Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
संस्कृत भाषेचा उलगडा
२२ आता विवेचनार्थ अजन्त व हलन्त नपुसकलिंगी शब्द घेऊ, हलन्त शब्दांपैकी स्त्रीवाचक शद्बांना व पुंवाचक शब्दांना एकच प्रत्यय लागतात, म्हणजे हलन्त शब्दात प्रत्ययदृष्ट्या पुंस्त्री हा भेद नाही. गो, रे, मातृपितृ इत्यादी अजन्त शब्दातही प्रत्ययदृष्ट्या लिंभगेद नाही. अजन्त शब्दांत प्रत्ययदृष्ट्या लिंगभेद मागाहून शिरला. तात्पर्य, अत्यंत प्राचीन अशा पूर्ववैदिकभाषात स्त्रीपुं असा लिंगभेद नव्हता. त्याकाली लिंग फक्त दोन होती, एक पुल्लिंग व दुसरे नपुंसकलिंग. नपुंसक या शब्दावरून हे अनुमान दृढ होते. पुं व नपुं असे दोन विभाग अत्यंत प्राचीन आर्यसमाजात मानिले जात. अत्यंत प्राचीन काळी स्त्रीलिंग हा विभाग जर माहीत असता, तर नपुंसक विभागात स्त्रीशब्दांचा समावेश करावा लागता. परंतु तसा समावेश झाल्याचा पुरावा बिलकुल नाही. यावरून दृढ अनुमान होते की, प्राचीन पूर्ववैदिकभाषात पुल्लिंग व नपुंसकलिंग अशी दोन लिगे शब्दांची मानीत असत. पुढे स्त्रीलिंगाची कल्पना प्रचलित झाल्यावर पूर्वीचा नपुंसकलिंग हा रूढ शब्द स्त्रीवाचक हि नव्हे व पुरुषवाचकही नव्हे अशा शब्दांना केवळ संज्ञा म्हणून लाविला जाऊ लागला. नपुंसक या शब्दाऐवजी, खरे पाहता, अस्त्रीपुंसक किंवा नस्त्रीपुंसक असा परिभाषिक शब्द बनवावयास हवा होता. परंतु सार्वत्रिक समयाने वैय्याकरणांनी तो मानिला नाही. एवढे मात्र निश्चित की, प्राचीन पूर्ववैदिकभाषेत पुल्लिंग व नपुंसकलिंग अशी फक्त दोन लिंगे मानीत, पैकी पुल्लिंगाचे व तदनुषंगाने स्त्रीलिंगाचे प्रत्यय येथपर्यंत विवेचिले. आता नपुंसकलिंगाच्या प्रत्ययाचे पृथक्करण करू. पृथक्करणार्थ, काही निवडक शब्दांची रूपे उद्धरितो :
१ २ ३
१ मनस् मनसी मनांसि
२ प्राक् प्राची प्रांची
३ महत् महती महांती
४ ब्रह्म ब्रह्मणी ब्रह्माणि
५ वारि वारिणी वारीणि
६ गुरु गुरुणी गुरूणि
७ कर्तृ कर्तृणी कर्तृणि
८ दंडि दंडिनी दंडीनि
९ कमलं कमले कमलानि
१० कमलं कमली कमलि
११ ददत् ददती ददति, ददन्ति
१२ तस्थिवत् तस्थुषी तस्थिवांसि
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
किंजळ [ किंजल = किंजळ, केंजळ. किंजलः किंजत्कः पुष्परेणू] डोळ्यांत किंजळ गेलें आहे म्हणजे धुळीचा कण गेला आहे.
किटकिट १ [ किट् त्रास पावणें, देणें. द्विरुक्तीनें किटकिट]. किटकिट म्ह० कटु व कर्कश भाषणापासून होणारा त्रास.
-२ [ किट् त्रासे. किट् किट् ( आभीक्ष्ण्यं ) = किट्कट्] किट्कट् म्ह० त्रास, पीडा.
किटकिटणें [ कीर्त् = किट्ट; द्विरुक्तीनें किटकिटणें ] उ०- कान किटणें. (भा. इ. १८३२)
किडवळ [ कीटवर्धनं ] (धातुकोश-किडवळ पहा)
किडा १ [ किद: = किडा. किद् ज्ञाने । ] तो गणितांतला किडा आहे म्ह० ज्ञाता आहे.
-२ [(स्त्री.) क्रीडा (मस्करी, थट्टा) = कीडा = किडा (पु. आकारामुळें) ] त्याला किडा आला आहे = तस्मै क्रीडा आगता, प्राप्ता; स क्रडितुं इच्छति. पीडा = पिडा ( इडापिडा) (भा. इ. १८३२)
किडाळ [ कीट = किडाळ (आळ प्रत्यय) ] (भा. इ. १८३४)
किंतान [ क्रिमितान = किंतान ] a china cloth made of silk of a worm in china. कौटिलीय अर्थशास्त्र २nd Edi-P. ११२ line १७.
किंतु [ किंतु (नाम) अव्यय ]
किनरी [ किन्नरी (वाद्यविशेष ) = किन्नरी ]
हस्तकिन्नरी = हातकिनरी.
किनी [ किणो प्रश्ने प्राकृते. किंनु = किणो = किण = किणी = किनी = कनी ] मी किनी ( अगर कनी ) तेथें गेलों होतों. प्रश्नशक्ति जाऊन केवळ पादपूरकता आली. (भा. इ. १८३२)
किर [ किल चा अपभ्रंश ] (ज्ञा. अ. ९ पृ. ३० )
किरकिरें [ कर्करि = किरकिरें ( वाद्य ) ] यदुत्पतन्वदसि कर्करिर्यथा ( ऋग्वेद मं. २-४-४२-३ ). किरकिरें हें वाद्य वेदकालीन आहे.
किरटें [ कर्तितं ( कृत् कापणें ) = किरटें ]
किरडूं [किटकतर = किडअअर = किडरूं = किरडूं ( अल्पकृमि ) ] ( भा. इ. १८३३)
किरमिजा, किरमिजी [ कृमिज = किरमिज (रंगविशेप)] हा रंग कृभिज आहे.
किरसाणा [ कृषाण: = शेतकरी. कृषाण = किरसाण ] हा शब्द Early History of the Kokan P. १९ note मध्यें आला आहे. ( भा. इ. १८३२ )
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
काळा तीळ [ तिलकालकः = तीळ काळा ] तोंडावरल्या काळ्या तिळाला संस्कृतांत तिलकालक म्हणत.
काळुसलेलें [ कलुषायितं = काळुसलेलें (स्वार्थे ल) ] काळुसलेलें म्ह० गढूळ. (भा. इ. १८३४)
काळेंकाळें [ कालकालं (ईषत्कालं) = काळेंकाळें ] पांढरेंपांढरें, तांबडेतांबडें इत्यादि स्थळीं द्विरुक्ति ईषद्भाक दाखविते (अष्टाध्यायी ८-१-१२ )
काळेंकुट्ट [ कालं कृष्णं = काळें कुट्ट. कृष्ण = कुठ्ठ = कुट्ट. जसें, विष्णु = विठ्ठु] (भा. इ. १८३४)
काळेंनिळें [ कालनील (अमर) = काळेंनिळें ] (भा. इ. १८३४)
काळेंबेरें [ कालिकं वैरं - काळें बेरें ]
प्रकृष्टो दीर्घः कालः अस्य इति कालिकं वैरं । (अष्टाध्यायी ५-१-१०८) काळें बेरें म्हणजे फारा दिवसांचें वैर.
काळेंभोर [ कालं बहुलं = काळेंभोर. बहुल ( कृष्ण ) = भउर = भोर. भोर म्ह० काळें. र = ल ] कपिल = कबिर; किल - कीर (ज्ञानेश्वर-अव्यय ) या दोन ठिकाणीं ल चा र होतो. (भा. इ. १८३४)
काळेला [कालिल: = काळेला. जटाघटाकालाः क्षेपे]
काळेंसांवळे [ कालश्यामल (अमर) = काळेंसांवळे ] (भा. इ. १८३४)
काळोख [ कालक्ष्यं (काल + अक्ष eye ) = काळोख ] ज्यांत नेत्रांना काळें दिसतें.
काळोखी [ कलुषता = कळूखी = काळोखी ]
किउत ( ता-ती-तें ) [ किमुत = किवुत = किउत (ता-ती-तें) ] (भा. इ. १८३३)
किंकाळी [ किंकालि: ] (धातुकोश-किंकळ पहा)
किचकट १ [ कृछ्रकटं = किच्चकटं = किचकट ]
-२ [ कृछ्रकष्टं = किचकट. कृछ्रकष्टं कलाकुलं । ]
किचका [ किष्कु (नीच ) = किचका ]
किचट १ [ कृछ्र = किच + ट = किचट ( कठीण, अडचणीचें ) ] (भा. इ. १८३३)
-२ [ कृछ्रिष्ट = किचिट = किचट ] कृछ्रिष्ट म्हणजे अति कृछ्र, अति बिकट.
किचाट [ कृष्छ्रकटं = किच्चअट = किचाट ]
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
काव [ कायः . कै १ शब्दे ] ( धा. सा. श. )
कावकाव [ कायः ] (काव पहा)
कावड १ [ कंबिकाष्टिका = कामीट = कावीड = कावड ] कावड बांबूच्या कामटीची करतात.
-२ [ क + विवध = कावड ] क म्हणजे पाणी व विवध म्हणजे तें नेण्याचें एक साधन. विवधवीवधशब्दौ उभयतो बद्धशिक्ये स्कंधवाह्ये काष्टे वर्तेते ।
कावडी [ कापर्टिक = कावडी ]
कावळा [ काकोल: = काओळा = कावळा ]
कावळी १ [ काकवल्ली = कावळी ]
-२ [ काकांगी = कावळी (काकवल्ली) ]
कावा [ कामः = कावा. कम् १ इच्छायाम्] गुप्त इच्छा.
काशा [ कंशः = काशा ] काशा म्ह० पाणी पिण्याचें एक भांडें.
काष्ट [काष्ठ म्हणजे उंच लुकडा मनुष्य ] (भा. इ. १८३३ )
कास १ [ कक्ष्या = कास ]
-२ [ कर्षू (नांगरटी खालची जमीन) = कास ] कास बिघा शब्द जुन्या मराठी लेखांत येतो.
कासंडी १ [ कंशभांडिका = कासंडी ] एक प्रकारचें पाणी पिण्याचें भांडें.
-२ [ कांस्यकुंडिका = कासंडी ]
काँसंडी, काँसांडी [ कांस्यहंडि = काँसअंडी = कासांडी = कासंडी ] ( भा. इ. १८३३)
काँसार [ कांस्यकार = कांसआर = काँसार ] (भा. इ. १८३३)
कासोटा [ कक्षापट:, कच्छपट: = कासोटा ]
कास्त [कास्तीरः = कस्तीरकारः . कस्तीर म्ह० कथिल, कथलाचें काम करणारा जो तो कास्तीर-कास्तीर: = कास्त ] (भा. इ. १८३३)
काहल [ कलाहक:, कलाहिका = काहल (वर्णविपर्यय) ] काहल एक वाद्य आहे.
काहाली [ कारिका = कालीआ = काहाली. कारिका यातनायां (अमरकोश ) ] काहाली म्ह० यातना.
काँ हि [ किम् अपि = काँ भि = काँ हि (some what) (भा. इ. १८३३ )
कांहिच [किमपिचित्] (भा. इ. १८३३)
कां होई नां [ कामं भवतु नाम. कामं = कां. नाम = नां] (भा. इ. १८३४)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कायकीं [ किंकिल = कायकी ] किंकिल शूद्रान्नं भोक्ष्यसे = शूद्राचें अन्न खाशील कायकी !
कारट ( टा-टी-टें) १ [ कृतक: एव कार्तकः. कार्तकः = कारटअ = कारटा. कार्तकी = कारटी. कार्तकं = कारटें ] मानीव पुत्र तो कृतक-निंदार्थी मराठींत कारटा. (भा. इ. १८३४)
-२ [ करट = कारट (ब्राह्मणब्रुव) टा-टें-टी.] ( स. मं. )
कारटा १ [ एकादशादिश्राद्धे करष्टः । (अमरकोशटीका) करटं एकादशादिश्राद्धं करोतीति कारटः । कारट: = कारटा ] स्मशानांतील कारटा.
-२ [ ( संस्कृत) करट: म्ह० अकराव्या दिवसाचें भोजन. त्या भोजनाला जाणारा तो कारटा ] (भा. इ. १८३६ )
-३ [ करटो वाद्यभांडकुविप्रयोः (त्रि. शे.). करट = कारट = कारटें-टा-टी ] (ग्रंथमाला)
कारटीचिरटी [ करंटीचिरंटी = कारटीचिरटी ] (भा. इ. १८३३)
कारण [ करणं = कारण (करण म्ह० व्रतबंधादि कार्य )] आमच्या घरीं कारण निघालें म्ह० व्रतबंधादि कार्य निघालें.
कारभार [ कार्यभारः = कारभार ] कारबार ह्या फारशी शब्दाशीं कांहींएक संबंध नाहीं. स्वत: कारबार हा शब्द संस्कृत कार्यभार ह्या शब्दापासून निघालेला आहे. कारभार हा शब्द नामयाच्या जनांच्या अभंगांत येतो. (भा. इ. १८३४)
कारली [ कारवल्ली = कारली ] ( भा. इ. १८३७)
कारवई [ कार्मता ] ( कारवाई १ पहा )
कारवाई १ [ कार्मता = कार्वई = कार्वाई. कार्मः कर्मशीलः ( अमर ) ] (भा. इ. १८३४)
-२ [ कार्यवाहकता = कारवाई] skilful management
काल १ [ कल्य = कल्ल = काल ] (आज पहा)
-२ [ कल्लि = काल (आजच्या पाठीमागील दिवशीं ) ] (भा. इ. १८३६)
कालथा [ क्लथक: = कालथा (भा. इ. १८३४)
कालवड [ कलभटी = कलहडी = कलअडी = कलवडी = कालवड. येथें ल चा ळ झाला नाहीं ] (भा. इ. १८३२)
कालवण [ कल्यपानं, कल्यपानीयं = कालवण. कल् १० क्षेपे; पा १ पाने ] न्याहारी सोबत पातळ पदार्थ. ( धा. सा. श. )
काला [ कल्य: = काला ] काला म्ह० सकाळचा फराळ. उत्सवांत उपासानंतर दुसर्या दिवशीं सकाळीं जो फराळ किंवा जेवण करतात तें. गोपाळकाला.
संस्कृत भाषेचा उलगडा
या दुहेरी वागणुकीचा अर्थ काय? अर्थ असा की, पूर्ववैदिकसमाजात एक समाज मति शब्द पुल्लिंगी मानी आणि दुसरा समाज स्त्रीलिंगी मानी. दोन्ही समाज एकवटल्यावर कोणी पुल्लिंगी रूपे योजीत व कोणी स्त्रीलिंगी रूपे योजीत. अशा स्थितीत वैदिकभाषा उत्पन्न झाली आणि ती भाषा बोलणाऱ्या वैय्याकरणाना दोन दोन रूपे वापरण्यात असलेली जी साक्षात आढळली ती त्यांनी प्रामाणिकपणे नमूद करून ठेविली. जुनाटभाषेच्या पहिल्या थरांत लिंगभेद नव्हता व लिंगभेददर्शकप्रत्ययही नव्हते. पुढे व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे हे यद्यपि कळू लागले तत्रापि हा भेद प्रत्ययांनी दाखविण्याची युक्ति सुचली नव्हती. नंतर स्वतंत्र पुंप्रत्यय व स्त्रीप्रत्यय निर्माण झाले. तेव्हा कोणता शब्द पुं व कोणता स्त्री मानावा या संबंधाने निरनिराळया समाजाची निरनिराळी मते पडून एकच शब्द एका समाजात पुल्लिंगी तर दुसऱ्या समाजात स्त्रीलिंगी मानला गेला. नंतर या दोन समाजाचा मिलाफ झाला. मिलाफ झाल्यावर दोन्ही रूपे शिष्ट म्हणजे थट्टा न होता वापरली जाणारी रूपे समजली गेली, या दुहेरी स्वभावाचा अवशेष हे दुतोंडी शब्द होत. ही दुतोंडी रूपे पाणिनीच्याकाली प्रचलित होती. दुतोंडी शब्दांपैकी इकारान्त व उकारान्त शब्दांचा कल इकारान्त व उकारान्त पुल्लिंगी शब्दाकडे फार झुकतो व ईकारान्त व ऊकारान्त शब्दांचा कल ईकारान्त व ऊकारान्त स्त्रीलिंगी शब्दांकडे फार झुकतो. मति व धेनु यांच्या पंचवीस रूपापैकी एकोणीस रूपे हरि व गुरु शब्दांच्या रूपासारखी आहेत. चार रूपे नदी शब्दाच्या रूपासारखी विकल्पाने आहेत व दोन रूपे नदी शब्दासारखी नित्यत्वाने आहेत. धी व भू यांच्या सव्वीस रूपापैकी फक्त चार रूपे पुल्लिंगी प्रत्यय विकल्पाने घेतात. एकवीस रूपांचा कल नदी व वधू शब्दांच्या रूपाकडे नित्यत्वाने आहे व एक रूप हलन्त शब्दांच्या रूपाचे अनुकरण करते. मति व धेनु हे शब्द घ्या किंवा धी व भू हे शब्द घ्या. यांच्या रूपापैकी चार स्थानची रूपे विकल्पाने स्त्री लिंगी किंवा पुल्लिंगी होतात ती स्थाने म्हणजे चतुर्थी, पंचमी, षष्ठी व सप्तमी, या चार विभक्त्यांची एकवचनस्थाने. म्हणजे हा विकल्पाचा चमत्कार भस्थानात घडतो. सर्वनामस्थानच्या पाच रूपात किंवा पदस्थानच्या सात रूपात घडत नाही. भस्थानीच तेवढी वैकल्पिक रूपे का यावीत? या प्रश्नाचे उत्तर असे. पूर्ववैदिक तीन भाषांचा मिलाफ होऊन वैदिकभाषा निर्माण झाली हे वारंवार आपण पहात आलोच आहोत पैकी भस्थानीय रूपे ज्या पूर्ववैदिकभाषेतून घेतली त्या पूर्ववैदिकभाषेत प्रथम पुल्लिंग व स्त्रीलिंग यांच्या प्रत्ययात भेद उत्पन्न झाला व तो भेद वैदिकभाषेत शिरला. तक्ता देतो त्यावरून स्पष्टता जास्त खुलासा होईल :
स्वे हा प्रत्यय पुल्लिंगी का मानिला गेला व स्यै हा प्रत्यय स्त्रीलिंगी का मानिला गेला, तसेच स्यस् व स्यि पुल्लिंगी का आणि स्याम् व स्यास् स्त्रिलिंगी का, एतत्संबंधक विवेचन पुढे यथास्थली होणार असल्यामुळे, हा प्रश्न इथे एवढाच सोडून देतो.
संस्कृत भाषेचा उलगडा
तक्त्यातील पाचव्या कंसात रै व गौ हे शब्द स्त्रीलिंगी व पुल्लिंगी सारखेच चालतात. म्हणजे यांना स्त्रीलिंगी व पुल्लिंगी सारखेच प्रत्यय लागतात याचा अर्थ असा की, विभक्तिप्रत्ययावरून लिंग दाखविण्याची युक्ति निघण्यापूर्वीचे हे रै व गौ शब्द आहेत. गा:, गौ:, गवा या रूपांवरून बैल विवक्षित आहेत की गाई विवक्षित आहेत ते सांगता येत नाही, त्यांच्या पाठीमागे इमा:, एव: इत्यादी विशेषणे जेव्हा लावावी तेव्हा स्त्री की पुरुष हे ज्ञान होते. हलन्त स्त्री किंवा पुं शब्दांना ज्याप्रमाणे सारखेच विभक्तिप्रत्यय लागतात त्याचप्रमाणे रै व गो या शब्दांना दोन्ही लिगी एकच विभक्तिप्रत्यय लागतात. दुसऱ्या रीतीने बोलावयाचे म्हणजे रै व गौ शब्द जेव्हा प्रचलित झाले तेव्हा पूर्ववैदिकसमाजात लिंगदर्शक निराळे विभक्तिप्रत्यय नव्हते. गो हा शब्द प्रचारात फार असल्यामुळे त्याची जुनाट रूपे जशीची तशीच पाणिनीपर्यंत पोहोचली. पाचव्या कंसांतील पुल्लिंगी ग्लौ शब्द व स्त्रीलिंगी नौ शब्द हे शब्दही गो शब्दाइतके च जुनें असून यांना सारखेच विभक्तिप्रत्यय लागतात. अत्यंत पुरातनकाली आर्यंभाषात लिंगभेददर्शक विभक्तिप्रत्यय नव्हते हे उघड आहे. चवथ्या कंसात पितृ व मातृ हे जुनाट शब्द आहेत, पितृ पुं वाचक आहे व मातृ स्त्री वाचक आहे, असे वैदिककाली मानीत व पाणिनीयकाली मानीत, परंतु पूर्ववैदिककालच्या अत्यंत जुनाट थरात हे दोन्ही शब्द स्त्री पुंभेदवाचक नव्हते. कारण या दोन्ही शब्दांना एकच विभक्तिप्रत्यय, हे प्रत्यय अस्तित्वात आल्यावर लागू लागले. पाणिनीय व छांदसभाषेत पितृ व मातृ यांच्या रूपात एका स्थली मात्र भेद आहे. ते स्थल द्वितीयात्रिवचन हे होय, पितृन् व मातृ: अशी भिन्न रूपे पाणिनी देतो. परंतु एकेकाळी पितृन् व मातृन् अशी सारखीच रूपे होती याला ज्ञापक आहे. मातृ शब्दाचे षष्ठीचे अनेकवचन मातृणाम् असे पाणिनीयभाषेत होते. प्रथमेच्या अनेकवचनी मातृ शब्दाची रूपे मातृँ: मातृन् असल्याशिवाय, मातृणाम् हे रूप सिद्ध व्हावयाचे नाही अशी अपरिहार्यता असल्यामुळे, पितृन्प्रमाणे मातृन् असे द्वितीयाअनेकवचनी रूप जुनाटकाळी होते हे स्पष्ट आहे. तात्पर्य, जुनाटकाळी पितृ व मातृ या शब्दांना एकच प्रत्यय लागत. पुढे कालान्तराने वैदिकभाषा अस्तित्वात येत असताना विभक्तिप्रत्ययानी भेद दर्शविण्याकडे लक्ष जाऊ लागले व पितृन रूपापासून मातृ: रूप विभेदू लागले. मातृ: रूपाच्या अंती जो विसर्जनीय आहे तो जात्या स्त्री प्रत्यय नाही. तो प्रत्यय स्त्री शब्दांना जसा लागतो तसाच पुंशब्दांनाही लागतो तेव्हा मातृशब्दाचे द्वितीयानेकवचन मातृ: करून लिंगभेद दाखविण्याचा हेतू नव्हता हे स्पष्ट आहे, फक्त भेद दाखविण्याची बुद्धी होती. रै, गो, द्यो ग्लौ, नौ इत्यादी शब्दांच्या द्वितीयानेकवचनी ही भेदबुद्धी मुळीच नव्हती. या ऋकारान्त पितृमातृशब्दांच्या द्वितीयानेकवचनातच प्रथमत: ती अनुभवास येते. कालान्तराने ही भेदबुद्धीक इतकी एकपक्षी झाली की, पाणिनीकाली स्त्रींलिंगी शब्द म्हटला की त्याचे द्वितीयानेकवचन नन्त कधीच नसावयाचे, सदा विसर्जनीयान्त असावयाचे. बाकी न् चा किंवा विसर्जनीयाचा लिंगाशी काहीएक संबंध नाही हे रूपसाधनिकेवरून सहज लक्षात येण्यासारखे आहे. पितृ व मातृ या ऋकारान्त शब्दांच्या एका रूपात फक्त भेदबुद्धीचा आभास मात्र झाला. खरी लिंगभेदबुद्धी आकारान्त, इकारान्त, उकारान्त, ईकारान्त व ऊकारान्त शब्दांच्या चतुर्थी पंचमी, षष्ठी व सप्तमी यांच्या एकवचनी प्रत्ययात स्पष्ट दिसू लागते. तक्त्यांतील रमा व गोपा किंवा हरि व नदी, किंवा नदी व वातप्रमी यांचे भस्थानीय प्रत्यय पहा म्हणजे स्त्रीलिंगी व पुल्लिंगी भिन्न प्रत्यय संस्कृतात निर्माण झाल्याचा वास येऊ लागतो आणि ही भिन्नता कोणत्या रस्त्याने आली ते मति व धेनु आणि धी व भू या शब्दांच्या भस्थानीय प्रत्ययांवरून कळते. तक्त्यावरून दिसेल की, नदी व रमा नित्यस्त्रांप्रत्ययग्राही आहेत आणि हरिगुरु व वातप्रमीखलपू नित्यपुंप्रत्ययग्राही आहेत. या नित्यस्त्री व नित्यपुं शब्दांच्यामध्ये स्त्रीप्रत्यय व पुंप्रत्यय असे दोन्ही प्रत्यय घेणाऱ्या मतिधेनु व धीभू या जोड्या आहेत. मति शब्द एकदा पुल्लिंगी हरि शब्दाप्रमाणे चालतो आणि एकदा स्त्रीलिंगी नदी शब्दाप्रमाणे चालतो.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कांब [कंबि branch of बांबू = कांब, कांबीट a splinter of बांबू ]
कांबळ [कंबल = कांबळ] कंबल म्ह० बैलाच्या मानेखालील पोळी. मराठींत तिला कांबळ म्हणतात.
कांबळ्या [कांबलिकः = कांबळ्या ] कांबळ्या म्ह० घोंगड्या.
काबाडकष्ट [ कर्वतकष्ट = कब्बटकष्ट = काबाडकष्ट ] ( भा. इ. १८३२ )
कांबीट [ कंबि ] ( कांब पहा )
काबू १ [ कंबूः a thief, a mean fellow ]
-२ [कंबुक a mean fellow ]
-३ [ कामुक - की = कावुअ = कावू (मतलबी) द्याश्रयमहाकाव्य-४-५१ ]
-४ [ कमेर्बुक् (उणादि ९८) कंबूः परद्रव्यापहारी.
कंबू = काँबू= काबू] तो मोठा काबू आहे म्ह० परद्रव्यापहारी आहे. ( भा. इ. १८३३)
कामकरी १ [ कर्मकरः = कामकर - री ( मजूर ) ] (भा. इ. १८३३, १८३६)
-२ [ कर्मकर: = कामकरी. भृत्याजीवः ] (भा. इ. १८३४)
कामगार १ [ कर्मकार: = कामगार (शिल्पी, वरिष्ठ |प्रतीचा मजूर ) ] ( भा. इ. १८३३, ३६ )
-२ [ कर्मकारः = कामगार. विना भृतिं कर्मसंपादकः ( क्षीरस्वामी - अमर) ] (भा. इ. १८३४)
कामसू [ कर्मशूर = कामसूअ = कामसू ( र = अ ) ] काम करण्यांत पटाईत. मुलगी कामसू आहे म्ह० मोठी मेहनती आहे. (भा. इ. १८३४, ३६ )
कामाटी १ [कर्मयष्टिं = कामाटी ( लेखनकामाटी - एकनाथ ) ] (भा. इ. १८३४)
-२ [ कर्मवाटी (चांदण्याचा दिवस) = कामाटी ] लेखनकामाटी पूर्ण जाली म्हणजे लेखनरूप चांदण्याचा दिवस पूर्ण जाला म्हणजे तो चांदण्याचा दिवस वाढत वाढत पूर्णिमेप्रत प्राप्त झाला. लेखन शब्दावरहि श्लेष आहे. लेखा किंवा लेखन म्ह० चंद्राची कला. तसेंच लेखन किंवा लेखा म्हणजे लिहिणें. कामाटी शब्दांत हि श्लेष आहे. कामाटी म्ह० काबाडकष्ट व चांदण्याचा दिवस.
काँय [ किमिति ] ( काँइ पहा)
कायकिर ! कायकिरे ! [ किंकिल ! what a pity ! = कायकिर ! कायकिरे ! ] कायकिर कोठें गेला न कळे what a pity ! dont know where gone.
संस्कृत भाषेचा उलगडा
२१ अजन्त शब्दांपैकी स्त्रीवाचक शब्दांचे भस्थानीय प्रत्यय पुंवाचक शब्दांच्या भस्थानीय प्रत्ययांहून कोठेकोठे भिन्न आहेत. त्यांचा तक्ता खाली देतो. कोठेकोठे भस्थानीय प्रत्ययांमागे स्त्रीवाचक शब्दांचे अंग पुरुषवाचक शब्दांच्या अंगाहून निराळे असते तेही तक्त्यात दाखवितो :
संस्कृत भाषेचा उलगडा
१९ ऋ व य् हे दोन स्वरान्त शब्द पूर्ववैदिक भाषात होते. त्याप्रमाणे लु या स्वरान्त शब्दही असावेत. गमलृ व शकलृ हे अनुकरणात्मक शब्द समजतात. परंतु ऋलृ चे सावर्ण्य पूर्ववैदिकभाषात होत असावे. विशेषत: अडाणी व बाले यांच्यात ऋ चा उच्चार लृ करीत असावे. कर्तृ चा उच्चार कत्तलृ असा होत असावा. हे लृकारान्त शब्द ऋकारान्त किंवा य्कारान्त शब्दाप्रमाणे चालत. तात्पर्य य्, ऋ व लृ या स्वरान्त शब्द पूर्ववैदिकभाषात होते. आकारान्त स्त्रीलिंगी शब्द मूळचे य् स्वरान्त होते, हे रमा शब्द चालविताना दिसून आलेच आहे. व् स्वरान्तही शब्द पूर्ववैदिकभाषेत असावे. ग्व् (म्हणजे धेनू) हा शब्द मूळचा व्स्वरान्न असावा व तो असा
१ २ ३
१ गा गावौ गाव:
गवौ गव:
२ गावम् ' ' गाव:
गवम् ' ' गून्
३ ग्वा ग्वभ्याम् ग्वभि:
६ गु: ग्वो: गूनाम्
असा चालत असावा. पैकी गूनाम् याचा अपभ्रंश गोनाम् हे रूप वेदांत येते.
२० स्त्री, धी इत्यादी शब्दांच्या स्त्रिया, धिया वगैरे रूपात यकार येतो. त्याचे कारण पूर्ववैदिककाली या शब्दांची रूपे स्त्ऱ्यी, घ्यी अशी यकारामय होती हे होय. मूळ धातूत यकार असल्यामुळे त्यापासूनच्या कृदन्तांतही तो यकार सहजच आला.
ध्यी + आ = धि य् + आ = धिया
स्त्ऱ्यी + आ = स्त्रि य्ं + आ = स्त्रिया
भ्वू + आ = भु व + आ = भुवा
* पूर्ववैदिककाली भू धातूचे मूळरूप भ्वू असे असावे.
अनुकरणाने इतर इकारान्त इ.इ.इ. अर्वाचीन शब्दांच्याही रूपात यकार शिरला.