लेखांक २८५ श्री १६४४ भाद्रपद शुध्द १३
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके ४९ शुभंकृत नाम संवत्सरे भाद्रपद शुध त्रयोदसी मंदवार क्षत्रिकुलावतंस श्रीराजा शंभु छत्रपति स्वामी याणी समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री कान्होजी आंगरे सरखेल यासि आज्ञा केली ऐसी जे राजश्री नारो कृष्ण उपनाम जोशी शांडिल्य गोत्र हे स्वामीच्या राज्यातील पुरातन सेवक या राज्यात निस्टेने सेवा केली त्याउपर सेवा सोडून आपला काल सार्थक व्हावा याकरिता स्नानसध्या करून ईश्वरभजनी लागले याची योगक्षेमाची अनुकूलता करून दिधल्याने स्वामीस व स्वामीच्या राज्यास श्रेयस्कर याकरिता विशालकडचे मुकामी कैलासवासी थोरले स्वामी कसबा मुरूड ता। पचनदी प्रा। दाभोल पैकी त्कारी दाभोली लारी ४०० च्यारसे पुत्रपौत्री वृती पूर्वी राजश्री सिवाजी राजे दाजी याणी दिल्ही प्रस्तुत नारो कृष्ण याणी वैकुंठवास केला त्याचे पोटी सतत नाही याकरिता त्याचे भाव राजश्री माहादाजी कृष्ण व गोविंद कृष्ण व पुतणे राजश्री बालाजी माहादेव व रामचंद्र माहादेव व कृष्णाजी माहादेव याणी विनति केली व पत्रे आणून दाखविली सदरहू च्यारसे लारीची वृती आपणास उतरोतर चाले ऐसी आज्ञा करावी त्यावरून सदरहू वृती यासि पुत्रपौत्रादिवसपरंपरेने करार करून हे आज्ञापत्र तुह्मास सादर केले आहे तरी तुह्मी हे वृत्त यास नेमून देउनु वंसपरंपरेने चालवणे साल दर साल ताजा सनदेचा उजूर न करणे या सनदेची प्रती लेहून घेउनु मुख्यपत्र माहादाजी कृष्ण गोविंद कृष्ण व बालाजी माहादेव व रामचंद्र माहादेव व कृष्णाजी माहादेव व श्रीधर गोविंद याजवल भोगवटियास परतोन देणे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असो
बार