Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
संस्कृत भाषेचा उलगडा
पाणिनी ही रूपे खालील आगम घालून सिद्ध करतो : १) इद स्थानी अय, २) इदम् स्थानी इम, ३) इदम् स्थानी अन व एन, ४) इदम् स्थानी अ, ५) इदम् स्थानी अने, ६) नाम् स्थानी षाम् ह्न साक्षात् निपात केला असताना तरी काही बिघडले नसते.
इदम् स्त्रीलिंग
त्यत् च्या स्त्रीलिंगाप्रमाणें साधनिका व इदम्, यनद्, अ या तीन शब्दांच्या रूपांचे मिश्रण.
इदम् नंपुसकलिंग
१) (इदम् + म्) इदम् इदमी इदम्मि
२) इमम् इमे इमानि
३) एनत् एने एनानि
या तीन सर्वनामांच्या रूपांचे मिश्रण.
८ पाणिनीय अदस् सर्वनाम.
तद् म्हणजे ते. अतद् म्हणजे तद् च्या हून अलीकडले. अतद् किंवा अतत् मधील पहिल्या त चा द होऊन व दुसऱ्या त् चा स्हो ऊन अदस् हा सामासिक शब्द झाला. पूर्ववैदिकभाषांत अद्स् (अतत्) व अमु अशी दोन सर्वनामे असत. त्यांच्या रूपांचें
मिश्रण होऊन पाणिनीय रूपे झालीं आहेत.
अदस्
(१) अदस् + स् = असस् = स् = असह् + ह् = असअ + उ = असा + उ = असौ अ + तद् = अतद् = अस अथवा (त स्थाने स असे पाणिनी सांगतोच).
अस + स् = अस + ह् = अस + उ = असौ
* अ + उ किंवा आ + उ यांचा संधी पूर्ववैदिकभाषात औ होत असे.
* इतर रूपे तत्प्रमाणे :
१ २ ३
असौ अतौ अते
अतं ' ' अता
इ. इ. इ.
संस्कृत भाषेचा उलगडा
(६) पाणिनीय सर्व शब्द त्यद् प्रमाणें चालतो. नपुंसकलिंगी सर्वत् असें रूप नाही.
(७) पाणिनीय इदम् शद्ब: ह्न पूर्ववैदिकभाषांत इदम्, यनद् व अ अशी तीन सर्वनामे इदमर्थक होतीं. ती अशी चालत :
इदम्
(१) इदम् + स् = इअम् (स् लोप) = यम् = (उच्चारसौकर्यार्थ) अयम्
(२) इदम् + स् + स् = इअम् + अ + उ । (अलोप)
इम् + अ + उ = इमउ = इमौ
यनद
(य चा उच्चार अ व ए यांच्यामधील उच्चारासारखा असे. धड ए ही नसे व धड अ ही नसे. या दोन्ही मधला असे. वैदिककाळी कित्येकांनी हा मधला उच्चार ए केला व कित्येकांनी अ केला. मी हा उच्चार य् या खुणेने दर्शविला आहे.)
(ए उच्चार होई त्यावेळेस)
१) एन: एनौ एने
२) एनम् ' ' एनान्
३) एनेन एभ्याम् एभि:
(अ उच्चार होई त्या वेळेस)
१) अन: अनौ अने
२) अनम् ' ' अनान्
३) अनेन आभ्याम् आभि:
अ
१) अ: औ ए
२) अम ' ' आन्
३) अया आभ्याम् एभि:
(४) अस्मै ' ' एभ्य:
(६) अस्य अयो: एषाम्
या तिन्ही सर्वनामांचे मिश्रण खालील पाणिनीय रूपे आहेत :
(१) अयम् इमौ इमे
(२) इमम् ' ' इमान्
(३) अनेन ह्न एनेन आभ्याम् एभि:
(४) अस्मै ' ' एभ्य:
(५) अस्मात् ' ' ' '
(६) अस्य अनयो: एषाम्
(७) अस्मिन् ' ' एषु
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कोंगाडा [(कुह् to deceive) कोहट: किंवा कुहट: = कोघडा = कोगाडा = कोंगडा ] deceitful.
कोंच [ कूर्च = कोंच ] (स. मं. )
कोटिंबें [ कुटांबुकं = कोटंबें, कोटिंबें ] कुट म्ह० घडा, त्यांतील पाणी पडण्याची नाळी.
कोठचा [ क्वत्य = कोठच (चा-ची-चें ) ]
कोठचें - कुतस्त्यं = कोठचें. अंतःस्थं = आंतचें.
अत्रत्यं = एथचें. बहिस्थं = बाहेरचें.
तत्रत्र्यं = तेथचें गृहस्थं = घरचें.
मध्यस्थं = मधचें.
कोठार [ कूटागार = कोठार ] कूटागाराः सुवर्णखचिता दृश्यन्ते स्म । ( कारंडव्यूह ) (भा. इ. १८३४)
कोठावणें [ कुत्रापयति = कुठ्ठावे = कोठावे. कुत्रापनं = कोठावणें ] कोठावणें म्ह० कोठें जातोस म्हणून विचारणें. कथादीनां सर्वेषां पुकं आह शाकटायनः (भा. इ. १८३३)
कोठी [ कुटि: ( सभा) = कोठी ] संस्थानांतून office या अर्थी कोठी शब्द योजतात.
कोड १ [ कोट = कोड ] त्वक्पुष्पं कोटस्तुमंडलं ॥ (केयदेव-पथ्यापथ्यविबोध).
-२ [ कुड्यं Curiosity = कोड ] कोड पुरविणें to satisfy curiosity.
-३ [ कौतुक = कोडुअ = कोड ] कोड पुरविणें म्ह० कौतुक पुरविणें. कोडकौतुक असा जोड शब्द हि आहे. फारसी व मराठी असे जोड शब्द मराठींत पुष्कळ आहेत. परंतु प्राकृत व संस्कृत असे जोड शब्द मराठींत विरळा सांपडतात. पैकीं हा एक आहे. (भा. इ. १८३५)
कोंड [ कुंड् रक्षणे. कुंड्य = कोंड ] दक्षणेकरितां ब्राह्मण कोंडणें म्ह० बंदोबस्तानें राखून ठेवणें. ( धा. सा. श.)
कोडगा १ [ कूटक: = कोडगा ]
-२ [ कृतघ्नः = कडगा = कोडगा ]
कोंडगोळें [ कुंडगोलकत्वं ] ( कुंडगुळें पहा)
कोंडवाडा [ कुंडवाट ] गुरें राखण्याची जागा. ( धातु कोश-कोंड ६ पहा)
कोंडा [ कुट्टः ( ज्ञा. अ. ९ पृ. ३४ )
कोंडाळे १ [ कुंडलं = कोंडळें = कोंडाळें ]
-२ [ कुंडालयं = कोंडाळे ]
कोंडी [ कुंडिका = कोंडी ] कोंडी फोडणें-रक्षिलेली जागा भेदणें ( धातुकोश कोंड ६ पहा)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
केरसुणी १ [ कर्षणी (पुंश्चली) = करसणी = केरसुणी. कं चा के] ( भा. इ. १८३३)
-२ [ कर्शणी = करसणी = केरसुणी ] कर्शणी = वाईट चालीची स्त्री. झाडणीशीं कांहीं एक संबंध नाहीं. (भा. इ. १८३५)
-३ [ कर्षणि = करसुणा = केरसुणी ] अपशब्द-व्याभिचारिणी स्त्री. (भा. इ. १८३६ )
केला [ क्री-क्रीत + ल = केला (bought) ] मी तुमचा केलाँ I am bought by you. क्रीत पुत्राला अनुलक्षून.
केवडा [ केयूर: = केउडा = केवडा ] केयूरं शिरोभूषणं. केवडा हा स्त्रियांचा डोक्यांतला दागिना आहे.
केवीलवाणा १ [ क्लीव् to be impotent ]
-२ [क्लीववत् den ]
-३ [ कृप् १ अवकल्कने. कृपणवर्ण = केविलवाणा. कृपा = कींवा. कृपण = कृपिल = केंविल ] ( धा. सा. श. )
केंविलवाणा [ कृपणवर्णः = केंविलवाणा. कृपा = कींवा, कृपण - कृपिल = केंविल. कृप् १ अवकल्कने ]
केस [ केश = केस ] (स. मं.)
केळवणी [केलायनी ] (धातुकोश-केळव १ पहा)
कैंचीं [ कानिचित्] ( ज्ञा. अ. ९ पृ. ११ )
कैच्या [ कैशिकं = कैचिअ = कैच्या ] कैच्या धरून द्रौपदीला दुःशासनानें ओढली, या वाक्यांत कैच्या म्ह० केशसमूह, वेणी. कैशिक म्ह० केशसमूह, वेणी.
कैंपक्ष [ कृपापक्ष = कींवपक्ष = कइँपक्ष = कैंपक्ष ] हा शब्द रामदास योजतात. (भा. इ. १८३३)
कैरा [केकर: = कैरा] काणा, तिरळा.
कैंवार [ कृपाकर = कींवा अर = कींवार. कींवारस्य भाव. कैवार ] (भा. इ. १८३३)
कैसेनि [ कीदृशेण ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ९ )
कोकणें [ ( कू = आवाज करणें ) कोकूय ( क्रियासमभिहारं ) = कोकणें ] कोकणें म्हणजे फार वेळ आवाज करणें. ( भा. इ. १८३६ )
कोंकलणें [(कल्) चाकल्यते = कोंकलणें ] ( भा. इ. १८३६)
कोकाटू [ कर्कटुः = कोकाटू] पक्षिविशेष.
कोक्या १ [ कक: ] ( कावळा पहा)
-२ [ कक लौल्ये गर्वेच । कक: = कोक्या ] तो कोक्या आहे म्ह० गर्विष्ट, अभिमानी आहे, लुच्चा आहे. कोंकणस्थ शब्दापासून निंदार्थक झालेला कोंक्या शब्द निराळा.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कुसळ करणें [ कुशलीकरणं नाम वपनं ।] (आश्वलायन गृह्यसूत्र १-१७-१६) कुसळें काढणें, उपटणें म्ह० हजामत करणें, केंस उपटणें. तूं माझें काय कुसळ करतोहेस ? म्हणजे तूं माझी काय हजामत करतोहेस? (भा. इ. १८३६ )
कुसा [ ( अयोविकारे) कुशी = कुशी ( स्री.), कुसा (पुं.) ] कुसा म्ह० पहार. खानदेशांत रूढ आहे.
कुसुर्या [ कौसृतिकः ] (कसूर १ पहा)
कुसूं [कुशा (a wooden peg) = कुसूं ]
कुसूर [ कुसृति: निकृतिः शाठ्यं (अमर - प्रथमकांडनाट्यवर्ग ३०) कुसृति म्ह० लुच्चेगिरी. कुसृति = कुसूर, कसूर, कुचराई, कसुराई] (भा. इ. १८३४)
कुहा - हा शब्द ज्ञानेश्वरींत (मुकुंद, ज्ञा. १४-३८७; १५-४५५) येतो. तेथें त्याचा अर्थ कूप, विहीर असा करतात. खरा अर्थ धुकें असा आहे. (सं.) कूहा ( स्त्री. ) किंवा कुहक, कुहअ, कुहा.
राजवाडे ज्ञानेश्वरी - कां कुहेंसि आकाशा । तोंडिं सांदा नाहिं जैसा । तो परमरसु तैसा । एकवटे ॥ १४-३८७; जैसा कुहां । आपणचि बिंबे । सींहु प्रतिबिंब पांतां खोभे । खोभला समारंभे । घली तेथ ॥ १५-४५४. (भा. इ. १८३२)
कुहू [ कुहू (कोकिल) कुहू] (भा. इ. १८३६)
कुळकुळणें [कूल=जळणें ( पौनःपुन्य) कूलकूल=कुळकुळ] कुळकुळणें म्ह० जळजळीत होणें. विस्तव कुळकुळला. (भा. इ. १८३३)
कुळकुळित [ कुलिश (कोळसा) = कुळकुळित ]
कुळकुळीत [कूल =जळणें] जळून निवालेल्या कोळशाच्या रंगाचा काळा. (भा. इ. १८३३)
कुळंगार [ कुलांगार = कुळंगार]
कू (हिंदी प्रत्यय ) [ गृहस्य आके (वैदिक) = घरकूं] हिंदी कू प्रत्यय वैदिक आके पासून निघाला आहे. अ + अकच्= आक, सप्तमी आके. आके ही अ सर्वनामाची अकच् सप्तमी आहे.
कूड [ कुंद्रक: ] (कुडा पहा)
कूस [ कुक्षि = कूस ] (स. मं. )
कृत्या [ कृत्यका (चेटकी) = कृत्या ]
कें [क सर्वनामाची तृतीया एकवचन ](ज्ञा. अ. ९ पृ. ७)
केकती [कंकतिका (वृक्षविशेष ) = केकती ]
केंजळ १ [ किंजल ] (किंजळ पहा)
-२ [ किंजल्क = केजळ (वनस्पतिविशेष) ]
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कुरडणें [ क्रुथनं ] (भा. इ. १८३४)
कुरंडी [ कुरंटिका = कुरंडी ] (भा. इ. १८३४)
कुरडू [ कुरंटी = कुरडी, कुरडू]
कुरळ [ कुरल किंवा कुरुल (curly hair) = कुरळ (केस) (ळा, ळी, ळें) किंवा कुरुळ (ळा, ळी, ळें ) ] (भा. इ. १८३५)
कुरुठा [ कुरोधस्] रोधस् म्हणजे बांध embankment किंवा कुरोधः रोधः म्हणजे बांध, वेढा, अडचण. (ज्ञा. अ. ९ पृ. १५२)
कुरुंद १ [कुरुविंद = कुरुंद ] शिलाविशेष. कुरुविंदास्तु कुल्माषाः (वैजयंती, पृ. ४४)
-२ [ कुरुंब (सिंदुवारपुष्पवर्णदृषद्) = कुरुंद ] कुरुंदाचा दगड प्रसिद्ध आहे. जातीं करतात. हा शब्द कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या Book २ chap. १२ मध्यें आला आहे.
कुर् झ्या [ कुर्+ झ्यु गतौ = कुर् झ्या ( get on ) ]
कुर् sound of friendship.
कुर्हाडफोडी [ परशुस्फोटितानि दारूणि = फरसफोडा कुठारस्फोटितानि = कुर्हाडफोडी (पाणिनि २-१-३२)]
कुलुंगा (कुत्रा) [ कुलुंग (एक प्रकारचा हरीण) = कुलुंग ( गा-गी-गें ) ] कुलुंग हरणासारखें बारीक आकाराचें कुत्रें. (भा. इ. १८३५)
कुलुली [( नपुं. ) कुरीरं ( स्त्रीभोग ) = कुलील = कुलुली ( स्त्री. ) ] कुलुली म्ह० स्त्रीभोगेच्छा. संस्कृतांत कुरीरी किंवा कुरुरी असा शब्द असावा. ( भा. इ. १८३५ )
कुल्ला [ कोल = कोला = कुल्ला ] अवयवविशेष. (भा. इ. १८३५)
कुल्हार [कुलागार family-house = कुल्हार ]
जें भूलिचें कुल्हार । वायुत्त्वाचें अंतर । बुद्धिचें द्वार । झांकललें जेणें ॥ ज्ञा. १३-११५
कुंवार, कुंवारी [ कुमारी = कुंवारी, कुंवार, कोंवार ] (स. मंदिर)
कुशळ [कुशल = कुशळ. ल = ळ. ल्य = ल]
कुशी [ कुशी ] (कुसा पहा)
कुसरूड [ कोशकारकीट: = कोसरूड = कुसरूड] सुरवंट.
कुसळ [ कुशल्य = कुसळ. शल् १ गतौ ] तो काय माझें कुसळ उपटतो आहे? येथें कुसळ म्ह० वाईट शल्य.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कुबड [ कुब्ज + अस्थि = कुब्ब + हाड = कुबाड = कुबड ] (स. मं. )
कुबडा १ [ कूबरः ( कुब्जः ) = कुबडा ] कुब्जपासून कुबडा निष्पादण्याची जरूर नाहीं.
-२ [ कुब्जट: = कुबडा ] (खुजा १ पहा)
कुबडी [ कुब्जयष्टि = कुबडी ] कुबड्याची काठी.
कुंबा [ कुंभः a pot = कुंबा = (चांभाराचा) ]
कुंभा [ कुंभ (योनिः) = कुंभा (देवकुंभा)] (भा. इ. १८३४)
कुभांड [कुष्मांडं (खोटी कल्पना) = कुब्भांड = कुभांड ]
कुंभारमाशी, कुंभारीण [ कुंभीरमक्षिका ]
कुयाड [ कुयं ह वै नाम कुत्सितं भवति । उत्तरगोपथत्राह्मणषष्ठः प्रपाठकः । ] कुयाड या शब्दांतील आड प्रत्यय आढ्यदर्शक आहे. हें कुयाड काय आहे ? म्हणजे ही कुत्सित अनिष्ट गोष्ट काय आहे ? ( भा. इ. १८३४)
कुरकुर [ कुर (आवाज करणें ) ( पुनरुक्त) कुरकुर. कुर म्हणजे शोकाचा, तक्रारीचा आवाज करणें. कुर शब्दे असा पाणिनि सामान्य अर्थ देईल. परंतु मराठी अर्थावरून दिसतें कीं, मूळ संस्कृत अर्थ शोकस्वर असा होता.] (भा. इ. १८३५)
कुरकुरणें [ कुर शब्दे. कुरकुर (द्वित्व).] 'कुर शब्दे' असा सामान्य अर्थ पाणिनिधातुपाठांत दिलेला आहे; परंतु मराठींत कुरकुरणें म्ह० तक्रारीचा किंवा नापसंतीचा शब्द काढणें असा ज्या अर्थी अर्थ प्रचलित आहे, त्या अर्थी संस्कृतांत कुर म्हणजे तक्रारीचा शब्द करणें असा अर्थ असावा, नव्हे होता, असें म्हणावें लागतें. कुररी हा शब्द कुर ह्या धातूपासून संस्कृतांत निघाला आहे. कुररीप्रमाणें शब्द करणें म्हणजे दुःखाचा, नापसंतीचा शब्द करणें. (भा. इ. १८३५)
कुरकुली [ कर्करी = करकली = कुरकुली ] संस्कृतांत कर्करी म्ह० रोंवळी. रोंवळीसारखें वेळूंच्या पत्र्यांचें बनाविलेलें जें पात्र तें कुरकुली. लहानगी फुलांची टोपली. (भा. इ. १८३६)
कुरघोडी [ कुमारघोटिका = कुंवरघोडी = कुरघोडी ] कुमारघोटिका हा पाणिनिकालीन आर्यांत मुलांचा खेळ असे. त्यांत ज्या मुला वर डाव येई त्याला घोडा करीत व त्याच्या पाठीवर घोड्यावर बसतात तसें बसून विजयी पक्षांतील मुलें विवक्षित मर्यादेपर्यंत फिरत.
कुरड, कुरडणें [ कुड् ( खाणें ) = कुरड, कुरडणें ] (भा. इ. १८३३)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कुत्रा, कुत्री, कुत्रें - संस्कृतांत कुक्कुरः ( रः, री, रें ) असा शब्द उपलब्ध आहे. त्यापासून कुकरा, कुक्रा असा अपभ्रंश मराठींत व्हावा परंतु कुत्रा असा अपभ्रंश मराठींत रूढ आहे. हिंदीत कुत्ता असा अपभ्रंश आहे. ह्या वरून एक च अनुमान करावें लागतें. तें हें कीं संस्कृतसमकालीन प्रांतिक संस्कृतसम भाषांत कुत्तुरः किंवा कुत्तर: असा शब्द रूढ असावा. बहुशः संस्कृतांतच कुत्तर: असा शब्द असावा. कुत्र्यांचीं पिलें कु कु असा शब्द करतात त्यावरून त्यांना हाका मारतांना कु कु अशी हाक आपण मराठे मारतों. ही कु कु हाक मराठ्यांनीं अलीकडे नव्यानेंच उत्पन्न केली व प्रचारांत आणिली असें म्हणण्यास कांहींच पुरावा नाहीं. ही हाक आपण महाराष्ट्रींतून व महाराष्ट्रीनें संस्कृतांतून वंशपरंपरेनें घेतली असली पाहिजे, हें निश्चित आहे. कां कीं कुक्कुर शब्दांत हि पहिला अवयव कु आहे व दुसरा अवयव हि कु च आहे. हा कुक्कुर शब्द संस्कृतांत हि अपभ्रंश च आहे. मुळांत हा शब्द कुकुकर: असा होता. त्याचा संक्षिप्त उच्चार कुक्करः असा संस्कृतांत रूढ झाला इतकें च. वैदिक पूर्वभाषेंत हा कुकुकर: शब्द असावा व त्या पूर्वीच्या भाषेंत नुसत्या कु ह्या शब्दानेंच श्वन् या अर्थाचा बोध होत असावा. तो कु शब्द प्रांतिक संस्कृत भाषांत राहिला. ज्याप्रमाणें अश्व पासून अश्वतर, गु पासून गुतर (गुरूं), महिष पासून महिषतर (म्हसरूं) हे शब्द र्हस्वत्वदर्शक होतात, त्याप्रमाणें च कु शब्दा पासून र्हस्वत्वदर्शक शब्द कुतर हा होतो. त्या कुतर: ह्या प्रांतिक संस्कृत शब्दापासून मराठी कुतरा, कुत्रा हा शब्द निष्पन्न होतो. कुत्र, कुतर हें मूळ रूप-त्याचीं तिन्हीं लिंगीं कुत्रा, कुत्री, कुत्रें अशीं मराठींत रूपें होतात व प्रांतिक संस्कृतांत कुतर, कुतरी, कुतरं अशीं रूपें होतात. कोशांत कुतर, कुत्र असा अकारांत शब्द दिला पाहिजे व त्याचीं तिन्हीं लिंगीं कुत्रा, कुत्री, कुत्रें अशीं रूपें होतात असें दर्शविलें पाहिजे. ( भा. इ. १८३६)
कुथणें [ कुथ् पूतीभावे, दौर्गंध्ये] शरीरांत दौर्गंध्य होतांना जो शब्द मनुष्य करतें तें. (ग्रंथमाला)
कुंदा [ स्कुद: ( स्कुंन्द् to jump स्कुंदते ) = कुंदा ] कुस्तींतील एक पकड (पेच) आहे.
कुन्हा १ [ क्नस् ४ ह्वरणे ] (धातुकोश-खुनस २ पहा )
-२ [कुहना (मिथ्येर्यापथकल्पना) = कुन्हा ]
कुपी [ कूपी ( a bottle ) = कुपी ] ( भा. इ. १८३६) ना. को. ६
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कुडकुडणें १ [ कुड् बाल्ये, ] बालाप्रमाणें कांपणें, अंगविक्षेप करणें. (ग्रंथमाला)
-२ [ कुड् वैकल्ये ] (ग्रंथमाला)
कुंडगुळें [ कुंडगोलकत्वं =कुंडगुळें or कोंडगोळें] an act irregular like the descent of a कुंडगोळक who is the son of an adulteress कुंडा adulteress.
कुंडगोळक [कुंडा ( an adulteress ) son of an adulteress, while the husband is living. कुंडागोपालक = कुंडगोळक. रंडा ( a widow.) Son of a widow after husband's death. रंडागोपालक = रंडगेोळक ]
कुडबुड्या १ [ कूटबुद्धिः = कुडबुड्या ] लुच्चा. कुडबुड्या जोशी.
-२ [ क्षुद्रबुद्धिः = खुड्डबुड्डि = कुडबुडी. क्षुद्रबुद्धिक: = कुडबुड्या] कुडबुड्या जोशी म्ह० क्षुद्रबुद्धि ज्योतिषी. (भा. इ. १८३४)
कुंडली [ कमंडलुः = कोंडली = कुंडली ] लहान तांब्या.
कुडव [ कुटप ] (कुडो पहा)
कुडा [ कुंद्रक: = कुडा, कूड. कुद्रि-कुन्द्र १० अनृतभाषणे ] कुडा म्ह० खोटा.
कुडी [ कुडिर्देहः (उणादि ५९३) ] (भा. इ. १८३३)
कुडुक [ कुडुप (दागिन्यांचें पेचकट) = कुडुक] अलंकार विशेष. आडकावयाचा दागिना. (भा. इ. १८३३) कुडूकुडू[ कूडंकूडं = कुडूकुडू (हरभरे खाणें). कुङ् to eat ]
कुडें १ [ कूटं (शृंगं) = कुडें ] सुंठीचें कुडें.
-२ [ कुटुप = कुडें ] कानावरील अलंकार.
कुडो [ कुटप = कुडव, कुडो ] माप धान्याचें. ( भा. इ. १८३३ )
कुढा [ कुधी: (दुष्टबुद्धिः, अजाणता) = कुढी, कुढा] ill-disposed. (भा. इ. १८३४)
कुणकुण [ कुण् शब्दे ] (ग्रंथमाला)
कुणा १ [ कुणिः = कुणा] आखूड हाताचा मनुष्य.
-२ [ कुणारु (वैदिक) = कुणा ] having withered arm.
कुतरूं [ कुक्कुरतर ] ( रूं पहा)
संस्कृत भाषेचा उलगडा
त्य वगैरे सर्वनामांना स्मै, स्मात्, स्मिन् असे मकारमय प्रत्यय कोठून आले? तर पूर्ववैदिकभाषांत स्य व स्म आणि ष्य व ष्य असें वैकल्पिक उच्चार एकाच अक्षराचे होत असत. याचे सर्वांच्या परिचयाचे उदाहरण म्हटले म्हणजे दुष्यंत व दुष्मंत या जोडीचे.
(२) पाणिनीय तद् शब्द :
स: तौ ते
सा ते ता:
तत् ते तानि
साधनिका त्यद्प्रमाणे
(३) पाणिनीय एतद् शद्ब ए + तद् असा सामासिक आहे. तद् म्हणजे तो आणि एतद्
म्हणजे हा तो. साधनिका त्यद्प्रमाणे. पूर्ववैदिक भाषेत एनद् असा दुसरा शब्द होता. एनद्
व एतद् या दोन शब्दांच्या रूपांची भेसळ वैदिक भाषेत झाली आहे.
(४) पाणिनीय यद् शब्द :
य: यौ ये
इत्यादी साधनिका त्यद्प्रमाणे.
(५) पाणिनीय किम् शब्द : पुल्लिंगी पूर्ववैदिकभाषेत मूळ शब्द क, स्त्रींलिंगी का,
नपुंसकलिंगी क, नपुंसकलिंगी भाषेत मूळशब्द किम्
पुल्लिंग
क: कौ के
स्त्रीलिंग
का के का:
नपुंसकलिंग
किम् किमी किम्मि
कम् के कानि
नपुंसकलिंगी भाषेचे किम् हे रूप घेऊन
किम् के कानि