Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २९१
शके १७२०
श्रीनिशान
विशेष पुरवणी आपले पिते श्रीधरभट व जिवाजीव्यंकटेशप्रभृति समस्त भाऊ याणी रभभट बिन दादभट याचे वडलास कर्नाटकातून घेऊन आले त्याचे वृद्धिक्षय अशौच ग्रामस्त याचे विद्यमाने धरीत आलो हाली आह्मास शका प्राप्त जाहाली शके १७२० त्याज वरून वृद्धिक्षय अशौच रगभट याचे सोडिले सबब ग्रामस्तानी आह्मास अपक्त केले नतर क्षेत्रमारी आलो तेथे तुह्मी चौकशी करिता बाळाजी शामजी व रामाजी मुकुद प्रभृति निमेचे भाऊ बाळाजी शामजी यानी वशावळ तिचे नाव आदिमालिका लेहून दिल्ही ती खोटी ह्मणोन समक्ष भाऊ याच्या साक्षी घालून लिहून दिल्हे त्याज वरून तुह्मी आह्मास वृद्धि क्षय अशौच पूर्ववत् प्रमाणें धरावे ह्मणोन सागितले त्यास आह्मी धटाईकरून अनादर केला सबब क्षेत्रस्थानी सरकारसमते आह्मास साहा घरास बहिष्कार घातला बि ।।
१ बजभट १-----------------------
१---------------- १--------------------------
१------------------ १-------------------------
येणे प्रमाणे बहिष्कार आठ नऊ वर्षे असता आह्मास पश्चात्ताप जाहला सबब रा। सिवाजीपत देशपाडे वाळवेकर व समस्त ग्रामस्त नरसीपूरकर याज कडे गेलो त्याज वरून त्याणी कागदपत्र मनास आणोन आह्मास सागितले जे बाळाजी शामजी यानी वशावल आदिमालिका दिल्ही ती खोटी सबब आह्मी रगभट याचे वृद्धि क्षय अशौच टाकिले या मुळे आह्मी सकर केला याचे प्रायश्चित निबधोक्त आह्मास देऊन पक्तिपावन करावे इत पर रगभट आमचा वशज अमुक पुरुष याचे आमचे वडिलानीं व आह्मी अशौच धरीत आलो त्या प्रमाणे आह्मी व आमचे पुत्रादिक व रगभट यानी परस्परे धरीत जावे इत पर खटला अशौच्या विषयी होणार नाही यास शपथ श्रीलक्ष्मीनृसिह व समस्त ब्राह्मण ग्रामस्त याची शफथ असे
यास साक्षी
वि॥ पचाइत तपशीलवार नामे लेहून द्यावी
निमेचे भाऊ तपशीलवार अरे त- ६ सहा घरभाऊची मान्यता करून पसीलवार घ्यावी
आदिमालिकेची याद क्षेत्रस्थाचे वि॥ फाडून टाकावी कलम १
मिति बिकलम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २९०
१७२० सुमार बाळबोध
श्री
यादि बाबा श्रीधर नरसिपुरकर याज कडे बोलण्याचा फडशा विषई कलमे
१ आरे, दशाहक्षयबुद्धि धरितात बाबाच बोलणे त्याच व अमच त्रिरात्र कलम १
१ बाबाचे तीर्थरुप व चुलते श्रीधरभट व चुलते पाडुरगभट व नरसिभट यानि रगाचार्ये याच्या वडिलास भाउ ह्मणोन पत्र दिल्हे आहे त्यास पन्नाससाठ वर्ष जाहली अहेत
१ हुजूर मामलेदार याच्या विद्यमाने शाभट बिन दादभट यासि बाबानी सत्तावीसावा विग भाउपणाचा देउन पत्र दिल्हे अहे त्यास वर्षे पधरावीस अहेत
१ आदिमाळिका वशावळीचि यादि बाबा पाशि येऊन अठदहा वर्षे जाहली या तागाईत आजपर्यत वृद्धिक्षय धरीत अले अहेत
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २८९ शके
१७१४ माघ शु॥ १०
श्रीशंकर
श्रीमतशकराच्यार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भववश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व राजकीय ग्रहस्त क्षेत्रकरहाटक परमभक्तोत्तम यासि विशेषस्तु अत्रस्य कुशल जाणून स्वानदलेखन करणे तदनतर विठ्ठल शामजी कुलकर्णी मौजे शेरे व दुसेरे व कोडोली व वडगाव प्रात क-हाड याचा दायाद व्येकोजी तुळजो देवाज्ञा जाहाले त्याचे आशौच न धरिता स्नानसध्यानैवेद्यवैश्वदेव इत्यादि कर्मे होतात ह्मणून सस्थानी श्रुत जाहाले त्याज वरून हे तुह्मा समस्तास हे पत्र लिहिले असे तरी विठ्ठल शामजी व आदो बाळाजी व रामाजी जनार्दन व पाडुरग बाबाजी हे सस्थान शरण येऊन दोषा पासून मुक्त होऊन सस्थानीचे सुधपत्र घेऊन येतील तो पर्यंत तुह्मी समस्ताही या चौघासी अन्नोदकपक्तिवेव्हार न करणे महानुशासन वरीवर्ति १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २८८
शके १६६४
श्री
वेदशास्त्रसपन्न वेदमुर्ती राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड स्वामीचे सेवेसी
सेवक जगज्जीवन परशराम साष्टागनमस्कार विनति सु।। सलास अर्बैन मया व अलफ वो। महादेवभट एलगाउकर व मल्हारभट याणी हरभट एलगावकर मृत्य पावले हे त्याचे गोत्रपुरुष त्याचे सुतक धरिले नाही कर्माचा लोप होतो ह्यणऊन ब्राह्मणाही पुसिले त्यास पूर्वी ए विसी आपणास पत्र दिल्हे आहे त्यास महादेवभट गरीब ब्राह्मण कालक्षेप चालिला पाहिजे याज करिता हाली स्वामी कडे पाठविले आहेत दोषा प्रमाणे यथाविध प्रायश्चित्त देऊन शुद्धता करून उत्तर पाठविले पाहिजे बहुत काय लिहिणे हे विनती
लेखना वधि
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २८७
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड यासी
प्रति सदाशिवभट साने वा। मौजे मा।र ता। पाटण साष्टाग नमस्कार विनति विशेष चिरजीव मुलास बहुत समाधान नाही यास्तव दत्तपुत्र मुलास द्यावा ऐशी योजना आहे त्यास आमचे चुलतबधु कृष्णभट साने याचा पुत्र आपले मुलाचा चुलतबधु ह्याचे उपनयन जाले आहे हा दत्तपुत्र परिग्रहास उपयोगी असल्यास उत्तर पाठवावे त्या अन्वये करावयास येईल आमचे तीर्थरूप वडील व कृष्णभट याचे तीर्थ कनिष्ठ या प्रमाणे आहे त्यास ये विंषयीचे आपले समस्ताचे उत्तर येईल त्या प्रमाणे होईल दतपुत्रविधानास दिनसुधि ही चागली लिहून पाठवावी बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७७ श्रीकेदारलिंग १३३० आश्विन शुध्द ५
बगाड नि. नांगर
तालीक
शके १३३० आस्विन शुध्द पंचमी आंबाजी पाटील कसबे सातवे समस्तदेव मिळोन री रत्नागिरीस गेले तेथे वतन करून दिल्हे बगाडाचे हक हकदारी करोन दिली देसाई व देशपांडे व समस्त विद्यमानपत्र करोन दिल्हे त्याचा हक बगाडाचा दिवाणाचे रू॥ ३ तीन आंबाजी पाटलाचा हक रु.० ॥. निमे व बकरेची मुडी व खोबरेची वाटी एक १ व पैसा १ एक व कुटाफळी पैसा एक व दुकानास पैसा एक बगाड आवघी जाहले उपरी दिवाणानी पाटलास मुंडासे एक व सेला एक एकून ऐसी दोन सणगे दिवाणाचे तश्रीफ ह्या वेगळेठाचा नाना ९ तीन पैसे द्यावे व इनाम सेत बीघा
१ एक मुलकामध्यें जिकड भक्त आस्तील तीकड गुरव गेलीया पा। व चौगुले यानी यामध्ये मन न घालावे ऐसे आहे त्यास कोणी दिकत करील तो कासीमध्ये मात्रागमन व सुरापान करील मुशलमान मोडील त्यास सोराची आण व ब्राह्मण मोडतील त्यास गायत्रीची आण ऐसेप्रा। आहे हे लिहिले सही येणे प्रा। हक करोन दिल्हा आसै.
गोही ही॥ सखो रंगनाथ
सुभानजी पाटील पाले केदारजी पाटील बुजे-रत्नागिरी
रामजी पाटील गिरोली राणोजी पाटील मालेकर
सुभानजी देवलकर खनोजी पाटील आरलेकर
खंडोजी पाटील कंकेलेकर
सुभानजी पाटील जाखलेकर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २८६
श्री
वेदशास्त्रसपन्न समस्त ब्राह्मण क्षेत्र का। कराड स्वामीचे सेवेसी
आज्ञाधारक यमाजी पाटील मौजे अतीत चरणावरी मस्तक ठेवून साष्टाग दडवत विनति उपरि येथील कुशल जाणोन स्वामीनी आपले सामराज्यवैभवलेखनाज्ञा करून सेवकाचा साभाळ करीत असिले पाहिजे विशेष पूर्वी येक ग्रहस्त गोसावी ब्रह्मचारी असता दत्तपुत्र आपल्या वोट्यात घेत होता त्यास कोणी ब्राह्मणानी सागितले की लग्न जाहले नसता पुत्र घ्यावा हा कोणी शास्त्री आधार नाही ह्मणोन सागितले त्या वरून घटितार्थ जाहला होता तो पाहिला त्या अलीकडे आणखी पुत्र घ्यावया अनुक्रम आरभिला आहे अद्यापि त्या ग्रहस्ताचे लग्न न जाहले असता पुत्र वोट्यात घेईन ह्मणतो तरी ब्रह्मचारी याने पुत्र घ्यावा हे कोणते शास्त्राधार आहे हे वर्तमान लेहून पाठविणे त्या सारखी त्या ग्रहस्तास आज्ञा दिली जाईल तरी स्वामीनी अनाथा वरी कृपा करून च्यारी ब्राह्मण थोर थोर बसून या गोष्टीचा शोध मनास आणून शास्त्र पाहून आज्ञा करावी येथील वर्तमान नारोबा सागतां सेवशी विदित होईल कळले पाहिजे कृपा निरतर सेवका वरी असो दिजे हे विनति स्वामी ह्मणतील की कोणते उद्देशास पुत्र घेतो देहसार्थकास किंवा द्रव्यास किंवा काय ह्मणतील तरी वृत्ती साठी घेतो आहे स्वामीस कळावे ह्मणून लिहिले आहे हे विनति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
तो तू घे ती बोलली की मजला दोघे हि घ्यावयाचे नाहीत असे उत्तर केले तेव्हा दादभट बोलले की तुझ्या विचारात येईल तो तू घे असे बोलोन आपले घरास गेले भीमदीक्षित याचे उत्तरकार्य प्रथम दिवसा पासून अकरा दिवस घन श्यामभट याणी च केले बारावे दिवशी सपिंडी व श्राद्धे करावयाची त्यास पुत्र घेऊन करावी हा हेत येसूबाईचा त्यास अकरावे दिवशी रात्रौ समस्तानी उद्योग केला परतु घडला नाही सपिंडी बारावे दिवशी घन शामभटाने केली तेरावे दिवशी समस्त ब्राह्मण मिळोन विचार केला की बाबदेवभट याणी समईं अनमान केला येसूबाईचा मनोभग जाला याज मुळे ती घन शामभटाचा च मूल घेईन ह्मणते तो च दत्तविधान पूर्वक तिजला देऊन त्याचे हातून मासिकश्राद्धे करवावी असा निश्चय समस्तानी करून दत्तविधान केले ते समईं बाजीभटाचा दुसरा पुत्र नानाभट समस्ता बराबर बोलावावा ह्मणोन बोलाविला तो आला याज्ञिक समाप्तीस दादभट हि आले त्यानी नानाभटास उठवून नेले घन शामभट याचा पुत्र घेऊन याज्ञिकसमाप्तीस गेले नतर बाबदेवभट येऊन व्यगोक्त भाशणे करून गेले या प्रमाणे वर्तमान आहे ++++++++++++ असे जाणून येसूबाईस च विचारिले जे तुझे मानस कोणाचा पुत्र घ्यावयाचे तिणे उत्तर केले घन शामभटाचा तेव्हा समस्तानी सागितले बाजीभट याचा कनिष्ट घ्यावा तेव्हा तिणे उत्तर केले की त्याचे माझे रहस्य कोठे आहे घन श्यामभट सालस सारख्यासे सारखे त्याचा घ्यावा हे मजला बरे दिसते तेव्हा फिरोन समस्तानी बाईस सागितले की आह्मी सागतो हा घ्यावा तेव्हा ती बरे ह्यणोन बोलली या प्रमाणे जाल्या वर बाजीभट याचे घरास भगवतराव ढवळे व चिमणाजीपत नादवहळकर व बापूभट आफळे मूल पाहाण्यास गेले मूल अशक्तसा पाहिला तेव्हा त्या मुलाचे मातुश्रीशी बोलिले की हा मूल असा का दिसतो
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
विचारास आले आहे तुमचे समत असावे तेव्हा ते आमचे समत आहे ऐसे बोलले नतर समस्तानी उपाध्यास श्नान करून सकल्पास प्रारभ करावा ह्मणोन सागितले तो बाबदेवभट बोलिले किं माहादेव जोसी ह्यणतात हे बरे आहे नतर समस्तानी बाबदेवभटास दोन गोष्टी सागितल्या आणि सकल्पास प्रारभ करविला तो फिरोन बाबदेवभट बोलिले की आमचे दादा घरी नाहीत तेव्हा आणखी दोन गोष्टी सागितल्या आणि सकल्पास प्रारभ करविला फिरोन बाबदेवभट बोलिले की माहादेव जोशी ह्मणताहेत हे बरे आहे इतके बोलोन न पुसता समस्तातून उठोन गेले तेव्हा समस्तानी दोन घटका वाट पाहिली कोठे गेला ह्मणोन शोध केला तो आला नाही तेव्हा समस्त आपलाले घरास गेले नतर दुसरा दिवस बारावा सपिंडीच्या समई बाजीभट याचे मातुश्रीने चिमणाजीपत यास बोलाऊ पाठविले नतर गेले त्यास बाजीभट याचे मातुश्रीने विचारिले की आमचा मूल घेत होता तो काल का घेतला नाही त्यानी उत्तर केले की बाबदेवभट यानी गैरमान्य होऊन न पुसता उठोन गेले याज मुळे येसूबाईचा मनोभग जाला परम श्रमी जाली आता तुमचा पुत्र घेत नाहीत असे उत्तर केले नतर दादभट गिजरे रात्रौ सुभ्या कडे जाऊन सागितले की बाजीभटाची मातुश्री उपोषण करिती त्याज वरून तात्या गिजरे यास सुभ्याचे बोलावणे आले तेव्हा ते गेले सुभाने सागितले मातुश्री उपोषण करिती तेव्हा तात्या बोलिले की उपोषण करावयाचे कारण काय तेव्हा दादभट बोलले की काल त्यिचा मूल घ्यावयाचा केला होता तो न घेतला म्हणोन उपोषण करितात तेव्हा तात्यास सुभा व दादभट याणी सागितले की तुम्ही जाऊन येसूबाईस सागा की आम्ही जात नाही बाईनी घेतला तर बरे नाही तरी तुम्ही च नाश केला म्हणाल तेव्हा जा च म्हणोन बहुत आग्रह करू लागले तेव्हा तात्यानी उत्तर केले की आम्ही येकटे जाणार नाही जाणे च तर दादभट व आम्ही मिळोन जाऊ दादभट आम्ही येत नाही बोलले तेव्हा आम्ही हि जात नाही असे तात्यानी उत्तर केले तेव्हा सुभ्यानी सागितले की तुम्ही उभयता जावे चिमणाजीपत आहेत यास हि घेऊन जावे तेव्हा त्रिवर्ग मिळोन येसूबाई कडे गेले नतर घन शामभट हि तेथे आले त्याच्या सकोच्या मुळे उगेच बोलता राहिले आणि सध्येस जाऊ असे बोलून दादभट व तात्या निघाले तितक्यात बाईचा समाचार घेऊन जावा असे तात्या बोलिले कशास तेव्हा तात्या बोलिले की येथे आल्यास तिजला भेटून जावे ह्मणोन घरात गेले बाईस पुसिले की आपणासी दोन गोष्टी बोलावयाच्या होत्या ह्मणून आलो होतो आता सध्येस जातो बाईनी उत्तर केले की काल समस्त मिळोन काय केले ते आज करावयाचे आहे माझे कपाळी होते ते जाहले इतके श्रवण करून उभयता आगणात आले ते समई दादभट चिमणाजीपतासी बोलले की मी चहू घटकानी येईन मग काय बोलणे ते बोलेन आणि निघोन आले नतर सकेता प्रमाणे दादभट गेले त्यानी येसूबाईस सागितले की तो मूल रोगी आहे ज्याचे लग्न जाले आहे
महिकावती (माहीम)ची बखर
माध्यंदिनशास्त्री देवदत्त पुरोहित, रखमाजी कायस्थ कुळकरणिक, गंगाजी नाईक सरजमातदार, यशवंतराव सरसबनीस, हे चार अधिकारी बरोबर घेऊन तो दळभारा सह ठाण्यास प्रगट झाला. जनार्दनासि युद्ध झाले. जिंकला. मग त्या जनार्दनास च आपला प्रधान करून बिंबांचें सर्व राज्य नागरशानें काबीज केलें. नागरशा माहिमास राजमहाली राहिला. तेथें देसाई, चौगुले, चौधरी, म्हातरे, साहाणे, पाटील, हवालदार, महालदार, हाट बकाल, ब्राह्मण वगैरे सर्व मुख्य मुख्य जमवून, त्यांचे कागदपट नागरशानें तपासले, देसायांना देशाच आदाय विचारिला. चौदा परगणे, चौदा महाल, दोन खापणे असा चौफेर हिसाब रायासि रुजू झाला. उपज एकंदर १४ लक्ष सजगाण्या भरला. ज्यांच्या खतपत्रांवर
बकदालभ्यं यदा गोत्रं प्रभावती कुलदेवता
ठाणे स्थाने कृतं राज्यं मम मुद्रा विराजते
हा केशवदेवाचा शिक्का होता त्यांच्या वृत्त्या त्यांज कडे पूर्ववत् चालवून नागरशानें आपली कारकीर्द शक ११६३ त सुरू केली. देशाच्या संरक्षणार्थ नागरशानें ठिकठिकाणीं सैन्य ठेविलें त्याचा तपशील:-
चेऊल | घोडे | २००० | हत्ती | १ |
सजणगांव | घोडे | ०९०० | हत्ती | ६ |
सैलान | घोडे | ०२०० | हत्ती | ५ |
चिखलीनवसारी | घोडे | ०५०० | हत्ती | + + + |
परतापूर | घोडे | ०२०० | हत्ती | १ |
मूळगांव | घोडे | ०१०० | हत्ती | + + + |
ठाणे | घोडे | १००० ४९०० |
हत्ती | ५ ३० |
देशाचा असा कडेकोट बंदोबस्त करीत असतां नागरशास त्रिपुरकुमरनामक पुत्र झाला. तो वयांत आल्या वर, बापाच्या बरोबरीनें राज्यकारभार पाहूं लागला. नागरशानें जेव्हां कोंकणा वर प्रथम स्वारी केली तेव्हां त्याच्या दिमतीला त्याचे तीन मेहुणे होते. त्रिपुरकुमर वयांत आलेला पाहून, आपण आपली कांहीं तरीं स्वतंत्र व्यवस्था पाहिली पाहिजे असें ह्या तिघा मेव्हण्यांना वाटूं लागलें. करतां, नागरशाशीं त्यांनीं असें बोलणें लावलें कीं राजाने आपणास ठाणे, मालाड व मरोळ हीं तीन गांवें बक्षीस द्यावीं.