Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

कुकडा [ कौक्कुटिक = कुकडा] कुकडा म्ह० ढोंगी, लुच्चा.

कुकरा [ कुकर: = कुकरा] आखूड हाताचा मनुष्य.

कुकवाकू [ कृकवाकु = कुकवाकू. कृकवाकु म्ह० मोर ] गांडींत नाहीं गू आणि कावळा करतो कुकवाकू म्हणजे अंगांत तें सामर्थ्य नसतांना कावळा मोराचा शब्द जो कृकवाकू तो काढूं पहातो. (भा. इ. १८३२ )

कुचकट [ कुचक: = कुचक + ट = कुचकट. कुचु, खुजु स्तेयकरणे ] कुचकट म्ह० चोर.

कुचका १ [ कुच् कौटिल्ये. कुचक: = कुचका ]

-२ [कुशिक: = कुचिका, कुचका ] मुली द्वाड मुलांना कुचका वगैरे शब्द लावतात. येथें कुचका म्ह० चकणा असा अर्थ असतो. (भा. इ. १८३५)

कुचकुच [ कुच् शब्दे ( तक्रारीचा अस्पष्ट शब्द ) द्विरुक्तीनें कुचकुच ] अस्पष्ट रीतीनें तत्कार करणें.

कुचर [ कुचर ( वाईट चालीचा) = कुचर ] (भा. इ. १८३३)

कुचरट [ कूचिदर्थिन् = कुचरट ] having errands every where म्हणजे कोठें च कांहीं काम न करणारा.

कुचराई [ कुसृति ] (कुसूर पहा)

कुंचा [ कूर्च: = कुंचा] डोक्याच्या केसाचा हजामानें काढलेला.

कुचाळी [ कुत्स् १० अवक्षेपणे. कुत्सालुता = कुचाळी]

कुचिद्य [ कुश्चितं:= कुचिद्य ] निवृत्तिराम-१५ वा समास ओंवी २४

(गल्ली) कुच्ची [कुत्सित = कुच्चिअ = कुच्ची ] गल्ली कुच्ची = कुत्सित, घाणेरडी गल्ली. (भा. इ. १८३२)

कुटाळ [ कूट = खोटा; आळ हा प्रत्यय लागून कूटाळ. त्याचें र्‍हस्व उकार होऊन कुटाळ ] (भा. इ. १८३२ )

कुंठणें [ कुंठनं] ( धातुकोश-कुंठ पहा)

कुठून [ कुठ्ण कुठ्ण पहा ]

कुठ्ण कुठ्ण [ कृत्स्न = कुठ्दण ] कुठ्ण कुठ्ण प्रश्न विचारतो = कृत्स्नकृत्स्नप्रश्नान् अनुयंक्ते. (भा. इ. १८३४ )

कुंड (डा-डी ) [ कुंडक = कुंडा. कुंडिका = कुंडी ] घटिका कृतिमुपमृद्य कुंडिकाः क्रियंते । ( पतंजलि-महाभाष्य- Vol. I. P.७. Kielhorn) (भा. इ. १८३३)

स्य उच्चार करणाऱ्या समाजाच्या भाषेतील प्रथमेचे एकवचन स्य: वैदिकभाषेत येऊन बाकीची रूपे त्य उच्चार करणाऱ्याच्या भाषेतील आली. सर्व साधनिका देव शब्दाप्रमाणे.

                           स्त्रीलिंग

       १                २                ३
१     त्या             त्ये              त्या:
२     त्याम्          त्ये              त्या:
३     त्यया         त्याभ्याम्       त्याभि:
४    त्यास्यै           ' '             त्याभ्य:

त्या व रमा यांच्या रूपात भेद इतकाच कीक स्यै, स्या: स्याम् या प्रत्ययामागे रमा शब्दाचे रमा हे आकारान्त अंग असते व त्या शब्दाचे रय हे अकारान्त अंग असते. म्हणजे त्या हा शब्द भाषितपुंस्क धरला गेला. त्यास्यै न होता त्यस्यै होते. याचे कारण असे की, स्यै वगैरे प्रत्ययच स्त्रीलिंगदर्शक असल्यामुळे त्य या अंगाला आ हा स्त्री प्रत्यय जोडला नाही. रमा, रामा, इत्यादी शब्द स्वतंत्र स्त्रीलिंगी गणल्यामुळे, त्यांच्या आकारान्त अंगाला स्यै वगैरे स्त्रीलिंगी प्रत्यय लागतात.

           नपुंसकलिंग

          १                   २              ३
        १ व २ त्यत्        त्ये            त्यानि

                बाकी रूपे पुल्लिंगवत्

नपुंसकलिंगी स्य सर्वनामाची त्यत् ही खूण इथे नाही. याचे कारण असे की स्य उच्चार करणाऱ्यांच्या समाजात नपुंसकलिंग निर्माण झाले नव्हते. त्यत्, रये, त्यानि या तीन रूपात दोन भाषातल्या रूपांचे मिश्रण आहे. केवळ नपुंसकलिंगी भाषा बोलणारा एक पूर्ववैदिक जुनाट समाज होता म्हणून मागे सांगितले. त्या समाजात त्यत् हे सर्वनामरूप होते व पुल्लिंगी भाषा बोलणाऱ्यांच्या समाजात त्य हे प्रातिपदिक होते. पहिला समाज त्यत् हे सर्वनाम असे चालवी :

             १               २                  ३
          त्यत्             त्यती             त्यन्ति
आणि दुसरा समाज त्यं, त्ये, त्यानि अशी रूपावली रची. दोहोंचे संमिश्रच होऊन

         त्यत्               त्ये               त्यानि

ही रूपे मिश्र जी वैदिकभाषा तीत आली.

२५ अजन्त व हलन्त शब्दांनंतर सर्वनामांचा विचार ओघानेच येतो. खालील क्रमाने सर्वनामरूपांचे पृथक्करण करतो.
त्यत्, तद्, एतद्, इदम्, यत्, किम्, इ.इ.
अदस्
त्रि, चतुर्
अष्टन्
अस्मत्, युग्मत्
(१) पाणिनीय त्यद् शब्द : पाणिनी त्यद् असे प्रातिपदिक देतो. परंतु त्य हे मूळ रूप समजणे प्रशस्ततर. त्य हे सर्वनाम पूर्ववैदिक समाजात दोन तऱ्हेने उच्चारीत. एक समाज स्य उच्चार करी व दुसरा समाज त्या असा उच्चार करी. तस्थिवस् ह्न तस्थिवत् असा त चा स उच्चार आर्य भाषात होतो व होत असे. हे त्य ह्न त्य सर्वनाम देव शब्दाप्रमाणे चाले. इतकेच की चतुर्थी, पंचमी, व सप्तमी यांच्या एकवचनी स्य, स्यात्, स्य, स्यि हे प्रत्यय न लागता स्मै, स्मात् व स्मिन् हे प्रत्यय लागत. पूर्ववैदिक भाषात त्य ह्न स्य असा चाले :

                        पुल्लिंग
           १                   २                        ३
१     त्य: स्य:         त्यौ स्या           त्ये स्ये, त्या: स्या: न्याँ: स्याँ:
२     त्यं स्यं             '' ''              त्यान् स्यान्
३     त्येन स्येन      त्याभ्याम्          स्यै: स्यै:
                         त्याभ्याम्
४    त्यस्मै स्यस्मै      ' '                त्येभ्य: स्येभ्य:
                            ' '
५ त्यस्मात् स्यस्मात्   ' '                     '' ''
' '
६ त्यस्य स्यस्य       त्ययो: स्ययो:    त्येषाम् स्येषाम्
७ त्यस्मिन् स्यस्मिन्    '' ''              त्येषु स्येषु

२४ नपुंसकशब्दांच्या रूपांची आम्ही केलेल्या या साधनिकेची आता पाणिनीने केलेल्या रूपसिद्धीशी तुलना करू. प्रत्येक विभक्तीचे तीन तीन मिळून सात विभक्त्यांचे सु, औ, जस् इत्यादी एकवीस प्रत्यय पाणिनीने मूळ म्हणून निवडून काढिले आणि नंतर जेथे जेथे हे प्रत्यय न लागता दुसरेच प्रत्यय लागतात तेथे तेथे अमुक मूळ प्रत्ययाच्या स्थानी अमुक नवीन प्रत्ययाचा आगम किंवा आदेश होतो, असे सांगण्याचा क्रम धरिला. पुल्लिंगी प्रथमेच्या एकवचनाचा स् प्रत्यय नपुंसकशद्बाच्या प्रथमैकवचनात दिसत नाही, सबब स् स्थानी अम् प्रत्यय येतो, असे सांगण्याकरिता त्याने एक नवीन सूत्र रचिले. औ स्थानीं ई, जस् स्थानीं इ व न्आ गम, शस् स्थानी इ न् आगम, टा स्थानी न् आगम, ङे स्थानी विकल्पे न् आगम् इत्यादी शेकडो ठिकाणी शेकडो आगम त्याला करताना पाहून, पराकाष्ठेची कीव उत्पन्न होते. हे झाले प्रत्ययासंबंधाने, सर्वनामस्थान, भ व पद यांच्या बाबीत मूळ प्रातिपदिकापासून अंगे तयार करण्याकरिता शेकडो ठिकाणी नवीन नवीन सूत्रे रचावी लागली आहेत या सूत्रांच्या जाळ्यांतून वाट काढता काढता नवशिक्या व जूनशिक्या अशा दोन्ही विद्यार्थ्यांचे पंचप्राण कासावीस होतात. इतकेच नव्हे तर ठणठणीत कोरडे होतात. देव शब्दाची देव, देवा, देवे ही अंगे होतात किंवा तस्थिवस् शब्दांची तस्थिवत्, तस्थुष् व तस्थिवांस् ही अंगे होतात हे सूत्रांवरून विद्यार्थी जाणतो. परंतु आगम का होतात, आदेश का होतात, अंगे का बदलतात, हे पाणिनी सांगत नसल्यामुळे, शास्त्राध्ययनापासून मतीला जी प्रगतिशीलता व जो जागतेपणा यावा तो येत नाही. याचे कारण, इतिहासदृष्टीचा पूर्ण अभाव. वैदिकभाषा ही देवांची भाषा असून ती अर्थात् अनादी आहे अशी पाणिनीची विचित्र समजूत होती यात मोठेसे नवल नाही. नवल दुसरेच आहे. वैदिकभाषेपासून संस्कृत भाषा निघाली या अर्थाचा एक शब्द किंवा एक ज्ञापक संबंध अष्टाध्यायीत एकही नाही. वैदिकभाषेचा संस्कृतभाषा हा अपभ्रंश किंवा विपरिणाम आहे, हीसुद्धा कल्पना पाणिनीला शिवलेली नाही. शुद्ध प्रयोग विद्यार्थ्यांना कळावेत म्हणून पाणिनीने सूत्रे रचिली. तत्रापि वेदांत येणारे आर्ष प्रयोग व भाषेत येणारे लौकिक प्रयोग दोन्ही सारखेच शुद्ध आहेत असे तो मानी. छांदस प्रयोग विचित्र दिसला तर छंदासि बहुलं म्हणून वेदांतील अशुद्ध नव्हत, पण हेंगाड्या रूपांसंबंधाने पाणिनी तिरस्कार व उपहास न दाखविता उलटा आदर दाखवितो. या इतिहासांधतेमुळे, वेदांच्यापाठीमागे जग नव्हते व काल नव्हता, इत्यादी प्रगतिविरोधक कल्पना समाजात प्रचलित झाल्या आणि भावीकालासंबंधाने तुच्छता वाटूक लागली. पूर्ववैदिक अनेकभाषा, वैदिकभाषा पाणिनीयभाषा, प्राकृतभाषा व मराठीप्रभृती प्राकृतिक भाषा ही चढती वर्धमान श्रेढी आहे ही कल्पना यावयाची ती न येता, ही उतरती क्षीयमान श्रेष्ठी आहे अशा विपरीत कल्पनेने समाजाचे मन मारून व उदासीन होऊन गेले. इतिहासदृष्टीच्या अभावापासून समाजाचे केवढे घोर नुकसान होते त्याचे पाणिनीय सूत्रे नामांकित उदाहरण आहे.

किरीम [ कृमि = किरीम ] (भा. इ. १८३४)

किरु [किल चा अपभ्रंश (ज्ञा. अ. ९ पृ. ३० )

किलाटी [ किलाटिन् (वेळू) = किलाटी ] किलाटी म्ह० पेंच, पांचर.

किल्मिष [ कल्मषं = किलमिष ]

किल्ली [कालिका ] (कीली पहा)

किंवणा [ कृपणः = किंवणा ] (भा. इ. १८३४)

किशोरी [ कृशोदरी = किशोरी ( बाला ) ]

किसणी [ कृष् १ विलेखने. कृषणिः = किसणी ]

किसोरी [ कृशोदरी = किसोअरी = किसोरी ] पातळपोटी स्त्री. (भा. इ. १८३४)

किळस १ [क्रिश् ४ उपतापे-चिक्लिश = चिळस = किळस] ( धा. सा. श. )

-२ [ किलास = किलस (त्वग्रोग ) ] (भा. इ. १८३४)

किळसे, किळसणें [क्लिश् ४ उपतापे-क्लिश = किळस. क्लिश्यते = किळस्सए = किळसे ] (भा. इ. १८३३)

की १ - तो आला की; मी चाललों की; तू नाट वाचतोस की; असे प्रयोग की चे मराठींत हमेश होतात. रामदासाच्या वखरींत तर हा की शब्द फार आढळतो. पुणें प्रांतांत व देशावर हा की फार योजतात. कोंकणांत की चा प्रचार कमी. हा की संस्कृत किल चा अपभ्रंश आहे. किल = किर = की.

मराठीच्या पिढीजाद स्वभावाप्रमाणें ह्या की वर अनुनासिक विकल्पानें द्यावा. (सं.) स आगतः किल =(म) तो आला की.

-२ [क्रिया ]
सुतारकी = सुत्राकारक्रिया the business or occupation of a carpenter.
वाणकी = वाणिकक्रिया
लोहारकी = लोहकारक्रिया
माणुसकी = मनुष्यक्रिया

कीं [ किल चा अपभ्रंश ] (ज्ञा. अ. ९ पृ. ३० )

कीरु [ किल चा अपभ्रंश ] (ज्ञा. अ. ९ पृ. ३० )

कीली [ कीलिका = कीली, किल्ली ]
कीलिकां दत्वा (पूर्णभद्र पंचतंत्र प्रथमतंत्र, कथा ८ ) किल्ली देऊन.

कींव [ कृपा = कींवा = कींव ( भा. इ. १८३३)

कुई [ कुतिः = कुई. कु अस्पष्टे शब्दे ]
कोल्हेकुई = कोष्टकुतिः

२३ गेंगाण्यांच्या भाषेत फक्त वचनप्रत्यय असल्यामुळे व संप्रदान, अधिकरण, इत्यादी अर्थ दर्शविणारे विभक्तीप्रत्यय नसल्यामुळे, कोणत्याही शब्दाची एकवचन, द्विवचन व त्रिवचन अशी तीन रूपे असत. त्या रूपांनी ते कर्ता व कर्म यांचा निर्देश करीत. सबब कर्त्रर्थी जेव्हा या रूपांचा उपयोग होई तेव्हा या तीन रूपांना निरनुनासिक समाजाने आपल्या बोलीच्या धर्तीवर प्रथमा विभक्ती हे नाव ठेविले व कर्मार्थी जेव्हा या रूपांचा उपयोग होई तेव्हा या रूपांना द्वितीया हे नाव ठेविले, गेंगाण्यांना बाकीच्या विभक्त्या नव्हत्या, सबब, मूळ शब्दाला तृतीयादी विभक्त्यांचे आपले प्रत्यय निरनुनासिक समाजाने लावून आपल्या आठ विभक्त्याप्रमाणे गेंगाण्यांच्याही शब्दांच्या आठ विभक्त्या सजवून व्यवहार चालता केला. यद्यपि गेंगाण्यांची अशी हलाखी होती व किंचित् उपहासाचे ते विषय झालेले होते, तथापि गेंगाण्यांनी आपला गेंगाणा स्वभाव तृतीयादी विभक्त्यांच्या प्रत्ययावर थापण्याला कमी केले नाही.

(३) मधुँ + स्या = मधुँ + या + मधुँ + या = मधुँ + आ = (अनुनासिकाचा न्

होऊन) मधुना

या तऱ्हेने १) मधुना, २) मधुने, ३) मधुन:, ४) मधुन:, ५) मधुनि, ६) मधुनो: व ७) मधुनो:, ही सात गेंगाणी रूपे निरनुनासिकांच्या प्रत्ययांच्या नाकाडावर गेंगाण्यांनी कायमची चिकटविली व आपण जगतीतलावर कोणीतरी आहोत हे जगाला यावच्चंद्रदिवाकरौ जाहीर केले.

पुल्लिंगी व तदन्तर्गत स्त्रीलिंगी शब्दांच्या रूपांच्या रचनेहून नपुंसकलिंगी शब्दांच्या रूपांची रचना ही अशी अगदी निराळ्या पायावर झाली आहे. नपुंसकलिंगाचे म् व इ हे प्रत्यय एक व दोन या संख्या अनुक्रमे दाखवितात म्हणून सांगितले. या म् ला व इ ला एक व दोन हे अर्थ आले कोठून? म् हा प्रत्यय हम् (मी स्वत:) या शब्दाचा अपभ्रंश आहे व इ हा प्रत्यय त्वि (तू) या शब्दाचा अपभ्रंश आहे. रानटी आर्यांपैकी एक समाज एकही संख्या स्वत: जो हम् म्हणजे आपण त्याने दाखवी व दोन ही संख्या आपल्याहून निराळा जो त्वि त्याने दाखवी. म् व इ प्रत्ययांनी वचने दाखविणारा समाज कोंकण्याच्याप्रमाणे किंवा फ्रेंचांच्याप्रमाणे किंवा डोंगरी भिल्लांच्याप्रमाणे आपली सर्व बोली नाकांतून अनुनासिक बोले. या अनुनासिकप्रधान समाजाचा निरनुनासिक समाजाशी जेव्हा मिलाफ झाला तेव्हा नाकातून अनुनासिक उच्चार करणाऱ्या समाजाचे उच्चार पेद्रू ठरून त्यांच्या शब्दांची व प्रत्ययांची नेमणूक नपुंसकखात्यात झाली व केवळ पुल्लिंगी बोलणाऱ्या समाजाच्या बोलण्यात पुं व नपुं अशी द्विलिंगी भाषा येऊ लागली. संस्कृत पाणिनीय व वैदिक भाषेत नपुंसकलिंगाच्या प्रवेशाची ही अशी हकिकत आहे.

(३) वारि + म् + इ = (मूळ शब्दाची टि प्लुत ) वारि ३ + म् + इ =
(अनुनासिकामुळे म् लोप) वारि ३ + इ = (अनुनासिकाचा न् होऊन ) वारी
३ णि.
मिळून वारिँ १, वारिणी २ व वारी ३ णि अशी रूपे होत.
मधुँ १, मधुनी २, मधू ३ नि
कर्तृ १, कर्तृणी २, कर्तृ ३ णि.

अशी रूपे होत. आता अकारान्त नपुंसकलिंगी कमल शद्बाची साधनिका देतो :ह्न

(१) कमलँ + म् = कमलम्ँ = कमलम् १ (पाणिनीय)
* अन्त्य अ ऱ्हस्व ऊर्फ एकमात्राक

(२) कमलँ + इ = कमले २
* अन्त्य ए द्विमात्राक ऊर्फ दीर्घ

(३) कमलँ + म् + इ = ( मूळ शद्बांचा अंत्य स्वर प्लुत )
कमलँ ३ + म् + इ = (अनुनासिका स्तव म् लोप )
कमलाँ + इ = (अनुनासिकाचा न् ) कमला ३ नि
आता हलन्त नपुंसकलिंगी शब्द घेतो व त्याची साधनिका देतो:ह्न

(१) महँत् + म् = (म् लोप) मह १ त्
* ह तील अ ऱ्हस्व

(२) महँत् + इ = महती २ (द्विमात्राकात्वामुळे दीर्घ)

(३) महँत् + म् + इ = (मूळ शद्बाची टि प्लुत ) महाँ ३
त् + म् + इ = (म् लोप) महाँ ३ त् + इ= (अनुनासिकाचा न् होऊन ) महान्त्
+ इ = महान्ति
* हलन्त शब्दांच्या ऱ्हस्व किंवा दीर्घ टि त्या भाषेत नित्य अनुनासिक असत,
हे लक्षात ठेविले पाहिजे.

प्राच् शब्द :
(१) प्राँच् + म् = प्राँक् = प्राकृ (पाणिनीय)
(२) प्राँच् + इ = प्राँची २ (द्विमात्राक) = प्राची (पाणिनीय )
(३) प्राँच् + म् + इ = प्राँ ३ च् + म् + इ = प्राँ ३ च् + इ= (अनुनासिकाचा ञ
होऊन ) प्रा ३ ञ्चि = प्राञ्चि (पाणिनीय)

कमल् शब्द :
(१) कमँल् + म् = कम १ ल् (ल्मुळे अनुनासिक लोप )
(२) कमँल् + इ = कमली २ (द्विमात्राक)
(३) कमँल् + म् + इ = (ल्मुळे अनुनासिक लोप ) कम ३ ल् + म् + इ = (म्
लोप) कम ३ ल् + इ = कम ३ लि =कमलि (पाणिनीय)

ददत् शब्द :
(१) ददँत् + म् = ददत्
(२) ददँत् + इ = ददती
(३) ददँत् + म + इ = ददन्ति
ददँत् + म + इ = (अभ्यस्त शब्दांचा आदि उदात्त असता)
ददति (पहिल्या अ वर उदात्त येऊन अनुनासिकाचा लोप होतो)

तो प्रकार नपुंसकलिंगी शब्दांच्या बाबतीत झालेला दिसत नाही. उदाहरणार्थं, मनस् मनसी मनांसि या तीन रूपांच्या खोडांवर तृतीयादी विभक्त्यांच्या प्रत्ययांची कलमे केलेली आहेत की काय ते पहा. मनोभ्याम् हे द्विवचनी रूप मनसी + भ्याम् यापासून साधलेले नाही, मनस् + भ्याम् यापासून साधलेले आहे. मनोभ्य: हे अनेकवचनी रूप मनांसि + भ्यस यापासून साधलेले नाही, मनस् + भ्यस् यापासून साधिलेले आहे. तात्पर्य, मूळ शब्द च नपुंसकलिंगी तृतीयेपासूनच्या प्रत्ययाच्या पूर्वी अंग म्हणून संमिश्र वैदिकभाषेत धरिलेला आहे. प्रथमेचा व तृतीयादी विभक्तींचा काही एक संबंध नाही. हा असा विजोड का म्हणून उत्पन्न झाला? वचनवाल्यांची संख्यावाचक रूपे, त्यावर प्रत्ययांची कलमे करण्याला, योग्य नाहीत असे संमिश्र समाजाला आढळून आले. योग्य नसण्याचे कारण असे की ज्या कल्पनेने वचनवाल्यांनी आपली तीन रूपे रचिली ती कल्पना विभक्तीवाल्यांच्या प्रथमारचनेच्या कल्पनेहून स्वरूपत: भिन्न होती. विभक्तीवाले एकसंख्यादर्शक स् हा प्रत्यय एकवचन, द्विवचन व त्रिवचन दाखविण्याकरिता अनुक्रमे एकदा, दोनदा व तीनदा लावीत व प्रथमेची तीन रूपे सिद्ध करीत. केवळवचनवाल्यांचा मार्ग याहून भिन्न होता. त्यांनी आपली संख्यादर्शक वचने निराळया कल्पनेवर रचिली. त्यांच्यापाशी त्यांच्याही पूर्वीच्या भाषेतून वचनांचे तीन प्रत्यय आले होते. एकवचनाचा म् प्रत्यय व द्विवचनाचा इ प्रत्यय, म् चा अर्थ एक व इ चा अर्थ दोन. या पूर्वीच्या भाषेत संख्या मोजण्याची मजल एकेकाळी दोनपर्यंतच गेली होती. तीन ही संख्या म् + इ या दोन संख्यांच्या मिळवणीने ते दाखवीत. हे प्रत्यय शब्दाला लावून एकवचनाचा अन्त्य स्वर एकमात्राक ऊर्फ ऱ्हस्व, द्विवचनाचा अन्त्य स्वर द्विमात्राक ऊर्फ दीर्घ व त्रिवचनाच्या प्रत्यया पूर्वील मूळ शब्दाची टि त्रिमात्राक ऊर्फ प्लुत उच्चारीत. हा प्रकार ते कसा करीत त्याची साधनिका देतो. प्रथम उदाहरणार्थ अजन्त शब्द घेतो. नपुंसकलिंगी सर्व अजन्त शब्द त्या भाषेत नित्य, विकल्पाने नव्हे,
अनुनासिक असत. म्हणजे वारि, मधुँ, कर्तृ, असे सानुनासिक उच्चार ती भाषा बोलणारे लोक करीत. प्रथम वारि शब्दाच्या रूपांची साधनिका देतो :

(१) वारिँ + म् = वारिँ = (पाणिनीय) वारि किंवा वारि
* अन्त्य स्वर अनुनासिक असल्यामुळे म् चा लोप, पाणिनीय भाषेत अन्त्य अप्रगृह्य स्वर विकल्पाने अनुनासिक उच्चारीत, सबब दोन रूपे. वारिँतील इँ एकमात्राक ऊर्फ ऱ्हस्व उच्चारावयाची असे.

(२) वारि + इ = वारिँई = वारिणी
* इ द्विमात्राक उच्चारीत, सबब दीर्घ काढिली आहे.अनुनासिकाचा न् होई. र मुळे न् चा ण् झाला.

नपुंसक शब्द हलन्त किंवा अजन्त असतात. अजन्त नपुंसक शब्द सर्व ऱ्हस्वान्त असतात. प्रथमेची व द्वितीयेची रूपे सारखी असतात आणि तृतीयेपासूनची पुढली सर्व रूपे पुल्लिंगी शब्दांच्याप्रमाणे असतात. कोठेही स्त्रीलिंगी शब्दांच्याप्रमाणे नसतात. तृतीयेपासून पुढे नपुंसकलिंगी शब्दांना ज्या अर्थी पुल्लिंगी प्रत्यय लागतात त्याअर्थी पुल्लिंगी शब्द व नपुंसकलिंगी शब्द यांच्यात तृतीयाविभक्तीपासून पुढे काहीच अंतर नाही हे उघड झाले, पुल्लिंगी शब्द व नपुंसकलिंगी शब्द यांच्यात अंतर काय ते प्रथमा व द्वितीया या दोन विभक्त्यांच्या रूपात आहे. आता नपुंसकलिंगाची प्रथमेची व द्वितीयेची रूपे ज्या अर्थी एकच आहेत, त्या अर्थी नपुंसकलिंगी शब्दांना एकच विभक्ती आहे, असे विधान करणे ओघास येते आणि ज्या शब्दांना मुळी एकच विभक्ती आहे त्यांना विभक्ती मुद्दलांतच नाही म्हटले तरी चालेल. मनस्, मनसी, मनासी अशी जी तीन रूपे मनस् शब्दाची होतात ती कर्ता, कर्म, अधिकरण, संप्रदान, वगैरे संबंध दाखवीत नाहीत, ती फक्त एक दोन व तीन या संख्या दाखवितात किंवा दाखवीत असे भूतकालीन क्रियापद योजिणे जास्त प्रशस्त. कारण, सध्या आपण ज्या प्रत्ययासंबंधाने विवेचन करण्याचा यत्न करणार आहो ते प्रत्यय ज्या पूर्ववैदिकभाषेत होते ती भाषा पूर्ववैदिकभाषा पैकी अत्यंत जुनाटातली जुनाट होती. त्या जुनाटातल्या जुनाट भाषेत फक्त वचनप्रत्यय होते, विभक्तीप्रत्यय नव्हते. अशा त्या जुनाटभाषा बोलणाऱ्या समाजाचा विभक्तीप्रत्यय ज्याच्या भाषेत निर्माण झाले होते अशा पूर्ववैदिक समाजाशी मिलाफ झाला. हा विभक्तीप्रत्यय योजिणारा समाज फक्त पुल्लिंगी बोले आणि विभक्तीप्रत्यय न योजिणारा समाज फक्त नपुसकलिंगी बोले. याचा अर्थ असा की या दोन्ही समाजात अद्याप लिंगभेद दाखविण्याकइतकी प्रगती झाली नव्हती. आपल्या अर्वाचीन पाणिनीय व वैदिक भाषेच्या दृष्टीने एक समाज पुल्लिंगी बोले व दुसरा समाज नपुंसकलिंगी बोले असे आपण म्हणतो, याचे कारण एवढेच की एका समाजाच्या शद्बरूपांना वेदकालीन वैय्याकरणांनी पुल्लिंगी रूपे म्हटले व दुसऱ्या समाजाच्या शब्दरूपांना नपुंसकलिंगी म्हटले. एका अत्यंत प्राचीन चमत्काराचे अर्वाचीन भाषेने आपण नामकरण करतो या पलीकडे या बोलण्यात जास्त मतलब नाही, असो. फक्त वचनप्रत्यय ज्यांच्या भाषेत निर्माण झाले त्यांची गाठ वचनप्रत्ययी शिवाय आणिक विभक्तीप्रत्यय ज्यांच्या भाषेत निर्माण झाले, परंतु लिंगभेद ज्यांच्या भाषेत अद्याप निर्माण झाला नव्हता, अशा समाजाशी पडून, संमिश्र भाषा निर्माण झाली, या संमिश्र भाषेत दोन प्रकारचे वचनांचे प्रत्यय ज्यांना लागतात असे दोन प्रकारचे शब्द मिसळले आणि ही मिसळ होत असताना पुल्लिंगी शब्द व नपुंसकलिंगी शब्द असा भेद शब्दप्रांतांत शब्दांचा विचार करणाऱ्यांना दिसू लागला. अत्यंत जुनाटांतल्या जुनाट समाजात भाषेचा व शब्दांचा विचार करणारे लोक होते असे जे विधान वरील वाक्यात केले आहे त्या संबंधाने आचंबा वाटण्याचे कारण नाही. आपण जे शब्द बोलतो त्या शब्दांचा विचार करण्याची सवय अत्यंत रानटी मनुष्यातही आढळून येते आणि शब्दांवरती कोट्या लढविलेल्या आढळात येतात. विभक्तीवाले व केवळ वचनवाले असे जे दोन समाज एकवटले त्या एकाभूत समाजात वचनवाल्याच्या मनस्, मनसी व मनांसी या तीन रूपांना विभक्तीवाल्यांनी प्रथमा हे नाव दिले आणि नंतर मनस् हा शब्द आपल्या धर्तीने चालवून त्याच्या आठी विभक्त्या साधून घेतल्या. एका गोधडीचे ठिगळ दुसऱ्या गोधडीला लाविले. विभक्तीवाल्यांच्या शब्दरूपांचे २१ कलमापर्यंत जे पृथक्कारण केले त्यावरून असे दिसून आले की, प्रथमेच्या एकवचन, द्विवचन व त्रिवचन यांच्यावर बाकीच्या विभक्त्यांच्या प्रत्ययांची कलमे केलेली आहेत.