मग तें पत्र गुप्त प्रकारें मरोळ माहालि कान्ह देसल्यास पाठविलें ।। तें पत्र त्या देशलें वाचन पाहिलें ।। त्यास हि संतोष जाला ।। मग तें पत्र मालाड माहालिं सष्टि मध्यें दाखविलें आणि सर्व मिळोन निश्चये केला ।। जर भागडचुरि मारावा ॥ ह्मणोन सर्वांचे समंते पत्र त्या मुलास पाठविलें ।। तो मुल तेथिल आपला समुदाये समागमि घेवोन रात्रौ मरोळास आला ॥ तेथे सर्वांस भेटला ।। तेथे जमा सर्व केला ।। तेथोनं रात्रि पाचंबा देविस दबा मारिला ।। उदय सोमवार महड–देविची यात्रा ।। ते समई भागडचुरि मोहटे पाहाटि उठोन येसाव्यास गेला । मुक्तेश्वरि श्वान करोन देवळा मध्यें देव-दर्षन घेवोन राहिला ॥ ते समई दर्शन घेवोन बाहेरि पडला ।। समागमी बारा अश्वार स्वांग जिवाचे ।। अवघे येतां देशकें काहाळा भेरि वाजविल्या ।। हा हा शब्द होतां च हे अवघे तुटोन पडले ।। तेधवां घाबरे प्रकारे बारा श्वारा मधोन दोन स्वार तेथे च ठार जाले ।। मग ते दहा जण आड घालोन पळों लागले ।। ते अश्व चिखलांत न चालत ह्मणोन पाये उतारा जाले ।। पळों लागले।। तेधवां त्या मुलान निर्वाण घोडा टाकिला ॥ तो आला ह्मणोन उड्या खाडित टाकिल्या ।। पोवंत चालिले ।। ते च संधी त्या च खाडित होडे होते ।। त्या वर तांडेल कैवर्तक बैसला होता ।। त्यास त्या मुलान हडकिलें जर तो निळे पागडिचा भागडचुरि मारिसिल तर जे तुं मागसिल तें मी देईन ।। माझें सत्यवचन ।। यैसें यैकोन तो तांडेल बोलता जाला जर मला आपणा सारिखें कराल व जातित घ्याल तर मी मारितों ।। अड तैसाच जाणोन त्याणे आपलें सत्यवचन दिधलें की कबुल केलें ।। तेधवां त्या तांडलें पालकोईती हाणोन भागडचुरि मारिला ।। सिर घेतलें ।। आणि ते निजंग भागडचु-याचे पैलपार जाले ।। त्याचि कथा मोहोरे आहे ।। मग या तांडलें भागडचु-याचें सीर आणोन त्या मुलास दिधलें ।। तें घेवोन सर्व जमा मुक्तेश्वरि आले ।। तेथे खुशालि करों आदरिली ।। काहिक धर्म हि केला ॥ जर हा मुल लाहान वयेसे मध्ये येशवंत जाला ।। आणि पदाधिकारि सर्वेपणे प्रौढि वाढली ।। मग तेथे जातिभोजन आरंभिलें ।। ते वेळि सर्व सोमवंशि आणि सूर्यवंशि मेळवोन भोजन आरंभिलें ।। तो प्रसंग जाणोन हा तांडेल सोंवळे नेसोन तेथे आला ।। ह्मणो लागला कीं भाष उतिर्ण करावि ।। ते यैसि कीं पंक्तिपावन मज करावें ।। तेधवां सर्व बोलते जाले की आह्मि द्रव्य तुं जे मागसिल तें तुज देतों ।। आह्मा सारिसा करितों ।। तें आईकान तो तांडेल बोलता जाला कीं मला द्रव्याचि ईछा नाहि ॥ तस्मात् द्रव्य चिरकाळ नव्हे ।। ह्मणोन आपलि भाष उतिर्ण करणे ।। असेल तर जातित घेणे ।। जे माझे पेढोपेढिस राहेल ।। ह्मणोन हा निश्चये ।। यैसा दृढाव जाणोन कठोर वचन आईकान समस्त विचारि पडले ।। तेव्हा हा मुल बोलिला कीं मला भाष उतिर्ण करणे लागेल ।। न केल्यास पुर्वज हांसतिल ।। ज्याची भाख जाईल तो निरार्थक जन्मी ।। आणि पूर्वजांस अधःपात ।। ह्मणोन कबुल केलें ।। तेधवां कित्येक ईश्वरिभये धरोन उठोन रिघाले ।। काहिक त्यांचे समागमि गेले ।। आणि बहुतांहि त्या मुलाचा अभिमान धरोन त्या प्रसंगि राहिले ।। मग तो तांडेल पंक्तिस बैसविला ।। यैसे प्रकारें तांडेल जातित सरता जाला ।। भोजन संपादलें ॥ मग तेथोन सर्व समुदाये तो मुला सहवर्तमान राजदर्शनास माहिम बिंब स्थानि गेले ।। जावोन तो मुल राया नागरस्यासि भेटला ॥ त्यासि देखोन रायाने बहुत मान्य दिधला ।। बैसकार जाले ॥ ते समइं वर्तमान ॥ रायाने पृछा आदरिली ।। कीं तुज देखोन फार संतोष जाला ।। परंतु हा समाचार कळला कीं तुह्मी कैवर्तक जातित घेतला ।। हे अनकृत्य आचरलेत ।। कर्मबाह्य म्हणोन राजगुरु पोशनायक बोलावोन धर्मशास्त्र पाहों लागले ॥ तेधवां निवाडा जाला कीं अकृत्यास दंड कर्मबाह्ये यज्ञोपविते वर्जाविं ।। तेधवां त्या मुलान म्हणितलें कीं ज्यास भाष देणे ते पाळणे आह्मास ।। ऐसा निश्चयां त्या मुलाचा जाणोन रायाने यज्ञोपवितें काढविलीं ।। तो प्रसंग जाणोन क्लेषि फार जाले ॥ तें पाहातां राजा बोलिला कीं पंचरात्रि परस्परें निघतिल ।। मग त्या मुलास सीरपाव दिधला ।। साशष्टिचा देसाय केला ।। मालाड माहालचा फरमास दिधला ।। देसलिकिचा विडा देवोन आज्ञा केली ।। मग ते सर्व तेथोन मालाडास आले ।। त्यांचे मागें प्रधानास आज्ञा केलि की त्या साशष्टि मध्ये जीतके त्या तांडला समागमे जेविले असतिल ते त्यांचि येज्ञोपवितें हरणे ।। ते आज्ञा प्रधान वंदोन २०० अश्व घेवोन साष्टि मध्ये आला ॥ येवोन ढांढोरा पीटिला कीं जे त्या भोजनि जेविले असतिल त्याहि यज्ञोपवितें वर्जाविं ।। जे न यैकतिल त्यांस राजदंड आणि कर्मबाह्ये कैवर्तक ।। यैसें प्रतिपादिलें ।। धर्मशास्त्रसंमति कैवर्तक कर्मबाह्ये जाले ।। छ ।। या नंतरें राया नगरस्याचा जमातदार नामे यकांगविर सिंधा शेषवंशि नाथराव गोत्र हरिद्र कुळदेवता हिरबाये उपनावं भंडारी ।। त्यासि आणि राया नागरस्यासिं वैमानस जालें ।। व्हावयास कारण ।।
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57