सके १५९२ आषाढ सुध ९ गुरुवारी माहुली घेतली.
शके १५९३ विरोधी संवछर
वैशाखमासी मोहबतखानाने वेढा ज्येष्ठमासी बाहादूरखान व दलेलखान
घालून अहिवंत व मारकंडा व जवळा सालेरीस वेढा घातला. आस्विन मासी
व अंचळागिरिहि घेतले. माघमासी वेढा काढून औरंगाबादेस आले आणि तेथे
मोरोपंतीं हशम घेऊन सालेरीचे माचीचा फौज ठेविली.
वेढा मारिला. उपराळा केला. प्रतापराऊ माघमासी सुलतान शाअलम
आनंदराऊ फौजेनसी जाऊन बलोलखान औरंगाबादेहून दिलीस गेले.
धरिला मोहकमसिंग व दारकोजी भोसले
धरिले. हात्ती ११ व घोरी सतरासे पाडाऊ
केली.
शके १५९४ परिधावी संवछर
जेष्ट वद्य ५ मोरोपंत जाऊन जवारी आषाढमासी रामनगर घेतले तेथील
घेतली तेथील राजा विक्रमशा पळाला राजा पळोन दवनसेस गेला १.
मोगलाईत आला १.
जेष्ट सुध ७ कल्याणपंती जेष्ट सुध ५ भागानगरीचा पातशा
चिंचवडी परलोकवास केला सुलतान अबदुला कुतुबशा मेला त्याचा
मार्गेश्वरमासी * * * * जावई तानाशा तखती बैसविला.
अदलशा परलोकास गेला. त्याचा पुत्र नाव सुलतान अबदुल हसन ठेविला.
सुलतान शिकंदर तखती बैसविला. राज्याचे हेजीब नीराजीपंत भागानगरास
खवासखान कारभारी जाला. राज्याचा व जाऊन एक लक्ष होनाचा तह करून
इदलशाचा सला तुटला बाबाजी नाईक भागानगराहून ६६ हजार होन घेऊन
पुंडे विजापुरी वकील होते त्यास बोलाऊन राज्यापासी आले.
आणिले.
फाल्गुण वद्य १३ पनाळा गड
अनाजीपंत भेद करून कोंडाजी फर्जंद
याज बा। लोक देऊन घेतला. पाठी लोक
रवाना केले.
शके १५९५ प्रमादी संवछर
चैत्र शुध्द १ राजे रायरीहून पनाळियास चैत्र वद्य १० भोमवार किले परली
गेले ते च मासी बहलोलखानासी व घेतली विजयादसमीच्या मुहुर्ते राजे
प्रतापराऊ व आनंदराऊ यासी लढाई जाऊन बंकापूर लुटिले.
जाली, विजापुराजवळ फते जाली, एक
हाती पाडाऊ आला
श्रावण वद्य ९ रविवारी सातारा घेतला. कार्तिकमासी सर्जाखान * * व विठोजी सिंदियासी झगडा जाला. विठोजी पडिला.
(बाजू १ अर्धे पान खालचें)
व्यानी केलंजा घेतला. वद्य नवमी जेष्ट सुध घटी ५ राज्याची मौंजी
बुधवारी दो प्रहरा रात्री जिजाई आऊ जेष्ट सुध ६ शनिवारी समंत्रिक विवाह
पाचोडींत निर्वग वास केला १. केला १
माघमासी मोरोबाची मुंजी जाली जेष्ट शुध १२ शुक्रवार ५१।३४ वी
जैतपडी माघ वद्य ६. ३८।४२ + + ।४५ तीन घटिका रात्री
गंगाबाई निवर्तली फाल्गुण वद्य ५ उरली तेव्हा सीवाजी राजे सिंहासनी बैसले
फाल्गुण वद्य ५ राजे + + डि यास छ १० रबिलावल सु॥ सन खमस सबैन
ले + + + + + + + + पंचमी अलफ
गुरुवारी संभाजी राजे यांची मुंजी जाली
चैत्र सुध १३ चिपोळणांत लस्करची
पाहाणी केली आणि बहिरराऊ मोहिते
यासी सरनोबती दिधली १