्र घ्यावयाचा निश्चय करून श्रीक्षेत्रास बाई भटजी सुद्धा मुलास घेऊन विधान करावया करिता आली आहेत यास्तव ती॥ मातुश्री बाई यास व रा। मोरो अनत यास पत्रे देऊन हे पत्र तुह्यास लिहिले असे तरी तुह्मी समस्त मिळोन दत्तविधान करवणे ता। छ २१ जिल्हेज सु।। मया तैन व अलफ बहु१त काय लिहिणे हे विनति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७९
१७१० आषाढशु॥ १०
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रक-हाड स्वामीचे सेवेसी
विद्यार्थी भिमाजी बल्लाळ मु।। मौजे कुमठे सा। कोरेगाव सिरसाष्टाग नमस्कार विनति विज्ञापना ऐसी जे लिहून दिल्हे कुठितपत्र येसे जे चिरजीव राजश्री कृष्णाजी बल्लाळ व सदाशिव बल्लाळ यात व आपणात दत्तकविषयी कजिया लागोन क्षेत्रमजकुरास आलो त्यास श्रीमाहादेव बावा नैष्टिक ब्रह्मचारी याणीं आपणास पुत्र करून घेतले ह्मणून लेहून दिल्हे त्याची पुरवणी पत्रा निशी व भुक्ति निशीं व साक्षी निशी पुरवणी करून देऊ ह्मणोन लेहून दिल्हे त्याची चौकशी करिता पत्र निशीं व भुक्ती निशी व साक्षी निशी पुरवणी जाहली नाहीं येणे प्रो। सखाराम जोशी म्हणोन वाद सागत होता त्यास येथे न्याय पाहता त्यास हि पुत्रत्वास अधिकार नाही आणि पुत्रधर्म हि घडला नाहीं सबब सखाराम भिमाजी ऐसे ठरले येणे प्रो। दोन्ही दत्तके असबध जाहलीं हे कुंटितपत्र लि।। सही शके १७१० कीलकनामसवत्सरे आषाढशु।। ७ सप्तमी सु।। तिसा समानीन मया व अलफ मनोहर भिमाजी वली १६ सोळा
साक्ष
३ मौजे भोसरे प्रात खटाव
१ जिवाजी यशवत दा। रामराव गुजर पाटील मौजे मजकूर
१ यादोजी बिन वणगोजी आवतडे पाटील मौजे मजकूर१
१ आनदराव नारायण कुलकर्णी मौजे मजकूर
---
३
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
किरकोळ
लेखांक २७६ श्री ९४७ ज्येष्ट शुध्द १०
असल बमोजीब नकल नकलेची नकल
तांब्याच्या पत्राची नकल असलाप्रा। सोधून लिहिली आसे
मिरासपत्र तांब्याचे शके ९४७ आनंद नाम संवछरे जेष्ट सुध दशमी सुक्रवार ते दिवसी लिहिले ऐसे जे मौजे दिये प्रा। पुणे येथील मोकदमीचे वतन पीडनाईक कंठराऊ चव्हाण याचे वतन करार आसे काल कम यासी कोण्ही हिक हरकत करील त्याच्या वडीलावरी गधा गाढव आसे ऐसा कुपाया आसता करीना आला आपण गुमास्ता माणकोजी गव्हाणा जाधव ठेविला तो गुमास्ता बेदरी पादशाही होती ते समई बेदरास नेऊन बदखानी घातला एक वरीस तो सोडून दिल्हा मागती पुढे दो वरसानी रसद मुले दिवाणानी बेदरास नेऊन बंदी दिल्हा त्यास माणकोजी गव्हाणा जाधव याचा जावई माणकोजी खताना याने सासरा बंदी पडला ह्मणून आपली सिगरे घोडी पाच विकून रसद जमा करून दिवाण रुजू करून पदरी घालून सासरा दिवाणातून सोडऊन आणिला मग सासरियाने संखाडपटी जमीन सेत रुके २ जावइयाचे स्वाधीन वतन केले मग पुढे खता ती + + गणोजी झेंडा कुणबी चारणकर नान गा + + कर कुणबीयासी सेत ठाण जरथल + + सेत लाविले त्यास सेत रयतावा करून असावे त्यास पुडे जबरदस्ती करून दिवाणचे रसद होन ७५ बेदरास घेऊन जात होती ते समई ऐवजखान हबसी याची बहीण दुर्गादेवी दिये गावामधे होती तिची पाठ करून दिवाण रसद बेदरास जात होती ते वाट मारून दिवाण रसद लुटून मारा केला ते समई वाटेस मा।रिले मल्हारजी खताता व मल्हारजी नाईक व माहर १ ऐसे तीन खूण जाले तेथून कलह लागला मग पुढे गणोजी झेंडा याने येऊन गावावरी छपा घालून मारा केला ते समई लोक पडिले बितपसील यशवंतराऊ कंठराऊ चव्हाण याचे लेक दोघे व नातू एक ऐसे चौघे जण व पाचवा + + इरासीत काले ऐसे पाच जण जिवे मारिले त्याचा बाइका चौघी सती निघाल्या ऐसे जाले तर त्रास देऊन आपण वतनावरी बैसोन खतातीयानी वतनाचा खेला ह्मणून आपण आणी महारास तुज कैसे मारावे ह्मणून जीवदान देऊन मूलानदी उतरून पिपलीयास आपाजी बोरगुल व आपाजी व हिरोजी व नाइकोजी याजपासी जाऊन दमला आपण वतन आनभऊन होतो त्यास आपला इनाम चावर दोन त्यामधे बाबी ४ च्यार व वाडी महातीची टाकी पाणीयाची पाच आहेत श्रीदेव कांतोबायाचे ठावे बाजूस वीराचा बाग याचे सेजारी बेराणा सालियाचा वाडा त्याचे वरता पीड नाइकाचा वाडा ऐसे वतन आनभऊन होतो मग पुढे कथला यामुले त्रास होऊन मानदेसी कुकडवाडास + + तीमधे आलो हे लिहिले* सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २७८
१७१० आषाढशु॥ ८
नकल
श्रीकृष्णककुद्मतीप्रीतिसगमो विजयति
राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकरहाटक ता। मोकदमानि मौजे कुमटे सा। कोरेगाव प्राप्त वाई यास आज्ञा केली ऐसी जे भीमाजी बल्लाळ प्रभृति बधू वास्तव्य मौजे मा।र याचे आपण पाच विभाग केले म्हणोन सागतात तुह्मी करून दिल्हे असता गैरमान्य होऊन दत्तकाची चौकशी करिता भिमाजी बल्लाळ याज कडून पुरवणी जाहली नाही म्हणून दत्तक ठरला नाही याज वरून निवाडपत्र करून दिल्हें ते अलादा आहे च्यार विभाग करावे त्यात बाजीपत मृत्य पावले ऐसे सागतात त्या वरून मा।रनिले पा। आहेत आणि भिमाजी बल्लाळ याचे ऐवज चोरानीं नेहले व श्वशुराकडे राहिले ऐसे मशारनिल्हे तुम्हास सागत असता तुह्मी एका भावा वर सोने घालावे हे ठीक च केले नाहीं ह्मणून तुह्मास पत्र पा। तर दाहा जण बसून धर्मता न्याय करून विभाग करून देणे मिति कीलकसवत्सरे आषाढशु।। अष्टमीस पत्र सादर असे
महिकावती (माहीम)ची बखर
ऐसें युद्ध थोर जालें. राजा भोज अपेशी जाला. नंतर भोजाचा साथीदार जो भैसेदुर्गाचा म्हणजे म्हसगडचा संस्थानिक तो युद्धीं मिसळला. त्या वर एकसरकर पाईक उठला. त्याला सिंध्यानें मागें ओढिलें आणि म्हटलें कीं, मज असतां त्वां म्हाता-यानें युद्धास प्रवर्तावें हा न्याय नव्हे. असें म्हणून शिंद्यांनीं युद्ध सुरूं केलें. महामारी पेटले. दळ भोजाचें भंगिलें. भैसेदुर्गाचा राव जिवंत धरिला. मग केशवदेवासि भेटले. बंद हवाले केला. या रीती केशवदेव येशवंत जाला ". भोजराजाचा हा पराभव शक ११४६ त झाला. ह्या वेळीं कल्याण येथील चालुक्यांचें साम्राज्य समाप्त होऊन व देवगिरीच्या यादवांचें साम्राज्य सुरू होऊन सुमारें तीस पसतीस वर्षे लोटलीं होतीं. चक्रवर्ती सिंघण यादवाची कारकीर्द चालू होती. आणि बिंब वंशातील राजांचा अंमल ठाणेकोकणांतील साष्टी बेटा वर चालू होऊन ८६ वर्षे गेलीं होतीं. राजाधिराज जे सम्राट् ते यद्यपि बदलले तत्रापि लहानलहान संस्थानिक आपापलीं राज्यें निर्वेधपणें चालवीत असत. आणि संस्थानिका संस्थानिकांत आपसांत लढाया झाल्या तत्रापि वरिष्ठ सम्राटांचा त्यांना विशेष प्रतिबंध नसे. अगदीं च प्रतिबंध नसे, असा च केवळ प्रकार नसे. सम्राट्सत्तेला विरोध नसला, म्हणजे लहान संस्थानिक एकमेकांशीं भांडले, तंडले, मेले किंवा नष्ट झाले, तत्रापि तसे होऊं देण्याला सम्राटांचा प्रतिबंध नसे. आपापल्या वैरांचें निर्यातन करण्याची मांडलिक संस्थानिकांना मुभा असे किंवा हक्क असे. त्यांतला च प्रकार चेऊलचे भोज राजे व ठाण्याचे बिंब राजे यांच्या मधील तंट्यांचा होता. शक ११४६ तील युद्ध संपल्या वर चेऊलकर भोजाचा व केशवदेवाचा तह होऊन मित्रभाव उत्पन्न झाला. मित्रत्वाच्या नात्यानें भोजराजानें केशवदेवाला भेट म्हणून आंब्यांची फर्मास पाठविली, ती आंब्यांची डाली मध्यें रस्त्यांत भैसेदुर्गाचा राजा जो जश्वद्या ऊर्फ जसवंतदेव त्यानें जप्त केली. शक ११४६ तील युद्धांत हा जश्वद्या केशवदेवाच्या हातीं जिवंत सांपडला होता. त्याला केशवदेवानें जीवदान देऊन त्या वेळीं सोडून दिलें. ह्या नंतर जश्वद्या सिंघण यादवाला भेटून देवगिरीकर यादवांचा मांडलिक बनला. केशवदेव अनहिलवाडकर चौलुक्यांचा स्नेही पडला. सबब सम्राट जो सिंघण यादव त्याचें व केशवदेव याचें सहज वैर उद्भवलें. सिंघण यादव आपल्या हाता खालील मांडलिकांचा तोरा चालवून घेणा-या पैकीं नव्हता. सर्व उंचवटे खणून पाडून मैदान सपाट करणा-यां पैकीं होता. अश्या पराक्रमीं व वचकबाज सम्राटाची बगलबच्चेगिरी करणा-या जश्वद्यानें केशवदेवाला पाठविलेले आंबे मध्यें च उर्मंटपणें खाऊन टाकले. केशवदेवाची हि या काली वाढती कमान होती. त्यानें चेऊलच्या भोजाला पराभूत करून, शिलाहारसत्ता तर अगदी च संपुष्टांत आणून ठेविली होती. अश्या त्या केशवादेवाला आंब्यांची अफरातफर झालेली रित्या वेठ्यांच्या मुखजबानीनें कळली. केशवदेवानें जश्वद्या कडे भाट सांगून. पाठविला कीं तुमच्या सारख्या भल्या लोकांनीं चो-या कराव्या हें युक्त नव्हे, तो निरोप ऐकून जश्वद्यानें उलट निरोप पाठविला कीं, मगदूर असेल तर आमच्या गडाला येऊन, किल्ल्याकुलपें फोडून आपले आंबे परत घेऊन जावे. निरोप ऐकून केशवदेव कोपला. जश्वद्या वर स्वारी करण्या करितां देशाला हंकारा केला. नगा-या घाव घातला. शेषवंशी, सूर्यवंशी व सोमवंशी, असे सर्व योद्धे मिळाले. भैसेदुर्गा वर चालले. वेढा घातला. बारा वर्षे वेढा पडला. परंतु किल्ला हातीं आला नाहीं ! चिंचांचें चिंचवणी खाऊन त्याच्या चिंचो-या ज्या पडल्या त्या रुजून त्यांचे वृक्ष होऊन त्यांच्या चिंचा केशवदेवाच्या सैनिकांनी खादल्या. पण गड हातीं येता दिसे ना. तेव्हां भेद केला. आंधेरीचा कोणी म्हातरा होता. त्याची वृत्त तेथील देसायानें काढिली होती. तो पळून जाऊन जश्वद्याच्या आश्रयानें भैसेदुर्गा वर पाइकी करून पोट भरी. त्याला स्वदेशाची फार खंत उत्पन्न होऊन, किल्याचे दरवाजे चोरून खोलण्याची कामगिरी आपण करूं अशी इच्छा त्यानें केशवदेवाला कळविली, आणि त्या प्रमाणें तें नीच कृत्य त्या अधमानें बजाविलें. किल्ला केशवदेवाच्या हातीं पडला. जश्वद्या पुनः जिवंत सांपडला. भैसेदुर्ग आपल्या राज्यास जोडून, केशवदेवानें नवसारीचा राजा गोदराव म्हणून एक मदोन्मत्त नाईक होता त्याला नरम केलें. नंतर आपल्या सर्व सरदारांना यथायोग्य वाणें देऊन. केशवदेवानें ठाण्याचें राज्य पुढें पांच वर्षे केलें. उपरान्त एकाएकीं मरण पावला. त्याला दुर्दैवानें पुत्रसंतान नव्हतें. राज्य करावयास कोणी राजवंश्य नाहीं, सबब सर्व देसाई मिळोन, जनार्दन प्रधान यास गादी वर बसविलें. केशवदेवानें दिलेल्या सर्व वृत्त्या आपण अव्याहत चालवूं असें आश्वासन जनार्दन प्रधानानें दिलें. तें मान्य करून देसाई आपल्या घरोघर गेले. हा प्रकार शक ११५९ त घडला. जनार्दन प्रधान ठाण्याचें राज्य चार वर्षे जों चालवितो तो शक ११६३ त घणदिवीचा वैश्य राजा नागरशा ठाणेकोंकणा वर चाल करून आला.