Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
महिकावती (माहीम)ची बखर
मग तें पत्र गुप्त प्रकारें मरोळ माहालि कान्ह देसल्यास पाठविलें ।। तें पत्र त्या देशलें वाचन पाहिलें ।। त्यास हि संतोष जाला ।। मग तें पत्र मालाड माहालिं सष्टि मध्यें दाखविलें आणि सर्व मिळोन निश्चये केला ।। जर भागडचुरि मारावा ॥ ह्मणोन सर्वांचे समंते पत्र त्या मुलास पाठविलें ।। तो मुल तेथिल आपला समुदाये समागमि घेवोन रात्रौ मरोळास आला ॥ तेथे सर्वांस भेटला ।। तेथे जमा सर्व केला ।। तेथोनं रात्रि पाचंबा देविस दबा मारिला ।। उदय सोमवार महड–देविची यात्रा ।। ते समई भागडचुरि मोहटे पाहाटि उठोन येसाव्यास गेला । मुक्तेश्वरि श्वान करोन देवळा मध्यें देव-दर्षन घेवोन राहिला ॥ ते समई दर्शन घेवोन बाहेरि पडला ।। समागमी बारा अश्वार स्वांग जिवाचे ।। अवघे येतां देशकें काहाळा भेरि वाजविल्या ।। हा हा शब्द होतां च हे अवघे तुटोन पडले ।। तेधवां घाबरे प्रकारे बारा श्वारा मधोन दोन स्वार तेथे च ठार जाले ।। मग ते दहा जण आड घालोन पळों लागले ।। ते अश्व चिखलांत न चालत ह्मणोन पाये उतारा जाले ।। पळों लागले।। तेधवां त्या मुलान निर्वाण घोडा टाकिला ॥ तो आला ह्मणोन उड्या खाडित टाकिल्या ।। पोवंत चालिले ।। ते च संधी त्या च खाडित होडे होते ।। त्या वर तांडेल कैवर्तक बैसला होता ।। त्यास त्या मुलान हडकिलें जर तो निळे पागडिचा भागडचुरि मारिसिल तर जे तुं मागसिल तें मी देईन ।। माझें सत्यवचन ।। यैसें यैकोन तो तांडेल बोलता जाला जर मला आपणा सारिखें कराल व जातित घ्याल तर मी मारितों ।। अड तैसाच जाणोन त्याणे आपलें सत्यवचन दिधलें की कबुल केलें ।। तेधवां त्या तांडलें पालकोईती हाणोन भागडचुरि मारिला ।। सिर घेतलें ।। आणि ते निजंग भागडचु-याचे पैलपार जाले ।। त्याचि कथा मोहोरे आहे ।। मग या तांडलें भागडचु-याचें सीर आणोन त्या मुलास दिधलें ।। तें घेवोन सर्व जमा मुक्तेश्वरि आले ।। तेथे खुशालि करों आदरिली ।। काहिक धर्म हि केला ॥ जर हा मुल लाहान वयेसे मध्ये येशवंत जाला ।। आणि पदाधिकारि सर्वेपणे प्रौढि वाढली ।। मग तेथे जातिभोजन आरंभिलें ।। ते वेळि सर्व सोमवंशि आणि सूर्यवंशि मेळवोन भोजन आरंभिलें ।। तो प्रसंग जाणोन हा तांडेल सोंवळे नेसोन तेथे आला ।। ह्मणो लागला कीं भाष उतिर्ण करावि ।। ते यैसि कीं पंक्तिपावन मज करावें ।। तेधवां सर्व बोलते जाले की आह्मि द्रव्य तुं जे मागसिल तें तुज देतों ।। आह्मा सारिसा करितों ।। तें आईकान तो तांडेल बोलता जाला कीं मला द्रव्याचि ईछा नाहि ॥ तस्मात् द्रव्य चिरकाळ नव्हे ।। ह्मणोन आपलि भाष उतिर्ण करणे ।। असेल तर जातित घेणे ।। जे माझे पेढोपेढिस राहेल ।। ह्मणोन हा निश्चये ।। यैसा दृढाव जाणोन कठोर वचन आईकान समस्त विचारि पडले ।। तेव्हा हा मुल बोलिला कीं मला भाष उतिर्ण करणे लागेल ।। न केल्यास पुर्वज हांसतिल ।। ज्याची भाख जाईल तो निरार्थक जन्मी ।। आणि पूर्वजांस अधःपात ।। ह्मणोन कबुल केलें ।। तेधवां कित्येक ईश्वरिभये धरोन उठोन रिघाले ।। काहिक त्यांचे समागमि गेले ।। आणि बहुतांहि त्या मुलाचा अभिमान धरोन त्या प्रसंगि राहिले ।। मग तो तांडेल पंक्तिस बैसविला ।। यैसे प्रकारें तांडेल जातित सरता जाला ।। भोजन संपादलें ॥ मग तेथोन सर्व समुदाये तो मुला सहवर्तमान राजदर्शनास माहिम बिंब स्थानि गेले ।। जावोन तो मुल राया नागरस्यासि भेटला ॥ त्यासि देखोन रायाने बहुत मान्य दिधला ।। बैसकार जाले ॥ ते समइं वर्तमान ॥ रायाने पृछा आदरिली ।। कीं तुज देखोन फार संतोष जाला ।। परंतु हा समाचार कळला कीं तुह्मी कैवर्तक जातित घेतला ।। हे अनकृत्य आचरलेत ।। कर्मबाह्य म्हणोन राजगुरु पोशनायक बोलावोन धर्मशास्त्र पाहों लागले ॥ तेधवां निवाडा जाला कीं अकृत्यास दंड कर्मबाह्ये यज्ञोपविते वर्जाविं ।। तेधवां त्या मुलान म्हणितलें कीं ज्यास भाष देणे ते पाळणे आह्मास ।। ऐसा निश्चयां त्या मुलाचा जाणोन रायाने यज्ञोपवितें काढविलीं ।। तो प्रसंग जाणोन क्लेषि फार जाले ॥ तें पाहातां राजा बोलिला कीं पंचरात्रि परस्परें निघतिल ।। मग त्या मुलास सीरपाव दिधला ।। साशष्टिचा देसाय केला ।। मालाड माहालचा फरमास दिधला ।। देसलिकिचा विडा देवोन आज्ञा केली ।। मग ते सर्व तेथोन मालाडास आले ।। त्यांचे मागें प्रधानास आज्ञा केलि की त्या साशष्टि मध्ये जीतके त्या तांडला समागमे जेविले असतिल ते त्यांचि येज्ञोपवितें हरणे ।। ते आज्ञा प्रधान वंदोन २०० अश्व घेवोन साष्टि मध्ये आला ॥ येवोन ढांढोरा पीटिला कीं जे त्या भोजनि जेविले असतिल त्याहि यज्ञोपवितें वर्जाविं ।। जे न यैकतिल त्यांस राजदंड आणि कर्मबाह्ये कैवर्तक ।। यैसें प्रतिपादिलें ।। धर्मशास्त्रसंमति कैवर्तक कर्मबाह्ये जाले ।। छ ।। या नंतरें राया नगरस्याचा जमातदार नामे यकांगविर सिंधा शेषवंशि नाथराव गोत्र हरिद्र कुळदेवता हिरबाये उपनावं भंडारी ।। त्यासि आणि राया नागरस्यासिं वैमानस जालें ।। व्हावयास कारण ।।
संस्कृत भाषेचा उलगडा
व्यंजनात सर्व शब्द या तस्थिवस् शब्दाप्रमाणे सर्वनामस्थान भ व पद अशा विभागाने चालतात. यात स्त्रीलिंगी शब्द पुल्लिंगी शब्दाप्रमाणेच चालतात. स्त्रिलिंगाचे वैभक्तिक निराळे प्रत्यय नाहीत ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. अकारात पुल्लिंगी शब्द व व्यंजनान्त शब्द यांच्या प्रत्ययांची तुलना करू, प्रथमा व द्वितीया यांचे प्रत्यय दोन्ही शब्दांना सारखे स् व म् हे आहेत, त्यात बदल नाही. परस्थानीय प्रत्यय दोन्ही शब्दांना भ्याम्, भिस् व भ्यस् हे सामान्य आहेत, त्यातही बदल नाही. भस्थानीय प्रत्ययात मात्र भेद आहे तो खालील तखत्यात देतो :
आकारान्त व्यंजनान्त
३ x १ स्येन स्या ह्न
४ x १ स्थ स्ये ह्न
५ x १ स्यत् स्यस् ह्न
६ x १ स्य स्यस् =
६ x २ स्योस् स्योस् =
६ x ३ स्याम् स्याम् =
७ x १ स्यि स्यि=
७ x २ स्योस् स्योस् =
७ x ३ स्यु स्यु=
अकारान्त पुंल्लिंगी शब्दांच्या व व्यंजनान्त शब्दांच्या प्रत्ययामध्ये असा भेद का ?भेदाचे कारण एकच संभवते. ते हे की, पूर्ववैदिक आर्यसमाजात एक भाषा केवळ स्वरान्त शब्दांची असे व दुसरी भाषा व्यंजनान्त शब्दांची असे. संस्कृत शब्दाखेरीज करून मराठीत प्राय: प्रत्येक शब्द जसा स्वरान्त असतो. तसा प्रकार प्राय: एका पूर्ववैदिक भाषेचा असे आणि दुसऱ्या पूर्ववैदिक भाषेत प्राय: सर्व शब्द इंग्रजीतल्याप्रमाणे व्यंजनान्त असत. स्वरान्त बोलणाऱ्या समाजाचा व व्यंजनान्त बोलणाऱ्या समाजाचा मिलाफ होऊन वैदिकसमाज बनला.
संस्कृत भाषेचा उलगडा
(५) तस्थिवांसौ + म् = (म् लोप करून) तस्थिवांसौ.
(६) तस्थुषस् + म् = ( म लोप ) तस्थुष:
(७) तस्थुष् + स्या = तस्थुष् + या = तस्थुष् = या = तस्थुष् + आ = तस्थुषा.
(८) तस्थिवत् + भ्याम् = तस्थिवद्भ्याम्
* तस्थिवत् शब्दाचे प्रथमा द्विवचन तस्थिवत् जुनाट भाषेत होत असे हे पाणिनीस माहीत नाही. सबब, पदसंबंधक कार्य असता तस्थिवत् हे अंग धरावे असे तो सांगतो. का धरावे ते कारण अर्थात सांगत नाही.
(९) तस्थिवत् + भिस् = तस्थिवद्भि:
* तस्थिवत् शब्दाचे प्रथमेचे अनेकवचन तस्थिवत् असे जुनाट भाषेत होई.
(१०) तस्थुष् + स्ये = तस्थुष् + ह्ये = तस्थुष् + ये = तस्थुष् + ए = तस्तुषे
(११) तृतीया द्विवचनाप्रमाणे ४ x २
(१२) तस्थिवत् + भ्यस् = तस्थिवद्भ्य:
(१३) तस्थुष् + स्यस् = तस्थुष् + ह्यस् (यस् = अस्) = तस्थुष:
(१४) तृतीया द्विवचनाप्रमाणे ५ x २
(१५) चतुर्थी त्रिवचनाप्रमाणे ५ x ३
(१६) पंचमी एकवचनाप्रमाणे ६ x १
(१७) तस्थुष् + स्योस् = तस्थुष् + योस् = तस्थुष + योस् = तस्थुष् + ओस् = तस्थुषो:
(१८) तस्थुष् + स्याम् (याम् = याम् = आम् ) = तस्थुषाम्
(१९) तस्थुष् + स्यि (ह्यि = यि = इ) = तस्थुषि
(२०) षष्ठी द्विवचनाप्रमाणे ७ x २
(२१) तस्थिवत् + स्यु = तस्थिवत्सु.
(२२) तस्थिव ३ न्
* संबोधनार्थ तस्थिवान् यातील दीर्घ द्विमात्रक टिं च्या ऐवजी त्रिमात्राक प्लुत अ उच्चारीत. तस्थिवान् या रूपातील शेवटील आ चा ऱ्हस्व होतो म्हणजे अ होतो असे पाणिनी सांगतो.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
-२ [ कुसृति ] ( कुसूर पहा)
कसेंबसें [ कीदृग्द्वयसं = कइसंबइसं = कसेंबसें.
कीदृग् एव कीदृग्द्वयसं । असेंबसें = ईदृगद्वयसं । ] तो असाबसा मनुष्य नाहीं म्हणजे असा च मनुष्य नाहीं.
कसोटी [ कषपट्टिका = कसवट्टिआ = कसवटी, कसोटी ]
कहारी [ खारी (a coin ) = कहारी. लोहिताखारी = लारी a coin in the cokans (कोंकण)
कहाळ, कहाळा [ कहाला horn for blowing formed like the धत्तूर flower (वैजयंती) = कहाळ, कहाळा ]
कळ [ कलि: = कळ. कल् शब्दे] कळ वाजली म्हणजे शब्द ज्यांतून होतो तें यंत्र वाजलें.
कळ (भांडण) [ कलह = कळा = कळ. कलि = कळ]
कळक [ ( कट = बांबू ) कटक = कडक = कळक. कटकी = कळकी ]
कळकळित [ कल week, crude = कळकळित ] weak water.
कळप [ कलापः = कळप ] कळप म्ह० समूह. ( भा. इ. १८३४)
कळमणें [ क्लमनं ] (कळमळणें पहा)
कळमळ [ क्लामम्लानि = कळमळ (स्त्री ) ] (भा. इ. १८३४)
कळमळणें [क्लम् = कळम. क्लमनं = कळमणें. क्लम्+ म्लैं = कळमळणें.] अहं क्लाम्यामि + म्लामि = मी कळमळतों. मला कळमळतें = मया क्लम्यते म्लायते. (भा. इ. १८३४)
कळलाव्या [लप् १ व्यक्तायांवाचि. कलहालापकः = कळलावा = कळलाव्या ] कळलाव्या म्ह० कलह लावून देणारा. ( धा. सा. श.)
कळवळणें [क्लवनं = कळवळणें. दुसरा ळ आगंतुक ] (भा. इ. १८३४)
कळवी [कलंबी = कळंबी = कळवी (शाकविशेष) ( अनुस्वार लोप ) ] ( भा. इ. १८३६ )
कळशी [कलशि: = कळशी. दृतिकुक्षिकलशि ]
कळसूत, कळसूत्र [ कल्पसूत्रं = कळसूत्र, कळसूत]
कळा [ M. कलापः tail, ornament वैजयंती = कळा ] मुगुटाचा कळा M.
कां १ [ कामं ( अकामानुमतौ) = कां ] येस ना कां = आगमिष्यासि नाम कामं.
महिकावती (माहीम)ची बखर
राया नागरशा कडे देशले देसाये पाटेल पाटल्हारे खुमनासिर रयेत या सर्वांहि पूर्विच भेद कला होता ॥ तेणे करोन प्रतापस्या रायाचा पराजयो पावला ।। त्या वरोन राया नागरस्याने सर्वा पाटला देसायाला रयेतिला उचित देणे दिधलीं ।। देसायांस अश्व दिधले ।। कोण्हास हस्तकंकणे ॥ कोण्हास सुवर्णसांखळिया दिधल्या ।। या प्रकारें उचित देणी दिधलीं ।। या प्रकारें राया नागरस्याने विना कष्टि राज्य स्वहस्तिं केलें ।। शके १२५४ मध्यें वर्षे १५ पावेतों नागरस्यान राज्य केलें ।। शालिवाहन शके १२६९ पावेतों ।। त्या नंतरे सोमवंशि क्षेत्रियाहि बहिस्कृत केलें व रायाने त्यांसि दंडिलें ।। तें चि ऐसें ।। जें राया नागरस्याचा पाळकपुत्र जईतचुरि होता ।। त्याचा पुत्र नामे भागडचुरि ।। द्वालिबंद नाईकवडा येशवंत होता ।। बहुतां युद्धा मध्ये जयो पावला ।। हाणोन रायाने सेनाधिपति केला ॥ तेणे किती येक कार्ये रायाचि बहुते प्रकारें उतमान्वयें यथापुरषार्थि सिद्धि पावविली ॥ ऐसें जाणोन राया नागरस्याने साष्टिचा कारभार दिधला ॥ तेणे करोन भागडचुरि आपलि स्वतासी कामाविस करों लागला ।। त्या नंतरे सेताचि मोजणि केलि ।। काठि हात ७ सात करोन जमिन मोजिली ।।१२॥ काठियांचा बिघा १ येक त्यास धारा ।। २ बिघे यांसि हारा १ त्याचे फरे ४ राजंरयतेने दिवानास द्यावे यैसा तह केला ।। येकसें अठाविसा बिघ्या चावर येक केला ।। या प्रकारें कामाविस करों लागला ॥ तें राया नागरस्यासिं मानलें ।। की हा आपले हितार्थि उत्तम प्रकारें वर्तुणक स्वामिकार्ये तत्पर ह्मणोन रायाने अधिकाधिक मान्यता कलि ।। दिवसें दिवस प्रतिष्ठा वाढली ।। यैसि कामाविस वरुषें १२ अधिकोत्तर भरलीं ।। ते समई ईश्वरी ईछा म्हणोन भागडचु-याचि बुद्ध फिरली ॥ स्त्रिवेशनि प्रवर्तला ।। कित्येकां भल्या भल्यांच्या स्त्रिया बळत्कारें भोगिल्या ।। भल्या भल्यांच्या ईजति घेतल्या ।। कित्येकां पासोन द्रव्य घेतलें ।। आणि अभिळासवृत अद्भुत ह्मणोन गा-हाणि राया नागरस्यास गेलिं ॥ तेधवां अतिशयें गा-हाण्यास रायान ह्मणितलें की आपण त्यास सिक्षा लाविन, तुह्मी चिंता न करणे ।। यैसिया प्रकारें भागडचुरि उन्मत होउन रायाचि हि चिंता मनी नाहिं ।। जीवास उदार ह्मणोन राजा हि मनि दचके ॥ जर बळाढ्य आणि जीवास उदार ।। ह्मणोन राजा तयास दुखवित नसे ।। परंतु आशंकित असे ।। जर यैसिया दुष्ट-कर्मास दंड करावा ॥ परंत त्यासि जें महत्व दिधलें होतें ते पाळित गेला ।। यैसें असतां मालाड माहालिचा सोमदेशला सोमवंशि त्याचे बंधुचि स्त्रि अतिसुंदर जाणोन तजविज भागडचु-यान मांडिलि ।। जर ते स्त्रि बळत्कारें हरावि ।। ह्मणोन तो सोमदेशला व त्याचा बंधु व घरांतिल पुरुष अवघे आणोन बंध केले ॥ बंदिरखानी दिवस पांच होते ।। तेधवां त्यास वर्तमान कळला जर आज्ञा भागडचु-याची सिपायास जालि जर जावोन ते स्त्रि काढोन आणावि ॥ ते आईकोन सोमदेशल्यान ताबडतोब सेवक रवाना केला जर ते स्त्रि उताविळ पळवावि ।। तेधवां तो सेवक घरि जावोन समाचार सांगितला ।। जर ऐसें होणार ह्मणोन ते स्त्रि त्या सेवक समागमि घेवोन कु-हारास नेंलि ।। तेथे रात्र क्रमिली ।। तेधवां हे सिपाये धरि येवोन पाहों लागले ।। तेधवां ते स्त्रिला न देखत ।। ह्मणोन भागडचु-या जवळ गेले ।। जर ते पळविली ह्मणोन भागडचुरि के.पला ।। मग त्या सोमदेशल्याचा बंधु ते स्त्रिचा भ्रतार ताबडतोब मारिला ।। तो वर्तमान कु-हारासं कळला ।। मग तेथोन भाईदरा मात्रुपक्षि नेलि ॥ तेथे मास येक होति ॥ तेधवां ते माईबापास चिंता वर्तलि ।। जर हे सगर्भ चहुमासाचि ॥ हे येथे ठेविता कामा नये ।। जर प्रसूत-- काळि प्रगट होईल आणि त्या भागडचु-यास कळेल तर आपणास वाईट होईल आणि ईलाहि काढोन नेईल ।। ह्मणोन समागमि बाप घेवोन भिवंडी मामारपक्षि घेवोन गेला ।। तेथे ते ठेविली ।। मग तेथे ते प्रसूत जालि ॥ पुत्र जाला ।। तो वाढला ।। वरुषें १२ भरलि ।। तेधवां तो मुल शास्त्रविद्या-पूर्ण जाला ।। तेधवां येक दिवस त्या मुलास वर्तमान मातेन सांगितला जर तुझा पिता भागडचु-यान मारिला ।। तें आईकोन तो मुल मनी विस्मित होउन अभिमानि पडला ॥ जर त्याण्हे माझा पिता मारिला ।। त्यास मी मारिन ।। हा निश्चये करोन आपले कुटुंबि बैसोन विचार केला ।। तेधवां ते सर्व मामारपक्ष त्यास साह्ये जाले ।। हा अभिमान आमचा ।। ह्मणोन दिवस दिवस आपले समंधि भाव त्यांस पाचारोन विदित केलें ।। ते हि साह्ये त्या मुलास जाले ।। मग थोरथोर ठीकाणि अवघ्याचि समंते घेवोन पत्र नागरस्यास पाठविलें ।। जर मला देशालिक देसिल तर आपण पित्याचा सुड घेईन ।। भागडचुरि मारिन ॥ तुझी आज्ञा असेल तर आपण तुझे चरण देखावयास येतों ।। आणि जी सेवा भागडचुरि करित असे ते द्वीगुण ग्या करावि ॥ ऐसें पत्र प्रविष्ट माहिमा राया प्रत जालें ।। राये वाचोन अभिप्राव मनासि आणिला जें रायाचे मनि होतें तें तें चि होउन आलें ।। जर दुरात्मा घातकि भागडचुरीयाचा परस्परे घात होईल आणि तो राजाज्ञा अन्य करिल ह्मणोन परस्परें कायें होवोन येतें ह्मणोन रायाचे चित्तास आलें ।।
संस्कृत भाषेचा उलगडा
११ आता देव शब्दाप्रमाणे तस्थिवांस् किंवा तस्थिवान्स्, तस्थुष् व तस्थिवत् या तीन शब्दांच्या रूपांच्या मिसळीने जी रूपावली वैदिककाली व विशेषत: पाणिनीयकाली बनली तिची साघनिका देतो. सर्वनामस्थानी तस्थिवान्स्, भस्थानी तस्थुष् व पदस्थानी तस्थिवत् ही अंगे धरून साधनिका होते, हे लक्षात ठेवणे अवश्य आहे.
(१) तस्थिवांस् + स् = तस्थिवान्सस् = (दोन्ही स् चा लोप होऊन) तस्थिवान्
* पाणिनी तस्थिवत् असा मूळ शब्द धरतो व अंत्याला दीर्घत्व व नुमागम करून तस्थिवान्स् हे अंग तयार करतो. तस्थिवांस किंवा तस्थिवान्स् असा उच्चार काही काल होऊन, नंतर स् चा लोप होऊन तस्थिवान् हे रूप वैदिककाली झाले.
(२) तस्थिवांस् + स् + स् = तस्थिवांस् + अ +उ = तस्थिवांसौ.
* अ + उ यांचा संधी अउ म्हणजे औ असा पूर्वी वैदिककाली होत असे. एतत्संबंध विवेचन 'वृद्धि व गुण' या निबंधात सविस्तर केले आहे.
(३) तस्थिवांस् + स् + स् + स = तस्थिवांस् + अ +:+:= तस्थिवांस्:
(४) तस्थिवांस् + अम् = तस्थिवांसम्
* अकारान्त शब्दापुढे म् प्रत्यय व अकारान्तेतर शब्दांपुढे अम् प्रत्यय, पाणिनी अम् प्रत्यय मूळ धरतो व अकारात शब्दाच्या टि चा लोप करून देवं हे रूप साधितो.
संस्कृत भाषेचा उलगडा
१ २ ३
१ तस्थुष् तस्थुषौ तस्थुष:, तस्थुष्
तस्थुष्
२ तस्थुषम् ' ' ' '
३ तस्थुष: तस्थुङम्भ्या तस्थुडि:भ
७ तस्थुषि तस्थुषो: तस्थुटस
तस्थिवत् वाल्यांचे कृदन्त असे चाले :
१ २ ३
१ तस्थिवत् तस्थिवतौ तस्थिवत:, तस्थिवत्
तस्थिवत्
२ तस्थिवतम् ' ' ' '
३ तस्थिवता तस्थिवद्भ्याम् तस्थिवद्भि:
७ तस्थिवत: तस्थिवतो: तस्थिवत्सु
लिट्पासून झालेल्या कृदन्ताचे पूर्ववैदिक तीन समाजात असे तीन प्रकार असत. हे तीन समाज एकवटल्यावर संमिश्र वैदिकसमाजाने तिन्ही प्रकारातून उच्चाराला सुलभ अशी रूपे निवडून पाणिनीने दिलेली रूपे योजण्याचा प्रघात पाडला. सभा भरवून व कायदा करून प्रघात पाडला असे नव्हे. संमिश्र समाजाच्या बोलण्याच्या घसटीमध्ये ती ती रूपे त्या त्या प्रत्ययामागे लावण्याचा, संमिश्र समाजाच्या स्वभावानुसार व लकबीनुसार सहज ओघाओघाने प्रघात पडला इतकेच. वैय्याकरण व शाब्दिक जेव्हा शब्दविचार व रूपविचार करू लागले तेव्हा एकाच शब्दाच्या २१ रूपात तीन भेद दिसतात असे त्यांच्या लक्षात आले. त्याकाळी त्या भेदांचे कारण पहाण्याकडे कल नव्हता. वर्तमानकाळी कारण शोधण्याकडे लक्ष असल्यामुळे, आपण या भेदांचे कारण देण्याचा यत्न करतो. या तीन समाजांच्या भाषेतील रूपांची वाटणी एकविसांपैकी कोणकोणत्या स्थळी झाली ते पहाण्यासारखे आहे. तस्थिवान्स्वाल्यांना सर्वनामस्थानची पाकच रूपे आली. तस्थुष्वाल्यांच्या वाटणीस सबंद भ म्हणजे स्वराने किंवा य ने ज्या प्रत्ययांचा प्रारंभ होतो तत्प्रत्ययान्त रूपे आली आणि तस्थिवत्वाल्यांच्या हिश्शास सबंद पद म्हणजे व्यंजनाने ज्याचा प्रारंभ होतो तत्प्रत्ययात रूपे आली. ही त्रिविध वाटणी अगदी सार्वत्रिक आहे. वाटणीचे कारण दुसरे तिसरे काही गूढ नसून फक्त उच्चारसौकर्य हे आहे. स्वरांनी व य ने ज्यांचा प्रारंभ होतो त्या प्रत्ययाच्या मानगुटीस तस्थुष् हे अंग बेश बसते म्हणून भ चा प्रांत तस्थुष् या अंगाने बनला. व्यंजनादी प्रत्ययांच्या खांद्यावर तस्थिवत् हे अंग नामी बसते म्हणून पद चा प्रांत तस्थिवत् या अंगाने व्यापिला आणि बाकी राहिलेल्या सर्वनामस्थानी टोलेजंग तस्थिवान्स् या अंगाची स्थापना झाली. ही वाटणी का झाली हे कळले म्हणजे मग द्वितीयेच्या द्विवचनानंतर तस्थिवान्स् शब्द द्वितीयेच्या अनेकवचनी तस्थिवान्स् हे बडे रूप सोडून एकदम तस्थुष: हे नमते रूप का धारण करतो व तृतीयेच्या द्विवचनाला पोहोचला असता ताटकन् तस्थिवद् हे तिसरे सोंग का घेतो या चमत्कारांचे इंगित कळते. या सोंगाचे खरे गुह्य पाणिनीला कळले नसल्यामुळे तस्थिवस् शब्दापासून तस्थुष् शब्द संप्रसारणाने व इलोपाने त्याने सिद्ध केला आणि तस्थिवत् शब्द स् स्थानी आणून व अन् चा लोप करून बनविला. वस्तुत: तिन्ही एकवटणारे समाज सवंश्य होते. एक समाज तस्थ् या अंगाला उष् प्रत्यय लावी, दुसरा इवान्स् प्रत्यय लावी आणि तिसरा स् चा सवर्ण जो त्याचा त् स्वीकार करून इवत् प्रत्यय लावी.
संस्कृत भाषेचा उलगडा
१० भिन्न भाषा बोलणाऱ्या भिन्न समाजांचे संमिश्रण होऊन वैदिकसमाज निर्माण झाला या बाबीच्या सिद्धयर्थ वैदिकभाषेतील आणिक काही शब्दांचे परोक्षण करू, तस्थिवस् हा शब्द, याची रूपे येणेप्रमाणे :
या रूपावलीत रूपांचे तीन भेद आहेत. १ कित्येक रूपे तस्थिवान्स् या अंगावरून साधलेली आहेत; २ कित्येक तस्थुष् या अंगावरून निघाली आहेत व कित्येक तस्थिवत् या अंगावरून बनली आहेत. हा असा त्रिविध प्रकार का? पाणिनी सांगतो की, हे असे होते. कोठे होते तेही तो सांगतो. या तीन प्रकारांचे पद, भ व सर्वनामस्थानविशिष्ट, असे त्याने तीन वर्गही केले आहेत. परंतु, एकाच मूळ शब्दाच्या २१ रूपांच्या या अशा तीन तऱ्हा का याचा खुलासा त्याने केला नाही. वैदिकसमाजापूर्वी अशी स्थिती होती की, उष्, इवान्स् व इवत् असे तीन निरनिराळे प्रत्यय लिटाला लावून तीन निरनिराळी कृदन्ते बनविणारे तीन निरनिराळे समाज होते. तस्थिवान्स्वाले आपले कृदन्त येणेप्रमाणे चालवीत :
१ २ ३
१ तस्थिवान् तस्थिवान्सौ तस्थिवान्स:
२ तस्थिवांसम् तस्थिवांसौ तस्थिवान्स:
३ तस्थिवांसा तस्थिवांभ्याम् तस्थिवांभि:
७ तस्थिवांसि तस्थिवांसो: तस्थिवांसु
तस्थुष् वाले आपले कृदन्त असे चालवीत:
संस्कृत भाषेचा उलगडा
तिघांचा मिलाफ झाल्यावर संमिश्र समाजाने उच्चाराला सुकर अशी रूपे तेवढी ठेविली आणि बाकीच्यांना रजा दिली. संमिश्र समाजाने म्हणजे वैदिकसमाजाने प्रथमेचे देवा: हे रूप ठेविले, द्वितीयेचे देवान् हे रूप ठेविले, तृतीयेचे देवेभि: हे रूप ठेवून शिवाय त्याहून सुलभ असे देवै: हे नवे रूप घडविले, चतुर्थीचे देवेभ्य: रूप पसंत केले आणि षष्ठी व सप्तमी यांची देवानाम् व देवेषु ही रूपे घेतली. ही रूपे पसंत करण्यात उच्चारसौलभ्याकडे जशी दृष्टी होती तशीच अनेक विभक्त्यांत एकाच उच्चाराची जी रूपे होती त्यांनाही वगळण्यात आले. भ्याम्च्या पाठीमागे देवा हे रूप का आणि भ्यस्च्या पाठीमागे देवे हे रूप की, देवान् या द्वितीयेच्या व देवानाम् या षष्ठीच्या रूपात न अकस्मात् काय म्हणून घुसला इत्यादी शंकांचे निवारण वरील पृथक्करणाने व अर्थनिवेशनाने होते. नाही तर पाणिनीच्याप्रमाणे कोरडी कारणे देऊन समाधान मानावे लागते. भ्याम्च्या पाठीमागे अंगाला दीर्घत्व येते, भ्यस्च्या मागे अंगाचा एकार होतो, षष्ठीच्या अनेकवचनी नुमागम होतो आणि द्वितीया अनेकवचनी अस् प्रत्ययाच्याऐवजी आन् प्रत्यय येतो, अशीकाही तरी समजूत करून घ्यावी लागते. पाणिनीची परिभाषा
एकीकडे सारिली म्हणजे, कित्येक प्रत्ययामागे देव शब्दाचे देवा असे रूप होते व कित्येक प्रत्ययामागे देव शब्दाचे देवा असे रूप होते व कित्येक प्रत्ययांमागे देव असेच रूप रहाते एवढेच पाणिनी सांगतो हे उघड दिसते. एका देव शब्दाची देवा: देवान्,
देवानाम्, देवेभ्य: अशी आकारी नकारी व एकारी रूपे होतात एवढेच पाणिनी सांगतो. परंतु या कोरड्या सांगण्याने समाधान होत नाही. ही भिन्न रूपे योजिणारे भिन्न समाज
होते, देव हा एकच शद्ब ते निरनिराळया तऱ्हांनी चालवीत व या भिन्न समाजांचा
मिलाफ होऊन प्रत्येक भाषेतील उच्चारसुलभ रूपे संमिश्र वैदिकभाषेत राहिली इत्यादी
परंपरा कळली म्हणजे जे समाधान होते ते असे आहे एवढया कोरड्या सांगण्याने होत
नाही.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कवडा १ [ कापटिक: = कवडा (deceitful) ] तो मोठा कवडा आहे म्ह० लुच्चा आहे.
-२ [ कपटक = कवडअ = कवडा ] ( ग्रंथमाला)
-३ [ कपोतः ] (कवोडा पहा)
कवडी [ कौमुदी = कोवुडी = कवडी] दह्याची कवडी = दघ्नः कौमुदी.
कवणु १ [क:नु = कवणु ] (भा. इ. १८३३)
-२ [ कःअन्यः = कवणुः; कःनु - कोणु, कवणु] ( ज्ञा. अ. ९ )
कवला [ कलाय: = कलावा = कवला ] कवला म्ह० एका प्रकारचें द्विदल धान्य.
कवलार १ [ कपालगृहं = कवलार ] कपाल म्ह० झांकण, मातीच्या भाजलेल्या तुकड्यांचें झांकण.
-२ । कवलागार = कवलार ] कवलानें शाकारलेलें घर. ( धवलार पहा )
कवळी १ [ कवलि: = कवळी ] पानांची कवळी.
-२ [ क्रोडा (भुजांतरं) = कोला = कौळी = कवळी] कवळी भर लांकडांची मोळी म्ह० भुजान्तरांत मावणारी लांकडांची मोळी.
-३ [कवली = कवळी (दांतांची ) ] (स. मं.)
कवोडा [ कपोतः dove = कवोडा, कवडा ]
कसकन् [ कष् १ हिंसार्थ: ] (धातुकोश-कसास पहा )
कसच (चा-ची-चें) [ कद्यच् turned towards what? = कसच (चा-ची-चें) turned towards what ? तो कसचा येतो wondering he comes turned as he is towards something else. कसचें काय आणि कसचें काय ?
कसचँ [कथंचन with great difficulty = कसचँ थ = स] तो कसचा येतो he may come with great difficulty. It will be greatly difficult for him to come.
कसणें [ कस् गतौ ] कसून काम करणारा = मुद्दाम जाऊन काम करणारा. (ग्रंथमाला)
कसवटी [ कषपट्टिका ] ( कसोटी पहा )
कसुराई [ कुसृति ] (कुसूर पहा)
कसूर १ [ कुसृतिः = कुसूर ( cheating, frandulence) कौसृतिकः = कुसुर्या. कसर (फारसी शब्द) निराळा ]