याची चौकशी पाहता भिमाजी बल्लाळ याचे मुखे पुरवणी जाहली नाही आणि पुत्रधर्म आजपर्यंत पाहता किमपि घडला नाही व महजरात सखाराम भिमाजी स्पष्ट ऐसा उत्धार आहे आणि स्त्रीस पुत्र घ्यावयाचा अधिकार नाही त्याज वरून पुत्र घेतला नाही ऐसे जाहले या प्रमाणे चौकशी पाहून सखाराम भिमाजी ठरले येणे प्रमाणे दोन्ही दत्तकाची चौकशी भिमाजी बल्लाळ याच्या वस्तू पुरवणी जाहली नाही याज वरून दोन्ही दत्तक ठरली नाहीत सबब
१ भिमाजी बल्लाळ १ सखाराम भिमाजी
मातुश्रीचे मरणवार्ताश्रवणानतर क्षौरपूर्वक दशात अशौच धारण करून तदती सपिंडी करून श्राध करावे हा पुत्रधर्म घडला नाही
१ कृष्णाजी बल्लाळ याच्या करीण्यातील कलम आपले कनिष्ट बधू सदाशिव गोसावी याचा विभाग वाटणीस येईल त्या प्रमाणे आपण विभाग घेऊन समजोन राहू यास हि येणे प्रमाणे लेहून दिल्हे आहे जोती बल्लाळ याचे नकल भिमाजी रघुनाथ बाजी याचे नकल बापूजी बल्लाळ याचे सोने चोरानी नेहले ते रघुनाथ याची स्त्री आहे तीस मशारनिले वर पाच तोळ अन्नवस्त्र त्रिवर्गानी द्यावे १ घातले ते त्रिवर्गानी मशारनिलेचे गावगन्ना इनाम जमीनी व वर्षासने सोने द्यावे १ असतील ती त्रिवर्गानी यथाविकालातरी उगवल्यास यथाविभा- भाग भक्षावी १ - गे त्रिवर्गानी घ्यावे इमारती असतील ती सदरहू प्रमाणे
येणे प्रमाणे दोन्ही दत्तकाची पुरवणी जाहली नाही ह्मणून निवाडपत्र दिल्हे असे त्रिवर्गबधूनी यथाविभागे आपलाला विभाग घेऊन स्वस्तिक्षेम असावे