पचाईता जवळ जामीन भिमाजीबोवनि देऊन विभाग अवघेयाचे विद्यमाने केले ह्मणोन लिहिले त्यास घरातील जराबाजरा व देणे घेणे व इनाम व वृत्ति व सर्व अवघा भाऊपणा किती ठाई विभाग करून दिल्हा काही पदार्थ वाटावयाचा राहिला आहे किंवा नाही हे सागावे कलम १
भाडी मात्र वाटिली त्यात दिकत राहिली वरकट वाटा काही भरून पावलो नाही वाटे व्हावयाचे आहेत भाडी पाच ठिकाणी दिल्ही
ज्याचा विभाग त्यानी घेऊन आपले घरास गेले ह्मणोन लिहिले त्यास पुरसीस करिता तुह्मी बोलिला की कोणी घेतला कोणी घेतला नाही त्यास घेतला ते कोण न घेतला ते कोण न घ्यावयास कारण काय ते सागावे कलम १
त्याची नावे बाजीपत याणी चौघे जण याच्या घरात भाडी नेणे ह्मणोन सागितले त्यास कृष्णाजीपत हे घरात नव्हते व सदाशिवबोवा याचे घरात नेऊन ठेवणे ह्मणोन बाजीपतानी सागितले त्याज वरून ठेविली ते नतर बाहेर गेले ॥१
विठ्ठल रघुनाथ कुलकर्णी याच्या देण्याचा मजकूर व सोन्याचा मजकूर तकरीर यात लिहिला त्यास पुरसीस करिता तुह्मी बोलिला की वाटणी जाहली नाही व या प्रमाणे लिहून हि दिल्हे ऐसें असतां हा मजकूर ल्याहावयास कारण काय हे सांगावे कलम १
विठ्ठल रघुनाथ याचे देणे हाकीमाची जबरदस्ती करून आमचे मागे लावले सोनेयाची वाटणी आह्मा वर बूड घातली ह्मणून आह्मी वाटणी करवून दिल्ही नाही आपल्या आपल्यात कटकट होऊन क्षेत्रास आले ती कटकट कोण कोणात जाहली व बाजीपत क्षेत्राहून देवास गेले अस्ता तुह्मी वेकण जोशी यास विचारून माघारे गेला तें कारण काय हे सागावे आणि कटकट कोणत्या कारणाची हे सागावे कलम १
बाजीपत यासि व आह्माहसी कटकट व्हावयास कारण काय ह्मणऊन लिहिले त्यास बाजीपत यासी आपण बोलिलो की आमचा महादेव गोसावी याचा निमे वाटा देणे ऐसे बोलता त्यास ते वाटा नाही ऐसे ह्मणाले ह्मणौन आह्मी बोलिलो की श्रीस्वामीचे पादुका वरील तुळसी काढून देणे ते ह्मणाले की तुळशी देऊन आपला निर्वश करून घेणार नाही ऐसे बोलून क्षेत्रास चला त्यास ते व आह्मी उभयता क्षेत्रास आलो ते काही येथे राहिले नाहीत ते देवास गेले मग आह्मी येथे राहणे किमर्थ उभयता वादे येथे आलो ते गेले ह्मणऊन आपण व्यकण जोसी यास विचारून गेलो
बद ३ पुरवणी