श्री धुळु देवाची पूजा मी तुह्मास दिली त्यासंबंधाने वेद्य भक्त भाई येतील त्याचे नवसाचे सोने मोती व रूपे ताबे व जनावरे-बैल ह्मैस, घोडा, गाव वगैरे उत्पन्न येईल ते तुह्मी घ्यावे. बगडाचे जे उत्पन्न येईल तें तुह्मी घ्यावे व देवापाशी नक्त पैसे येतील ते तुह्मी घ्यावे, व बगडागळाचे सामान तुह्मी ठेऊन गळ टोचून बगडा तुह्मी धड करवावे, तेथील पान व मुलवटी भरून तुह्मी घ्यावे धडशाचे पावतका (पादुका) पाशीं उत्पन्न येईल तें घडशानी घ्यावे. पोषाश वगेरे सामान तुमचे स्वाधीन देव तुमचा आणि तुह्मी देवाचे पुजारी यात कोणाचा संबंध नाहीं देवास पांघरूणचिरगुट वगैरे पोषाख येईल तो तुमचा, शीवाय च्यार चाहूर जमीन देवानजीक जिराईत तुह्मास मिरास करून दिली आहे, व परगणे फलटण येथे दोन चाहून इनाम करून दिली आहे त्या प्रमाणें ते दोन चाहूर तुमचे दुमाला करतील; व श्रीभीबाई देवीची तुमचे मार्फत पुज्या अर्च्या तुह्मी करवावी, ब नवसाच्या परज्या तुह्मी आपले हाते सोडवाव्या त्या प्रकर्णी जे उत्पन्न येईल ते तुह्मी घ्यावें, याशिवाय आमचे तोफखान्याचे रुपये पारखण्याची पोतदारीचे वतन तुह्मास दिले आहे खांडवा, वाटी, पानवीडा लग्नाचा तुह्मास माफ व पोतदारकीबद्दल मुशाहीर्या ऐवजी गावगन्ना उत्पन्न नक्त गावमार्फत करून दिले आहे
दरसाल तुह्मास बिनहरकत देण्याची गावगन्ना ताकीद निराळी दिली आहे, त्याप्रमाणे तुह्मास पावत जाईल तो अकडा खाली नमुद केला आहे तो गाववार - → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
येणेप्रमाणे गावगन्ना नक्त मुशाहीरा इतका करून दिला तो दरसाल मिळेल, व आमचे घरी कार्य प्रयोजन वगैरे होईल तर दोन असामीचा सिध्धा तुह्मास मिळेल बाबासाहेब व आबासाहेब याचे दोन उत्सवात एकाचे दोन नारळ तुह्मास मिळतील याप्रमाणे उत्पन्न तुह्मास करून दिले आहे ते तुह्मी आपले वंशपरंपरा लेकरानलेकरी अनभवुन सुखरूप रहाणे यास कोणी आमचे वशीक मना करतील तर त्यास श्री निमजाई देवीची शफथ आहे व तो आमचे वशाचा नाही यास कोणीही हरकत करील त्यास काशी वाराणशी हेर केल्याचे पातक होईल अगर कोणी मुसलमान हरकत करील त्यास पीराची शफथ आहे दरसाल पत्राची आशंका न घेता या पत्रावर दरसाल वहीवाट करावी असी दरदारी करून ठेविली आहे जाणिजे छ १ माहे रमजान मोर्तब सूद