Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

कडबू [करंभः = कडंबो = कडवू] पक्वान्नविशेष.

कडबोळें [कटकवलयं= कडअबळअँ=कडबोळें. अ=ओ] हातांतील कड्याच्या वळ्यासारखा खाद्य पदार्थ.

कंडरा [ कंधरा = कंडरा (गळ्याचा दोर) ] कंघरा = कंडरा ( मान ) (भा. इ. १८३६)

कडवट [कद्+ वद् १ व्यक्तायां वाचि. कद्वद: = कडवट] तो मुलगा कडवट आहे म्ह० कुत्सितभाषाक आहे. (धा.सा.श.)

कडा [ कटक = कडअ = कडा ( डोंगराचा ) ] (भा. इ. १८३३)

कडाड [ कर्दट = कडाड] वीज कडाडली (कडकड पहा)

कडाका [ कटाक्ष शब्दाचें प्राकृत कडक्ख, त्याचें मराठी कडाखा, कडाका ] ज्या लावणींत किंवा पद्यांत कोणत्याही विषयावर विशेष कटाक्षानें बोलणें असतें त्या लावणीला कडाख्याची लावणी म्हणतात. (स. मं. )

कडियाळ [ कटकालयं = कडियाळ, कड्याळ (कडें ) ornament ]

कडी १ [काष्टिका = काडी = कडी ]

-२ [ कटि: = कडी, कड] (शा. अ. ९ पृ. ६४)

कडीपाट [ काष्टिकापट्ट: ]

कडे [ कक्ष = कड = कडे (चतुर्थी, सप्तमी) कडून, कडचा, कडां] (ग्रंथमाला)

कडें [ कडकं ( वर्तुल ) = कडअँ = कडँ = कडें ( सोन्यारुप्याचें वगैरे )] (भा.इ. १८३३)

कडेपोट [ कटिप्रोथ = कडेपोट ]

कडेवर [ कटिः ककुद्मतीं श्रोणी नितंबश्च कटीरकं ॥ राजनिघंटुः ॥ कटीरक = कटीकर (वर्णविपर्यास) = कडीअर = कडीवर, कडेवर. कटीरके गृह् = कडेवरी घे, कडेवर घे. येथें कडेवर ही सप्तमी आहे ] कडेवर घेणें म्हणजे नितंबावर घेणें. (भा. इ. १८३७)

कडेसर, कडोसर [ कटिशीर्षक (hollow above the hips or loins वैजयंती कोश) = कडेसर ] कडेस्त्रीला सुपारी खोवणें.

कडोस्त्री [ कटिवस्त्र ] कडोस्त्रीस पैसा = कटिवस्त्रे द्रव्यं.

कड्याळ [ कटकालयं ] (कडियाळ पहा)

कढकढीत [ क्वथ् १ निष्पाके (द्विरुक्त) ] (धातुकोश कढकढ पहा)

कढी [ क्वथिका = काढआ = कढी ]

कणकण [ कण् शब्दे ] (ग्रंथमाला)

प्रसंन जाला जाणोस शंकर ।। मग आला तो सुरेश्वर ।। तो च दिवस पवित्र ।। रुतु दीधला स्त्रियेसीं ॥ ४१ ।। ते राहिली गरोदरा ।। कंन्यारत्न आलें उदरा ।। पुढिल कथा दातारा ।। आईक आंता ।। ४२ ।। मग नवमास भरले ऐसिया परी ।। तंव ते जन्मलि कुमरी ॥ जाणो विद्युल्लता दुसरी ।। लावण्यस्वरुपें ।। ४३ ।। ऐसि ते सकुमारी ।। उपवर जालि इंद्रकुमरी ॥ मग गुरु पाचारोन विचारी ॥ वर तियेसी ।। ४४ ।। तवं बोलिला बृहस्पती ॥ स्वयंवर मांडावें सुरपती ।। ते ज्याचे असेल लिखितीं तो वरिल तियेतें ॥ ४५ ॥ मग इंद्रे मांडिलें स्वयंवर ॥ सुरवर नर मिळाले अपार ।। तेथे जाई तुं सत्वर ।। ब्रह्मदेव सांगितलें ।। ४६ ॥ जे तुजसी वरिल ।। ऐसें आहे अक्षर ।। ह्मणोन जाई वेगवगत्र ।। सूर्य सुता ॥ ४७ ॥ तो जाणोनियां समारंभ ।। स्वयंवरि मिळाले सुल्लभ ॥ तेथे आला प्रभु ।। अर्क नंदन तो ।। ४८ ॥ तवं श्रृंगारिली ते नोवरी ॥ रत्नखचित बासिंगे शिरी ।। खोपा भरिला नानापरी । पारिजातककुसुमीं ।। ४९ ॥ कर्णि कनकपत्रें नागोदरें ॥ पालव फुलें पन्नगकशरें ।। शेषकुळें मनोहरें ॥ पवित्र तीं ॥ ५० ।। बरवा भांग मिरवे सिंदुरी ।। कंचुकि कसिली मुक्ताफळी ।। तेज फांकताहे अंबरी ॥ लावण्यतेचें ।। ५१ ॥ कपाळिं अर्धचंद्र टिळक ॥ तांबोल मिरवताहे मुखा ।। कंठि माळा सुरेखा ।। दिव्य रलाचिया ।। ५२ ।। बरवा नेसलिसे पीतांबर ।। चरणि नेपुराचा गजर ।। करि मुद्रिका तेज थोर ।। फांकताहे ।। ५३ ।। ऐसि ती लावण्याचि खाणी ।। त्या तपाचि घडणी ।। मग आणिली श्रृंगारोनी ।। सभे माजी ।। ५४ ।। मग ते बैसविली हस्तिणी ।। जाणो दुजा दिन उगवला गगनी ॥ ते देखता जाला नयनीं ।। चंद्रराजा ।। ५५ ।। तवं तो धाविन्नला झडकरी । आणि हरिली ते नोवरी ॥ हाहाकार जाला सुरवरीं ।। धाविंन्नले समस्त ।। ५६ ॥ येरें धनुष्य संजोगिलें ।। सहश्र बाण गुणि लाविले ।। संग्राम करों आदरिलें ।। चंद्र सेने ।। ५७ ॥ सुरवर शस्त्रें वर्षती ।। जैसा प्रजन्य पडे क्षिती ।। यरु निवारि शस्त्रशक्ती ।। चंद्रशेन ।। ५८ ।। तवं धाविंनला वज्रपाणी ॥ चंद्रसेन वज्रें हाणितला निर्वाणी ॥ तवं येरे पीटिलें बाणी ॥ शस्त्राशस्त्र ॥ ५९ ॥ तरि अपो हे संग्रामिची कथा ॥ तेणे जिंतिलें सुरवरां समस्तां ॥ जो येक द वि सत्ता ॥ सर्वा ठायीं ।। ६० ।। जो त्रैलोक्य जाळों सके अर्क ।। त्याचा. तो बाळक ।। तया जिंकु न सक त्रिंबकु ।। महा-विरातें ॥ ६१ ॥ मग तयें महाविरी ।। बळें आणिली इंद्रकुमरी ॥ हरुष जाला अंतरी ।। चंद्रशेनासीं ॥६२॥ असो भरला येक संवत्सर ।। तवं सुमध जाला पुत्र ॥ तवं बृहस्पतिने जाणविला विचारु ॥ सोहिरीकिचा ।।६३।। इंद्र आणि सविता ।। हे बंधु गा अर्कसुता ।। परी न टळे पुर्वलीखिता ।। ह्मणोन ऐसें जालें ॥ ६४ ॥ मग तें करावया पुर्णापूर्ण ॥ पंढरि आला आपण ॥ तवं-तया क्षेत्रा अष्टवदन ॥ खेळिजे देखा ॥ ६५ ॥ मग तें धरोनि रूप तापस ॥ हृदइं ध्यातसे रुषिकेश ।। ऐसे भरले बहु दिवस ।। तपबळें ।। ६६ ।। मग तेथे करोनियां विवर ॥ गोरांगणिने जाळिले शरिर ।। तयासि ब्रह्म अगोचर ॥ लाधलें देखा ।।६७॥ मग तें कुंडाचे स्थान ।। तेथे जळ जालें पूर्ण ॥ तवं धाविनला शेषशयन ।। श्रीहरि तो ॥ ६८ ॥ तो उचलांनि भक्त ।। निजस्थानि नेत अनंत ।। तया दिधली अपरोक्ष मुक्ती ।। अगोचर जे ॥६९।। मग तया चंद्रविराचा स्थानी ।। पुंडलिक भक्त, असे निर्वाणी ।। गंगचे गा निजस्थानी ।। जालि चंद्रभागा ।। ७० ॥ ते चंद्रशनाचें क्षेत्र ।। ह्मणोन चंद्रभागा सरोवर ।। तें कथिताहे वशिष्ट रुषेश्वर ॥ सूर्यवंशातें ।। ७१ ॥ जें बोलिला वशिष्ट मुनी ॥ तें आइकावें श्रोतेजनी ॥ जें सूर्यवंशा लागेानी ॥ सांगितलें तेणे ।। ७२ ॥ तो रुषि राजगुरु ।। परोपकारी बोलिला रुषेश्वरु ।। जाणोनि क्षेत्रवंश पवित्र ।। केलें कथन ।। ७३ ॥ तो वशिष्ट महामुनी ॥ आणि संस्कृत बोलिला वचनी ।। तें ऐकावें प्राकृत वाणी ।। वंशविस्तार हा ।।७४॥ मग तया चंद्रशेनाचा पुत्र ।। राज्य करि महाविर । । तया जाले तिघे पुत्र ।। महाबळिये ते ।। ७५ ॥ शंभु रघु ताम्र ध्वज ॥ हे तिघे सहोदर ।। त्यां पासोन परंपरा ।। वाढलि क्षिती ।। ७६ ।। त्रिवेधु १ सुसंवेधु २ त्रिशंकवेधु ३ ऐसे क्षेत्रि महाविर ।। राज्य करिती नृपवर ॥ तवं जन्मला सावा अवतार ।। परशराम ॥ ७७ ॥ तेण्हे वधिले समस्त क्षेत्री ।। एक भाग राहिला रुषेश्वरी ।। परशरामाचे निकरी ॥ व शिष्टे तेणे ।। ७८ ऐसे वीस वेळे राखिले ।। येकवीस वेळां पाळावे ।। तवं विश्वामित्रें सांगितलें ॥ रेणुकानंदनासी ॥ ७९ ॥ तेणें निर्वाण केलें ।। सर्व क्षेत्रि मारिले ।। राखिले होते ते हि वधिले ।। परशरामे ।। ८० ॥ जाला जाणेनि नीर्वेश ।। दुःखे विरोधला दिवस ॥ तेण्हे अंधकारें होउं पाहे नास ।। चराचराचा ॥ ८१ ॥ सूर्य विरोधला थोर ॥ मग पडंला अंधकार । अर्का विण न चाले वेव्हार ।। महीमंडळी ।।८२॥ असो पडिला अंधकार ।। अर्के सांडिला वेव्हार ।। ऐसा भरला येक संवत्सर ।। आदित्याविण ।। ८३ ।। अर्का विण बहु आटले जीव ।। हाहाकार जाला प्रबळ ।। मग मिळाले तिन्ही देव ।।

श्रीगणेशाय नमः ।। श्रीसवितासूर्यवंश तथा श्रीसोमवंशोत्पति श्रचिंतामणी कौस्तुभपुराणे व्याख्यास्याम ॥ ॥

ॐ नमोजी श्रीचिंतामणी ॥ सद्भाव माझा तुझिया चरणी ।। तुं सर्व सिद्धिची खाणी ।। ह्मणोन अन्योन्य नमन माझें ॥ १ ।। जो सर्वश्वें ईश ॥ नमिला तो आद्यपुरुष ।। कृपापणे उदास ।। तो गणाधिश वंदिला म्या ।। २ ।। विश्वासें आरंभितों ग्रंथ ।। पूर्ण करिता गौरिनाथ ।। जेण्हे पुंण्य आणि पुरुषार्थ ।। ते कथा मुक्तार्थ वदविं देवा ।। ३ ।। विमळोत्तरि तुष्टला गणपती ।। धर्मसंस्थाप्यता ज्ञानमूर्तीं ॥ अभयोत्तर दात्रव्यता भक्तां प्रती । निवेदी स्वयें इश ।। ४ ।। तें चि लाधले महि मान ।। ह्मणोनि शारदेसिं अन्योन्यशरण ।। आदिमाता निधान ।। जोडलें मज प्रती ।।५।। ते अंबिका आदिशक्ती ।। कृपेपणे तुष्टलि सरश्वती ।। वाग्विलास शब्दार्थी ।। अर्पिति जाली ।। ६ ।। म्हणोनि शब्द उन्मळला ।। आधार श्रीगुरुचा लाधला ।। शब्दार्थ पसरला ।। सिंधु जैसा ॥ ७ ।। श्रोते जनी जनार्दन ।। वंदु आदरें करून ।। पुढिल कथा निरोपण ।। आईका भावें ।। ८ ।। जे पुराण संमात कथा ।। स्वयें व्यासरुषिं वक्ता ।। सविता–सूर्यसोमवंशउत्पनता ।। कथिली जि हें ॥ ९ ॥ ऐकतां निवति श्रवण ।। हरति दोष दारुण ।। पितरां संतोष एकोन ॥ तें निवेदन करितों आतां १० ॥ ह्मणोन पुढति विज्ञापना ।। हे कथा वंशसंज्ञा ॥ भगवान् नंददत्त अनुज्ञा प्रादात वाणी ।। ११ ।। कोण्हे येके सुदिनी ।। शंभु उपविष्ट सिंहासनी ।। अर्वांगि गौरि कमळलोचनां ।। विलासंयुक्त ।।१२।। पृछा आदरिली महेशा ।। देवा तुं सर्वज्ञ कैलाशा ॥ अपेक्षा पुरवि आदिपुरुषा ।। वंशउत्पती सांगावी ॥ १३ ॥ कवणा पासुन कवण ॥ कैसे जाले वंज्ञोत्पन ।। स्वामी सांगावें मुळ-कथन ॥ कृपापणे ॥ १४ ॥ महादेव उवाच ।। गीरिज हा संकल्प तुजसि उठावया कारण ।। तें कळलें अनुसंधान ।। युगायुगि राहेल ह्मणोन ॥ तुजसि आदर जाला ।। १५ ॥ तरि आतां चित्त स्थिर करी ॥ उत्पती सांगतों सविस्तरी ।। जेणे संतोष सर्वातें अवधारी ।। तें प्रत्योत्तरि वदतों आतां ॥ १३ ।। प्रथम व्योमासनि अव्यक्तमूर्ति ।। जो अनादि प्रभु लक्ष्मीपती ।। तया पासोन प्रजापती ।। ब्रह्मदेवो ।। १७ ।। ब्रह्मयः पासोन मरंचि अंगिरा ।। उत्पती जालि रुषेश्वरा ।। काश्यप जन्मला अवधारा ।। अवतार चराचरी ।। १८ ।। काश्यप नभाचा अवतार ॥ तयासि अर्क जाला पुत्र ।। तो योमाचा अवतार ।। मार्तंड हा ॥ १९ ॥ तें निजब्रह्म योमासनी ॥ तयाचें तेज हा तरणी ।। तया दिधली नंदिनी ॥ योगमाता ।। २० ।। तियेचे नाम पुरवंती ।। ते वारेंली गभस्ती ॥ लक्षकोटि योगशक्ती ।। आकारलिं ते ।। २१ ।। तयां दोघाचा निजशक्ती ॥ चंद्रप्रभु पुत्र जाला तयां प्रती ।। जाणो अवतरला दुजा क्षिती ।। मार्तड हा ।। २२ ॥ तो जाणोनियां पुत्र ।। महाक्षेत्रि पवित्र ॥ मग मार्तडें दीधला राजभार ॥ मृत्यलोकिचा ।। २३ ।। ऐसा तो महावीर ।। महा-क्षेत्रि धनुर्धर ।। त्या पासोनि वंश-विस्तार ।। जाला पुढा ।। २४ ॥ तो क्षेत्रिवंशि मुळावसानी ।। कैसा विस्तारला तरणी ।। ते कथा शुळपाणी ।। सांगे गीरिजे प्रती ॥२५॥ इति श्रीचिंतामणि-कौस्तुभपुराणे इश्वरपार्वति–संवादे वंशविवंचना-नाम प्रथमो ध्यायः ॥ १ ॥

श्रीगणेशायनमः ।। जो चंद्रप्रभु राजेश्वर ।। सूर्यतेजे क्षेत्रि अंगार ।। समरंगणि धनुर्धर ।। पुरों न सके ॥ २६ ॥ तेणे प्रणिली इंद्रनंदिनी ।। बळें आणिली ईंद्र जिंतानी । तो अजित त्रिभुवनी ।। चंद्रराजा ।। २७ ।। तया राज्य करितां गभस्तिसुता ।। ब्रह्मा भेटला अवचित्ता ।। पुढिल कथा विचारिता । जाला रावो ।। २८ ।। विनति आइके चतुरानना ।। तुं घटिताचि जाणसि विवंचना ।। मज कांता कवण ते कमळलोचना ।। सांगिजे स्वामी ॥ २९ ॥ तवं तो बोलिला ब्रह्म मुनी ।। सुरेश्वरें आराधलासे शूळपाणी ।। ते कथा आईके श्रवणी ॥ सांगता आतां ।। ३० ।। कोण्हे एके दिनी ।। ईंद्र पहुडला शयनी ।। सेवा करि इंद्रायणी ।। विलासयुक्त ।। ३१।। ते वेळि ईंद्रायणी ॥ कामातुर होति कामिनी ॥ इंद्र विनविला मंजुळवचनी ।। पृछा आदरिली ।। ३२ ।। हे इंद्रराया मुगुटमणी ।। तुं ततिस कोटिचा अग्रगणी ॥ तरि मज देई गा नंदनी ॥ महासुंदर ॥ ३३ ॥ जे करिल अष्टनायकांचें गर्वहरण ।। ऐसें रचावें कंन्यारत्न ।। जे मोहिल त्रिभुवन ।। ते दीधलि पाहिजे ॥ ३४॥ ऐसि रचि गा मुद्रा ।। जें भुलवों सक हरिहरा ।। महा सकुमार सुंदरा ।। तेजरुपें ।। ३५ ।। मग इंद्र म्हणे सत्य होईल तुझें वचन ॥ मग निघाला सहस्त्रलोचन ।। पावला कैसा स्वभुवन ।। समस्त देवां सहित ।। ३६ ॥ तेथं बैसुनियां ध्यानी ॥ हृदई चिंतिला पिनाकपाणी ।। ऐसें तप करोनी ॥ ईंद्रदेवें ॥ ३७ ।। तवं तो आला विश्वनाथ ॥ भक्तकृपाळ करुणावंत ।। तो देखोनियां सुरनाथ ।। संतोषला मनी ॥ ३८ ॥ मग ह्मणे माग जालों प्रसंन्न ।। तुवां येवढें कां मांडिलें निर्वाण ॥ इंद्र बोलिला सत्यवचन ॥ शंभु प्रती ॥ ३९ ॥ मज दइं गा कुमरी ॥ जाणो सौभाग्ये जैसि गौरी ॥ त एकोन म्हणे त्रिपुरारी ।। तथास्तु ।। ४० ।।

कंठणें, कठणें [कठ् कृच्छ्रजीवने । कठन = कठणें, कंठणें] (भा. इ. १८३३)

कंठनाळ [ कंठनाल = कंठनाळ ] (स. मं. )

कंठाळ १ [ कंथालि: ]

-२ [ कंठतलासिका = कंठअल = कंठाळ. असिका हें पद गळालें ] (भा. इ. १८३३)

कड [ कटि = कड] (स. मं.)

कंड १ [कड् मदे. कंड: = कंड ]

-२ [ कडि मदे = कंडा = कंड ] कंड सुटणें म्ह० माद चढणें.

-३ [कंडूय्]

-४ [ कंडू = कंड ] (भा. इ. १८३४)

कडक १ [कर्कर ( hard ) = कडक ( र लोप ) ] ( भा. इ. १८३६ )

- २ [कड्डक = कडक. कड्ड् कार्कश्ये । कडक म्ह० कर्कश. तो कडक मनुष्य आहे म्ह० कर्कश माणूस आहे.

कडकड [ कर्द् १ कुत्सिते शब्दे. प्रकर्द = पकपक आवाज करणें. द्विरुक्ति = कडकड. वीज कडकडली. कर्दट = कडाड. वीज कडाडली ]

कडकडित १ [ कड् to saperate, tear = काढणें ] चिरटोळा काढणें to tear a leaf.

-२ [क्कथ् = कडकडित पाणी boiling water ]

-३ (कड्ड् to be rough कडकडित पापड rough पापड ]

-४ (कड् to be elated and intoxicated = कडकडून भेटणें. to warmly receive ].

कडकडीत [ कड् १ मदे, वैक्लव्ये (द्वित्त) ] (धातुकोश-कडकड ३ पहा)

कडकडून [ कड्] (कडकडित ४ पहा)

कडकन् [ कड् १० भेदने ] (धातुकोश-कडक ३ पहा)

कडंगर [ (सं.) कडंकर किंवा कडंगर (पेंढा वगैरे) ] (भा. इ. १८३३)

कडगुलं [ कटक + (स्वार्थक) ल = कडगुल ] कडगुल म्ह० लहानसें कडें.

कडदर-कडदोर-कडदोरा [कटित्र= कडतर = कडदरदोर-दोरा ] कटित्र म्हणजे कटीचें रक्षण करणारी वस्तु. (भा. इ. १८३४)

कडदोरा [ कटित्रं = कडितर = कडदर = कडदोरा]

कडधान्य [ कृष्टधान्यं ]

हुताशनि जवंळ ह्मणोनी खाने आज्ञा सर्वां प्रत दीधलि ।। मोहोर निवाडा करावा ।। अत्र ठेवोन आज्ञा दिधली ।। त्या उपरांत कथा वर्तलि सही ॥ छ ।। याउपर कथा वर्तलि ते बोलिली ।। संवत् १४५९ तेधवां निवाडा केला ।। सोमवंशि सूर्यवंशि शेषवंशि आणि ब्राह्मण मिळोन बाहादुरस्या जवळ जमा सर्व जाला ।। अर्ज बाहादुराप्रत केला ॥ जर छत्र निशाण सोमवंशासि व सूर्यवंशासि युक्त ।। हुताशनी खेळतील ।। तेधवां केशव राउत बोलता जाला ।। जर आह्मि शेषवंशि उपनावं सिंधे तर छत्र निशाण सर्वां मोहोरे ।। आह्मि आपला समुदायें छत्र निशाण आमचें चालेल ।। तेधवां सीवाजि चुरि बोलता जाला जर आह्मि सोमवंशि प्रथम निशाण आमचें ।। खान आईकोन अजेब करि ।। खतें महझर पाहातां निवाडा प्रथम सोमवंश सूर्यवंशाचि छत्रि नीशाण ।। तेधवां सिंध्यासि खान बोलिला जर तुह्मा जवंळ खत अथवा मझर असेल तर दाखवावा ।। तेधवां केशव राउत बोलता जाला ॥ जर खत राया बिंबाचे स्वहस्ताक्षरि स्वसिक्यासिं आहे तें साष्टि येरंगळा राहिलें ॥ तेधवां हरठाकुरं बोलता जाला ।। खत आलजी नाखवा हस्तिचें मजंवळ आहे।। जर प्रथम निशाणं सर्वां मोहोरे शेशवंशाचे ।। युद्धी हुताशनी आमचें निशाण।। तें खत वाचोनि पाहातां निवाडा शेषवंशाचे निशाण मोहारे सीका आल नाखवा नवाईत माहिमचा राजा, सीका केळवी, सीका महिकावतां, प्रगाणसीका सीरगावं, लकसीसी आ+र ॥ ऐसा निवाडा पाहाता निशाण सिंधे शेशवंशि मोहोरे चालतिल ॥ ते वेळे खाने ठाकुरासी वीडा दीधला ।। खजिना हवाले केला ।। तो आपले ताबिन ठेविला ।। त्यासी केशवराउता जवळ पांचवा मान देवविला ।। आणिक अफदागीर ठाकुरासिं पद जालें ॥ ठाकुर नावाजिला ॥ तैसा सर्वाहिं शेषवंशियांहि नावाजिला ।। टीळे जाले ।। विडे खाने सर्वांसि दीधले ।। ईनसाफ निवाडिला ।। सर्वांस आज्ञा दीधली ॥ त्या उपरांत कथा वर्तली सही ॥ छ ॥

श्रीगणेशाय नमः ।। सवंत ११२५ राज बिंब आहिनळवाडिया होवोन येथे माहिम ।। राजगोत्र भारद्वाज कुळस्वामीण प्रभावती ।। १ ॥ या उपर सोमवंशि खुमे २७ त्याचि गोत्रें कुळदेवता व ठीकाणे तेथे आणि येथे ॥ प्रथम प्रगाणे साशष्टि तपें मरोळ ॥ तेथे मुख्य माहादेव देशला ॥ त्याचा बंधुं कृष्णजी पद ठाकुर ठीकाण पैठण ॥ १।। प्रगाणे मालाड-खापणेया ठाकुरा खाली ।। हे आद-टिळयाविड्याचे आधिकारि ॥ यांचे गोत्र पद्माक्ष कुळदेवता जोगेश्वरी ।। २ ।। आणि कृष्णाजी चोधरि पद चौघला वतन खुद पैठण ।। येथे पोईसर ठीकाण ।। गोत्र भद्राक्ष कुळदेवता वज्राये ।। ३ ।। आणि दामराव पद महंत वतन पैठण ।। येथे ठींकाण परजापुर ॥ येथे आलियावर निका मलिकाचे वेळे पद पालटलें ॥ चौघलें पद निका मलिकें दीधलें।। त्याचे गोत्र क्षवण कुळदेवता।। पद्यावतीं ।।४।। आणि अनंत कडु चौघला।। पुर्वा पासोन वतन चांपानेर ।। येथे ठीकाण आंकुलवली ।। ईनाम बिंबदेवा हात्तिचें ॥ ५ ॥ आणि नामराज साहाणि आदखानी पद चौघला ।। वतन अमदाबाज ।। येथे ठिकाण कोंदिवटे ।। गोत्र वैरक्ष कुळस्वामिण चपादेवी ॥ ६ ॥ आणि केशवराव ॥ दोंहों मानाचा आधिकारि ।। चौबला आद्यवंत राया समागमि आला ।। वतन चांपानेर ।।
येथे ईनाम नसरापुर ठिकाण ।। गोत्र गौतम कुळदेवता येकविरा ॥ ७ ॥ आणि दाम महंत ।। पद चौघला वतन चांपानेर ।। येथे ठिकाण येकसार ।। गोत्र श्रीपत कुळदेवता चंडिका ।। ८ ।। व नामाधिप ।। पद चौघला वतन चांपानेर ।। येथे ठिकाण कालिणे ।। गोत्र वशिष्ट कुळदेवता हिरबाय ।। ९ ।। आणि नाम राउत ।। पद घरथ दाढिमे वतन चांपानेर। येथे ठिकाण फोंजिवरे ॥ गोत्र वछ कुळदेवता काळिका ।। १० ।। आणि कृष्णाजि रक्ती ।। वतन देव्हेरी ।। येथे ठिकाण वांदरे रांजणफर ।। गोत्र कौंडण्य कुळदेवता कुमारिका ॥ ११ ॥ व नाम राउत दाढिमे ।। वतन चांपानेर ॥ येथे ठिकाण फोंजिवरे ।। गोत्र बकदालभ्य कुळदेवता काळिका ॥ १२ ॥ आणि त्रिंबक रुत ।। वतन अव्हेलि ।। येथे ठिकाण फोंजिवरे ।। गोत्र वछ कुळदेवता नारायणी ।। १३ ।। आणि दाद पुरो ।। वतन चांपानेर ।। येथे ठिकाण मुहिली ॥ गोत्र हरिंद्र कुळ देवता माहालाये ।। पद वरातदार ॥ १४ ॥ आणि नामराज उपनावं चुरी ।। वतन चांपानेर ॥ येथे ठिकाण मुहिली ।। गोत्र त्रिंबक कुळदेवता हरडाये ।। १५ ।। आणि दामुल सिंग ।। वतन पैठण ।। येथ ईळें पाडळें ।। पद म्हातार ।। गोत्र विश्वामित्र कुळदवता ललिता ॥ १६ ।। आणि दाम सवे ।। वतन पैठण ।। येथे ठिकाण मुहिली ॥ पद चौघल ।। गोत्र अंगिरा कुळदेवता वज्राये ।। १७ ।। आणि दाम सीळ ॥ वतन पैठण ।। यथे ठिकाण मुहिली ।। पद म्हातारे ।। गोत्र अंगिरा कुळदेवता माहेश्वरी ॥ १८ ॥ आणि जीवाजी श्रीत ।। पद. म्हातारे ।। वतन चांपानेर ।। येथे ठिकाण साही ॥ गोत्र श्रीचंद्र कुळदेवता चंदनदेवी ॥ १९ ॥ आणि दाम महंत ।। वतन चांपानेर।। येथे ठिकाण तुंगवें ।। पद ह्मांतारा।। गोत्र त्रिंबक कुळदेवता काळिका ॥ २० ॥ आणि चंद्र राउत ॥ वतन पैठण ।। येथे ठिकाण वांदरे रांजणफर ।। गोत्र जनार्दन कुळदेवता रक्तदंतिका ॥ २१ ।। आणि हैबतराव चे-हणेर ।। वतन चेरूण्हं ॥ येथे ठिकाण वानरें ।। गात्र भारद्वाज कुळस्वामिण माहेश्वरी ।। २२ आणि जानकोजि राउत ।। वतन निळापुर ।। येथे ठिकाण नाळें ।। गोत्र भृगु कुळदेवता त्वरिता ।। २३ ।। आणि नाम चाधरि ॥ वतन पैठण ॥ येथे ठिकाण कांधवळी ।। गोत्र मित्राक्ष कुळदेवता चंद्रायेणी ॥२४॥ आणि जातलोमक प्रतिलोमक ।। ते कोण कोण ॥ कवळी १ दरणा २ भोईर ३ पटयार ४ माळी ५ घरठी ६ भटयारी ७ सांखळे ८ उभार ९ नाईते १० गाण ११ विसे १२ ।। ही बारा खुमे ।। यांस हि आधार सोमवंशाचा ।। विभीचारि ह्मणोन मान्या वेगळे ।। आणिक तांडेल आणि वहिती ये ही मान्या वेगळे ।। जातिसमुदाई चालति ।। नीमित्य देसकें घेतले ह्मणोन ॥ सासष्टित चालती ।। ईतरकडे अमान्यता ।। सही ।। छ ।।

।। जर चतुर केशव राउत व तयाचा गुरु चतुर ।। जर नितिन अकलेन ईसारतिन मान तर तुह्मी सिरपत नायक हकिम मारे व तमारा ईनाम आज पासुन सही जाला ।। वे राउत सीधे यांस आज पासुन पंधरासें हुन बकसिस ।। आपले मुखीं वांटुन ताडे माड वसइं आगराचे कुल कमाइस करुन खावे ।। थकटका जयाचे वाडित असेल त्यास द्यावा ।। व माझी आज्ञा जर बाहादरपुर वसाईत नवी वसवावी ।। तेथे पाटेल सरखुमा वर ।। व जे प्रजा तेथे सर्व जातिची राहेल त्यांचे ही पाटेल ।। दर घरास टका १ वरसास यांस द्यावा ।। व याहि तीनसे राउत जमा निशाण अफदागिर माझे सेनेपुढें युद्धास मान ।। हा महजर ईनामि खुशालिन खानसायेबि दीधलें ॥ व पानपटि दीधली ॥ यैसे सुखि करोन घरि पाठविले ।। मागे वसाईत बाहादरपु-यास जाली ।। भंडारि सिंधे खुम घरें ५० येउन राहिलीं ॥ या कबिल्यास राउत समुदाये तीनसें नित्य मजलसिस केशवराउतें जावें ॥ ते समईं खत केलें जर या कबिल्यान माडे ताडी ३५५ वाहावि ।। ही टाकित दुसरिं दुस-या सा-यांस वांटुन गावोगावि दीधली व मसाला बांधिला ।। वरसास सासें हुन सरपाटिलांस द्यावा ।। तयांसि जे समइं राउत खानसाहेबां समवेत कोठे स्वारीसिकारिस जातिल ते समइं पाटेलाहि आपले खर्चित यांस अडेच-सेरि द्यावि ।। हे सही

हा निर्वाह होतां गावें वसवाविं ।। तेधवा केशव राउत वरि येवोन कागद बांलवांस पाठविला ।। तेथोन सर्व आपला जमा सिंधे शेषवंशि धारेचे पाईक से ९ समभारें आपुले संप्रदायें हांटदळि आले ।। केशव राउतास भेटले ।। आज्ञा सिरी वंदुन बोलते जाले ।। जर किंनिमित्य बोलावोन आणिलें ।। तेधवां केशव राउत चौघलेंया प्रत बोलता जाला ।। जर खानसायबान तलब केलि आहे ।। जर आपला संप्रदाये अवघा आपले ताबिन ठेवावे ।। या करितां हुकुम खानाचा तुह्मास बोलावोन आह्मि आणिलें आहे ॥ मग सर्व समुदाय घेवोन केशव राउत खाना जवंळ मदलसिस नेले ।। जमा पाइंक समुदाये शस्त्रधारि देखोन खान संतोषला ।। जर हे क्षेत्रि अवल्ल माहामुदल ।। मग हांटवटा यावत् हीरा डोंगरी ईनाम केशव राउतास जालें ।। तेधंवा उत्तलेश्वरी तटाक केशवराउते बांधिलें ॥ शांतनादेवि तेथे स्थापिली ।। आणि गौराळि तटाक बांधिलें ।। तेथे गावं रचिला ।। वालिवंकर हरबजि राउत आपले खुमासिं गोरीजासि घरबंध केला ।। तेथे ह्मातार पैकि चवघला सीवाजी ह्मातारा राहिला ।। ईमारथा केल्या ।। दळवाडिये अर्बुदा नावं जालें ।। इजारा २४ वीसदाम ह्मातारे पैकि चालला ।। त ह्मातार टिळयाविड्याचे अधिकारी ।। राउत टिळयाविड्याचे अधिकारी ।। यैसे वर्तुं लागले ।। मग केशव राउत हांटदळि सीमगा खेळतां कच माळियांसि बनली ॥ ताम्रतळयासिं युद्ध जालें । माळियांचि छत्रि शेषवंशियांहि मोडिली ।। ती बोंब खानसाहेबासि गेला।। तेधवां खाने हुकुम चोपदार पाठवोन पाटेल चोधरि ह्मातारे राउत बोलावोन आणिले।। पुसो लागला जर या माळयांचि छत्रि मोडावि काये ह्मणोन ।। तेधवां जाब सर्वांहि केला ॥ जर हे माळि आदखानियांहि आमचे मागें खेळावें ।। मोहारे आमचे निशाण आणि छत्र ॥ त्या मागे सोमवंशि आणिक ईत्तर ।। यैसे पुर्वापार चालोन आलें ।। तेधवा जाब वर्तक बोलता जाला जर मोहोरें तुह्मी निशाण न्यावयाचे खत खानसाहेबास दाखवावें ॥ की आह्मी सर्वांचे मोहोरे सोमवंशि व सूर्यवंशि ॥ त्यामागें तुमचें निशाण ॥ हा जाब आईकोन खान बोलता जाला जर पुर्वा पासोन कोणकोणास छत्रि हें साकल्य सांगावें ॥ ते वेळि केशव राउते आपुला कुळगुरु बोलावोन खाना हुजुर मजलसिन वंदुन बोलिल ॥ जर प्रथम निशाण कोणाचें हें साकल्य खानाप्रत प्रविष्ट करावें ।। तेधवां देवदत्त नायक बोलता जाला ॥ जर सोमवंश आणि शेषवंश हे येकयकाकि अवलाद आणि अफलाद ॥ यांसि वाद व्यर्थ ।। परंपरा येकयका पासुन अनेक उत्पति होत आहेत ।। परंतु प्रथम निशाण सोमवंशि ।। त्यामागें शेषवंशि छत्रियांसि आणि त्यांसहि चालोन आलि ॥ यथे निवाडा पाहातां ॥ साकल्य पुराण संमतीकथा ।। व्यासें कंथिली पूर्व उत्पनता ।। तेथे निवाडा असे ।। आतां सोमवंशासि सिंहासन आणि छत्र कैसें प्राप्त जालें तें आइकावें ॥ छ ।।

मझर ।। संवत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७ ।। त्या मध्ये मुखें इतर जात ।। मुख्य कुळें ।। राव १ राउत २ रुत ३ ठाकुर ४ ठकर ५ ठाकरे ६ चुरी ७ चौधरी ८ चोरघे ९ ह्मांल १० ह्मातारे ११ कडु १२ महंत १३ रक्ती १४ पुरो १५ राणे १६ राज १७ साहाणे १८ जीत १९ सींग २० सीळ २१ घरथ २२ मघर २३ दुमोघ २४ भठी २५ पदक २६ सवं २७ ॥ हीं खुम मुख्य ।। तयासि गोत्रे कुळस्वामिणी ॥ या उपर जात ॥ कवळी १ दरणे २ भोईर ३ पड्या ४ माळी ५ घरठी ६ भटयारी ७ सांखळे ८ उभार ९ नाईते १० गाण ११ विर १२ ॥ ही बारा खुमे जात ।। यास गोत्रे देवनाम ।। या उपर ईतर ॥ छ ।।

या उपर नवकुळें शेषवंशि ।। राउत शस्त्रधारि इनाम खातात ।। पुर्वि विंबा समागमि आले ।। तयांचा संप्रदाय या वसइंस बहुत असे ।। ताड माड उद्यमी खुमाइत ।। तीन हजार सजगाणी पुर्वि खत भोगळे हस्तिंचे पंधरासें हुनाचें ईजारा करुन सर्व संप्रदाइ बारा पाखाडिया आगर वसइ मुख्य हांटदळा जागेजागे राहोन आपल्यात पाटेल जाले ।। बारा करुन राहिले आहेत ।। हा यिजारा वरसास स्वामी मुलुखाधिश यास सांगावा ॥ दुसरें काहि लागत नाही ॥ जर यांस शस्त्र धरायास हा बकसिस केला तर जैसा पुर्वि होता त्या प्रमाणे साहेबि चालविला तर युद्धास सादर होतिल ॥ हे हेर विठलचुरि यान सांगितली ।। हें आयकोन खानसाहेबि आदा केशव राउत सर--पाटेल खुमाचे त्यांस बोलाउं पाठविलें ।। प्यादा पाटलाचे घरि जाउन दिवानचा निरोप दिधला ॥ जर खानसाहेबी तुम्हास हुजुर बोलाविलें असे ।। केशव राउतें कबुल केलें व निरोप प्याद्यास दीधला जर बडि फजर साहबकें कदम पासि करनेकु हुजुर खडे होउं ।। हा निरोप याद्यास दीधला ॥ उपर विचार केला ।। जर आज दिवस पांच जमाईत मदलसिस होतों तेधवां काहि पुसति विचारणि न केलि व आज बोलाउं पाठविलें यास कारण काये ॥ जाणुन आपला पुत्र रामराउत समागमी मनुष्य देऊन सिरपत नायक स्वकुळगुरु व दिवान हकिम जाणुन मांडळैस बोलाउं पाठविलें ।। त्यांहि रामराउत देखिला ।। केशव राउताचा आमंत जाणुन सत्वर समागमि आले ।। देखता च केशवराव प्रणिपत्य करुन चरणि लागले ।। इयेरिं आशिर्वाद देउन आळंगिले ।। उभये डोहोलारि बैसले ।। येव्हडे रात्रि आमंत सत्वर कां हे साकल्य व्रतमान सांगितलें ।। ते समई सिरपतनायक बोलिला ।। जर मी दरबारासं असतां विठल चुरि आला होता।। खानसाहेबांसी बहुत मजकुर करित होते ।। परंतु मज तुह्मा विसीं बोलतां काहि आइकिले नाहि ।। परंतु मज तर्क दिसोन येते जर बाहादुरपुरा वसवायास इछा खानाची असे ।। कांहि तुह्मा पासुन समुदाय करविल तर तुह्मी या समइं आपले कुळाचा अभिमान धरुन बाहादरपुरि वसाईत करा व सरपाटेलकिचे पद खानसिक्यांसि महजर करुन घ्या ।। तथे बहुत युक्ति आहेत त्या मजलसित आह्मि पुर्वपक्ष करुन निट करुं ॥ हा विचार केशवराउतास मानला ॥ सूर्योदई मदलसिस केशवराउत आपले खुम वसइत आले ॥ खानसाहेब जोहारिले ।। खानि बैसकार दिधला । विठलचुरि आपले ससुदाई खान जोहारिस आले ।। सर्व जमाईतदार मिळाले ।। मदलसि भरली ।। या उपर केशवराउतें तसलिम करुन खानसाहेबा प्रति अर्ज केला ॥ जर साहेबि सेवकास काल निरोप पाठविला, जाणुन कदम हुजुर. असे, फरमाईस केलि पाहिजे ॥ हें आयकोन अंतरि खुशाल जाला ॥ जर राउत दक्ष देखिला ।। जाणुन बोलता जाला ।। जर गत मदलसित या दुस-या खुमाचा निवाडा टिळा वोर पान बिडा याची कजिया चुकविला ते समइं राउत किसबास्ते चूप रहें थें ।। ईसबास्ते आज तमारि कुल वतनाई ठिकान जागिर बतन ईनामकी खबर मेरे तें दे ।। हें आइकतां केशवराउत उठोन तीन तसलिमा करून रजा मागितली ।। खानी रजा देतां जाऊन सिरपत नायकाचे चरणावर मस्तक ठेवीला ।। हें देखुन खान मनी विस्मीत जाला ।। जर हें मोठें अपुर्व असे ।। पण उगाच राहिला।। त समइं सिरपत नायक उठोन तीन तसलिमा केल्या ।। त समइं खाने समीप बैसकार दिधली ।। व पुसिलें जर सब हकिकत कहो ।। ते समइं महजर श्रीबिंबा पासुन यावत् डफरखान जमाईत माहिमास राज्य अधिकारि तयाचे हस्तीचा महजर तो पंडितान रसनोसी दुभासया हस्तें दीधला ।। त्याणे वाचुन खानसाहेबास दाइम कथा जर धौडिनायक सांडेरेयां पासुन पेढ्या ३ ॥ केशवनायकांस महजर त्याचे नामाचा ।। त्या पासुन पेढी ५ हे सिरपत नायक ।। हे त्या राउत खुमाचि कुळें नव ॥ चोधरी १ राउत २ राणे ३ पुरो ४ ह्मातार ५ वरातदार ६ कडु ७ ठाकुर ८ ह्मतारे ९ ।। गोत्रं कुळस्वामिण पदे सर्व समवेत ।। हे शेषवंशि धारेचे राउत ।। यांचे कुळगुरु तयाचे जाणुन हे सर्वासि घेतिल ।। ह्मणुन व आह्मा माराष्ट्रधर्माची नित गुरुत्व ब्राह्मण जाणुन केशवराउतें चरण वंदिल ।। जर तयांचि उत्पती सर्व तया मुखीं साहेबास श्रृत होईल ।। तयांहि आपला महजर दाखउं सांडोरपाखाडिचें ईनाम व कुळगुरुत्व महजर सीके पत्रीं सर्व साहेबास कळाया करितां कदमि साहेबाचे ठेविला ।। हे आइकोन खान खुशाल जाला ।।

कईं [ कदाचित् = कयाँई = कई sometimes ]

कंकुष्ट [ काककुष्ट ] (भा. इ. १८३४)

कंगणी [ कंकणी ] अलंकार आहे.

कंगाल [ कंकाल: ] कंकाल म्ह० हाडांचा सांपळा. कंगाल म्हणजे केवळ अस्थिचर्म राहिलेला माणूस.

कचकरा [ कचग्रह: ]

कचकावून [ कचक (ना.) ] (धातुकोश-कचकाव २ पहा)

कचक्या [ करीषंकषः वायुः ( ३-२-४२ ) = कचक्या वारा ]

कचमणें [ कश्मलं प्रबलो मोहः ॥ कश्मल = कसमल = <कचमण ] मरणार्‍याचा जीव कचमतो म्ह० प्रबळ मोह पावतो. (भा. इ. १८३४)

कचरा १ [ कच्चरं= कचरा (पु.)] (भा. इ. १८३५)

-२ [ मलीमसं तु मलिनं कच्चरं मलदूषितं । ( अमरः ) कच्चरक = कच्चरा = कचरा ] कचरा म्हणजे मळदूषित पदार्थ. [भा. इ. १८३३)

-३ [ कच्चरा (dirty वैजयंती कोश) = कचरा ]

-४ [ कच्चर: = कचरा ] कच्चार म्ह० नीच, टाकाऊ

कचून मारणें [ कच् बंधने. बांधून मारणें. कांचणे = बांधून करकोचा पाडणें. कांच = बंध ] (ग्रंथमाला)

कचोरा [ कर्चूरः ]

कच्चा १ [ कंसः ( a coin ) = कच्चा ] हिशेबांत कच्चे करतात-तेच पुरातन कंस.

-२ [कश्यः worthy of being beaten with a whip = कच्चा ] कच्चा चेला.

कच्चें [ कथ्थ (खोटें ) = कच्च = कच्चं = कच्चें- चा-ची ] (ग्रंथमाला)

कट [ क्कथः = कठ = कट (वरणाचा कट) ] वरान्नस्य क्कथ: क्काथ: वा = वरणाचा कट.

कटकट [ कट् १ गतौ. कटकटिका = कटकट ] कटकटिका म्ह० कल्होळ.

कटकन्, कटदिनि [ चटकर पहा ]

कटमिती [कृत्तमित्यक deduction of debt = कटमिती. अपमित्यक (मे-debt) ] a transaction wherein a debt is deducted in proportion to payment.

कटवणी [ क्काथपानीयं ] (उकळींव २ पहा)

कटाकटा [ (सं) कटकटा ( घासण्याचा आवाज), कटकटा = कटाकटा ] (भा. इ. १८३३)

कटाकटा ! [ कष्टं कष्टं = कटाकटा ! (अव्यय)] कटाकटा हा दुःखोद्गारवाचक शब्द मराठी काव्यांत येतो.

कटाकटी [ कष्टकष्टेन = कटाकटी ] with extreme difficulty.

कंटाळणें [ कट् कृच्छ्रजीवने कठ = कट = कटाळणें, कंटाळणें (पीडित होणें ) ] कटाळणें असा निरनुस्वार प्रयोग आशिष्ट करतात. (भा. इ. १८३३)

कट्टा (पक्का) [ कटखादक = कट्टा खादाड. कट म्हणजे अति, पुष्कळ (उत्कट ) ] (भा. इ. १८३४)

कट्टा [कट् to appear, to become manifest. कट्ट ( धातुसाधित ) = कट्टा manifest ] कट्टा लुच्चा manifest liar.

कटुवाण [ कृष्टवाणिज्यं = कटुवाण ] नांगरलेल्या जमिनींतला वाणजिन्नस.

कटोरा १ [कटोरा (पात्रविशेप) ]

-२ [ कटकोल: = कटोरा ( भांडें ) ]

कट्यार [ कटीतल (एका प्रकारची तरवार)= कटीअर = कट्यार, कटीतर असेंही रूप असावें ] (भा. इ. १८३३)

कंठ [ कंठ = कंठ ] ( स. मं. )

कंठणें [कंठ् to rememler with regret ] आयुष्य कंठणें.

हरदपुरो अधिकारि म्हणे मै बडा ॥ हें आईकोन खानसाहेबासिं अजब वाटलें ।। आगासिचे वर्तक जानीक सावा व अर्जुन सावा आपलिं खतें दाखवों लागले ।। जर यावत् महिकावति व वसई आमचा हवाला ।। पहिला विडा पहिला मान आमचा ॥ या उपर हरदपुरो अधिकारि बोलिला ।। आपला मझर खानास दाखविला ॥ जर माहिम बिंबस्थान राणे पै आमचा जन्म व चवदा माहालें माहिमा खाली माहिम बडा ॥ ऐसा मझर खाने पाहातां निवाडा केला जर माहिम बडा ।। हुजुर मजलसि दफतर पाहातां, जील्हे कागद पाहाता, निवाडा राजीणि सीक्के तलबे सिक्के माहिम, कसबे सिक्के माहिम, प्रगाण सिक्के माहिम, ऐसा मझर पाहिला ।। तेधवां खान म्हणे माहिम बडा ।। मग हरदपुरो अधिकारि यासिं राणे पैकि आगरतपे-याचा विडा हरदपुरोसिं दीधला ।। आतां खान म्हणे कोण्हाला ॥ अधिकारि बोलिला राजतपे- याचा ॥ पोस पुरो वानठेकर त्याला दिधला ॥ त्या उपर खान म्हणे आता कोणाला ॥ तवं मालाडतपेयाला व मरोळतपेयाला ।। दोघां देसायांला विडे दिधले ।। मग वसईचा वर्तक नागचुरी त्यासी विडा दिधला ॥ मग आगासिचे वर्तक अर्जुन सावा व नामसवा त्यासी विडे दिधले ।। तेधवां चु-याचे पुर्वपक्ष हरदपुरो अधिकारि बोलता जाला ।। खानसाहेबा प्रत सांगता जाला ।। जर चुरि आद्य वर्तक ।। नामजा देसायाचि परंपरा ।। पुर्वि पातस्या सुलतान तोगिल त्याचा सुलतान आलावदिन दिल्लीचा पातस्याहि त्याचा वजिर कोकणि आला ।। नाम निका मलिक ।। पैठणा जवळ च-हीं गावं तेथोन जैतचुरि निका मलिकें आणिला ॥ तो विराळि मालाड पुर्व दिसेस तेथे स्थापिला ॥ विराळि पाखाडि मालाडची ईनाम दिधली ।। त्याचा पुत्र भागडचुरि गोत्र विश्वामित्र कुळस्वामिण हरबा देव ब्रम्हक्षोत्रे रुद्रउपाशक गुरु केशवपंत सांवखेडकर ।। त्याणे साशष्ट गावांचि देसलिक चालविली ।। सर्वाचा देसाये प्रवर्तला ॥ तेधवां कजिया येवोन बनला ।। मग तो भागडचुरि देसाये दादरुत आणि सीमल म्हातारा मीळोन तो भागडचुरि मारिला ॥ त्याचे पुतणे दोघे पैलपार जाले ॥ येवोन वसई राहिले ।। नामचुरि व भीवंचुरि ॥ हे या स्थळ वर्तकिचे आधिकारी ।। त्यासी टिळयाचा अधिकार ॥ त्या खालते रावराउत गोत्र अंबऋषि कुळदेवत येकविरा ।। या उपर म्हातारे सवे घरथ आणि ईतर ॥ आतां चु-याचा वंश ।। नामचुरी १ ।। त्याचा गोविंदचुरी २ ।। माधवचुरी ३ ॥ गोपाळचुरी ४॥ रामचुरी ५॥ सीवचुरी ६ ॥ दादचुरी ७ ॥ कृष्णचुरी ८ ॥ केशवचुरी ९ ।। मुकुंदचुरी १० ।। रणसोडचुरी ११ ॥ विठलचुरी १२ ।। हे वर्तक नाम जादे ।। विठलचुरी घरथाळयान बुलभाट यावत् बोरवाडी घर बांधोन राहिला ।। त्याचा निजांग पुतण्या आगासि देववाडि वर्तला ॥ त्याचा वंश ॥ रामचुरी १ ।। त्याचा गोविंदचुरी २ ॥ त्याचा दामुलचुरी ३ ॥ त्याचा सीवरामचुरी ४ ।। त्याचा वंशा न वाढे म्हणोन सीवरामचुरि केळव्या गेला ॥ त्याचा वंश केळव्यासिं जाला ।। तो हाटवटा हांटदळि राहिला ॥ त्याचा वंश तेथोन ॥ आणि या नागचु-याधि कंन्या साव्याचे घरिं दिधली होती ॥ त्या कंन्ये पासोन धोत्तरवंश म्हणोन आपुले वर्तकि पद आगासिचें त्या देवदत्त सव्यासी दीधलें ॥ त्यासि वर्तकि पद चालतें जालें ।। त्या पासोन सीवाजी सव्याचा पुत्र गोविंद सवा ।। तो द्रव्यमदे दिमाक थोरावला ।। दिवानि येणे जाणे न्यायासिं ।। त्या वेगळे आमानता सर्वांसी ।। तेधवां याणे अतिसयें पाये सोडिले ।। लोक त्याणे फार दमिले ॥ तेधवां आमचे पुरोपक्षिं अमान्यता करो लागला ॥ तेधवां पुरो आगासकर वि-हारकर सोपारकर हे मिळोन शोध चु-याचा केला ।। तेधवां चु-याचा वंशिक भीवंचु-याचा नातु केळ. व्यास होता तो या पुरो हि आपण मनुष्य धाडोन त्यास आणिलें ।। त्या जवंळ हेर घेतली ।। जर तुज कांहीं विदित आहे जर तुझे वाड वर्तक होउन गेले त्यांचे हातिचें खत अथवा काहि पत्र असेल तर आह्मि तुज वर्तकि या देसाचि देवों ॥ तेधवां तो बोलता जाला ।। जे पुर्विचा मझर निका मलिकाचे हातिचा आहे तो आणितों ।। तेधवां विठलचुरी केळव्यास जावोन मझर आणिला ।। सहि किताब घेतला ।। या सर्वांचे चित्तास आला ॥ मग त्या विठलचु-यासिं घेवोन दिवानि रवानसाहेंबा जवंळ आले ।। सलाम करोन उभे राहिले ।। जाब केला ।। जर हा विठलचुरी वर्तक आदखानि ॥ याचि हि वर्तकी हा सवा चालवितो ।। हें सत्य असत्य पाहावें ॥ जर कवणाचि हि वर्तकी खती मझरीं पाहावी ॥ या जाबा खान पुसतां जाला जर कोण्हाचि हि वर्तकी हें साकल्य सांगावें ॥ खतीं मझरि दाखवावीं ॥ मग या बोला जाब विठलचुरीयान केला जर आदखानि वर्तक चुरि म्हणोन मझर दाखविला साहेबि नेकी पाहावी ॥ मग खाने मझर वाचविला ।। तेधवां खत चु-याचे नावें, किताबत शिका पातस्याहि, सुलतान आलावदिन, सीका वसई चुरी आदखानि वर्तक सही ।। तें देखोन खान सव्या जवंळ विचारों लागला ॥ जर तु जवंळ खत मझर असेल तर दाखवावा ।। तेधवां सवा बोलिला जर ही वर्तांके चु-याची हें सत्य, परंतु आह्मि चु-याचे नातु अवलाद ह्मणोन आज्यान आाह्मास दीधली ।। अवलाद ह्मणोन चालवितों ॥ तेधवां खान बोलिला जर त्याचा वंशिक असता तुज वर्तकि न पावे, जेधषां त्याचे कोण्हि नसतें तेधवां चालती ।। मग खाने चुरि नावाजिला ।। आपल्या पासि ठेविला ॥ व सव्यासि बोलिला जर चौघलें पद चालवावें ।। ह्मणोन खाने सव्यासि चौधला केलें ।। खत आपले हातिचें दोधलें ।। तो हि सुखि केला ।। मग त्या चु-यासि निराश्रय जाणोन घर घरथा व वाडि ईनाम यावत् रान मुक्तेश्वर रेणुकास्थान ईनाम दीधलें ।। तो घरथाळयास स्थापिला ।। या परि चुरि वर्तक जाला ।। दिवानि दीमक जाला ।। सवा तो हि वर्ती लागला ।। त्या चु-यासि कंन्या नामराउतें दीधलि ।। तो चुरि आणि राउत हे सोहिरे जाले ॥ राउत गोत्र अंबऋषि कुळस्वामिण येकविरा ।। या राउतास सोहिरा घरथ गोत्र श्रीचंद कुळस्वामिण काळिका ।। यैसे वतों लागल ।। यैसा निवाडा बहादुरस्या जवंळ हरदपुरो अधिकारियान सांगितला ॥ तो खानसाहेबासिं मानला । मग त्या चु-यासी सिरपाव दिला । अधिकारि देसायें चौघले पहिराविले ।। सर्वांसि आज्ञा दिधली ।। सर्व देसाय गावोंगाविं गेले ।। मग बहादुस्याने राज्य वसई केलें वरुषें ३५ ॥ या उपरांत कथा वर्तलि सही ॥ छ ।।

औट १ [ अध्युष्ट ] (आउट पहा)

-२ [अर्धचतुर्थ = अर्ध च तत् चतुर्थ च, एक दोन तीन असे पदार्थ मोजून चवथा पदार्थ जो होता तो अर्धा होता. तेव्हां अर्ध चतुर्थ म्हणजे तीन आणि चवथा जो अर्धा तो म्हणजे औट. अर्धचतुर्थ = अद्धट्ट = अउट्ट = औट ] अर्धचतुर्थी मात्रा ( गोपथब्राह्मण - पूर्व - प्रथमप्रपाठक) = औटावी मात्रा, साडेतीन मात्रा. (भा. इ. १८३४)

औत [ आवप्त = आउत्त - आउत = औत ] आउत म्हणजे पेरलेलें. त्यावरून पेरण्याचें यंत्र, क्रिया. आउताचा नांगर, आउताचा बैल, असा बोलण्याचा व्यवहार आहे. ( भा. इ. १८३३)

औत, औति [ आहुति ] (आउति पहा )

औदसा [ अपसदा ] (अवदसा पहा)

औशीं [ आवसतिः ] (आवशीं पहा)

औंदा [ आइंदह् (फारसी)] (यंदा पहा)

औस [ उषस् ]

औळून [ आकुलीकृत्य = आउळून = औळून, आवळून] नयने आकुलीकृत्य = डोळे औळून.